Leading International Marathi News Daily

सोमवार, १ जून २००९

(सविस्तर वृत्त)

जालना बाजार समिती मराठवाडय़ात प्रथम
जालना, ३१ मे / वार्ताहर

२००८-२००९ या आर्थिक वर्षांत उत्पन्नाच्या बाबतीत जालना कृषी उत्पन्न बाजार समिती

 

मराठवाडा विभागात प्रथम, तर राज्यात पाचव्या क्रमांकावर आहे. राज्यात एकूण २९२ बाजार समिती आहेत. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आमदार अर्जुनराव खोतकर यांनी ही माहिती दिली.
१९३१ साली स्थापना झाल्यापासून पहिल्यांदा ही बाजार समिती मराठवाडय़ात उत्पन्नाच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आलेली आहे. संपूर्ण मराठवाडय़ात सध्या ८४ बाजार समित्या कार्यरत आहेत. ३१ मार्चला संपलेल्या आर्थिक वर्षांत जालना बाजार समितीचे वार्षिक उत्पन्न ५ कोटी ५७ लक्ष एवढे झाल्याचे आमदार खोतकर यांनी सांगितले. ३१ मार्च २००८ ला संपलेल्या आर्थिक वर्षांत जालना बाजार समितीचे वार्षिक उत्पन्न ३ कोटी ७२ लक्ष रुपये आहे. तर त्या आधीच्या वर्षांत हे उत्पन्न ४ कोटी ४० लक्ष रुपये होते.
आमदार खोतकर यांनी सांगितले की, गेली ७७ वर्षे मराठवाडय़ात लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही प्रथम क्रमांकावर होती. लातूर बाजार समितीचे वार्षिक उत्पन्न गेल्या आर्थिक वर्षांत ५ कोटी ३८ लक्ष एवढे होते, तर २००७-०८ मध्ये ४ कोटी १८ लक्ष एवढे होते.
जालना व बदनापूर तालुक्यातील तसेच, १०० कि.मी. परिसरातून शेतकऱ्यांचा शेतमाल बाजार संकुलात येत असतो. जालना बाजार समितीच्या या प्रगतीमध्ये उपसभापती रामेश्वर पा. भांदरगे, जिल्हा उपनिबंधक एस. एस. क्षीरसागर, संचालक विष्णू पवार, भास्कर अंबेकर, पंडित भुतेकर, प्रल्हादराव खेडकर, बाबूराव खरात, कचरू सुकरे, भीमराव भुजंग, भाऊसाहेब घुगे, हरिश्चंद्र शिंदे, भगवानराव कदम, रामकृष्ण वाबळे, हरिहर शिंदे, अ‍ॅड. ब्रह्मानंद चव्हाण, अनिल सोनी, रमेश तोतला, गोपाल काबलिये, भारतीबाई रमेशराव जऱ्हाड, कमलबाई कापसे, सचिव अरुण भोरे, सहायक सचिव सुधाकर इंगळे, लेखापाल गणेश चौगुली व सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले, असेही आमदार खोतकर यांनी नमूद केले.