Leading International Marathi News Daily

सोमवार, १ जून २००९

क्रीडा
(सविस्तर वृत्त)

भारत, विंडीज, आफ्रिका यांचे आव्हान मोठे - युनूस
कराची, ३१ मे/ पीटीआय

 

येत्या शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या टे्वन्टी- २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत, वेस्ट इंडिज व दक्षिण आफ्रिका हे देश मोठे आव्हान उभे करतील, असे मत पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार युनूस खान याने व्यक्त केले आहे. आफ्रिका व इंग्लड यांच्यविरुद्ध नुकत्याच झालेल्या मालिकेत पाकिस्तानच्या खेळाडूंनी फारशी चांगली कामगिरी केली नव्हती. त्याचाही परिणाम खेळावर होण्याची भीती युनूसने व्यक्त केली आहे.
भारत व दक्षिण आफ्रिका विश्वचषकाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. पण मोक्याच्या क्षणी सामना फिरवण्याची क्षमता वेस्ट इंडिजमध्येही आहे. त्यामुळे त्यांना कमी लेखून चालणार नाही. वेस्ट इंडिजही चमत्कार घडवू शकतो, असे युनूसने सांगितले.
टे्वन्टी- २० क्रि केटचे स्वरुप पूर्ण वेगळे आहे. प्रत्येक दिवशी तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागते. स्पर्धेत टीकून राहण्यासाठी कामगिरीत सातत्य राखणे आवश्यक ठरते.
या नव्या प्रकाराशी आम्हीही आता जुळवून घेतले आहे. पूर्ण क्षमतेने आम्ही मैदानात उतरणार आहोत. सर्व आघाडय़ांवर चांगली कामगिरी केल्यास विजय आमचाच आहे, असा विश्वास युनूस खान याने या वेळी व्यक्त केला. सोहल तन्वीरची भेदक गोलंदाजी आमच्यासाठी जमेची बाजू आहे. सोहेलने त्याच्यातील कौशल्य गतविश्वचषकात तसेच नुकत्याच संपलेल्या आपीएल स्पर्धेत दाखविले आहे. त्याच्या उत्तम कामगिरीमुळे आमचाही विश्वास वाढला आहे. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये त्याने गोलंदाजीतील चुकांवर फारसे लक्ष्य दिले नव्हते. पण त्याच्याशी संवाद साधल्यानंतर त्याने त्याच्या गोलंदाजीत अधिक सुधारणा केली आहे. ट्ेवन्टी- २० विश्वचषक स्पर्धेत सोहेल गोलंदाजीच नक्कीच कमाल दाखवीन असा , विश्वास युनूस खान याने व्यक्त केला आहे.
शाहिद आफ्रिदी, उमर गुल, कामरान अकमल व शोएब मलिक या चौकडीवर आमचा खेळ अवलंबून आहे. इंग्लंडमध्ये खेळणे हा चांगला अनुभव असेल. तेथील मैदाने तुलनेने छोटी असतात. अशा मैदानात मोठी धावसंख्या उभारणे सोपे जाते. विश्वचषक स्पर्धेतही त्याची प्रचिती येईल, असे युनूसने सांगितले.