Leading International Marathi News Daily

मंगळवार, २ जून २००९

व्यापार - उद्योग

‘लंडन बुलियन मार्केट’च्या धर्तीवर भारतातही ‘आयबीएमए’ची स्थापना
व्यापार प्रतिनिधी:
देशातील आघाडीच्या सराफ आणि जवाहिरांच्या संघटनांच्या सहयोगातून ‘इंडियन बुलियन मार्केट असोसिएशन (आयबीएमए)’ या राष्ट्रीय स्तरावरील विशेषज्ज्ञ कंपनीची नॅशनल स्पॉट एक्स्चेंजकडून स्थापना करणयात आली. जगप्रसिद्ध ‘लंडन बुलियन मार्केट असोसिएशन (एलबीएमए)’च्या धर्तीवर स्थापित ‘आयबीएमए’चे उद्दिष्ट हे सोन्या-चांदीच्या जागतिक व्यापारात भारताला लक्षणीय स्थान मिळवून देण्याचे आणि या मौल्यवान जिन्नसांचा सर्वात मोठा उपभोगकर्ता देश या नात्याने त्यांच्या भावनिश्चितीत महत्त्वाची भूमिका बजावण्याचे आहे.

जागतिक मंदीच्या काळात वस्तुविनिमयात मोठी वाढ
व्यापार प्रतिनिधी:
जागतिक मंदीच्या आजच्या काळात जागतिकस्तरावरील बार्टर एक्स्चेंज कंपन्या १५ ते ६० टक्क्यांदरम्यानची वृद्धी नोंदवीत आहेत. या वृत्तामधून प्रेरणा घेऊन एका युवा भारतीय उद्योजकाने बार्टर आणि वैयक्तिक व्यापाराला वाहिलेली एक वेबसाइट दाखल केली आहे. त्या माध्यमातून भारतातील व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांसाठीचे पहिले संघटित बार्टर एक्स्चेंज सुरू झाले आहे. विपुल के. रावळ हे देशातील काही मोजक्या नियुक्ती सल्लागारांमधील एक आहेत आणि परदेशी भाषा बोलणाऱ्यांच्या रोजगारामध्ये त्यांचा हातखंडा आहे. त्यांनी बार्टरमॅनियाक डॉट कॉम (bartermaniac.com) ही साइट सुरू केली आहे, गुडस् आणि कमॉडिटीजबरोबर या साइटवर सेवा आणि अगदी संकल्पनांचेही बार्टरिंग आणि वैयक्तिक व्यवहार करता येतात.

‘युअरस्टोरी’द्वारे लघु व मध्यम उद्योजकांच्या यशोगाथांवर प्रकाशझोत
व्यापार प्रतिनिधी:
‘युअरस्टोरी डॉट इन’ने (YourStory.in) एमआयसीए ईडीसी यांच्या सहयोगाने नेहरू सेंटर, वरळी येथे अलीकडेच ‘आंत्रप्रीन्यूअर फोरम समर ०९’चे आयोजन केले होते. नवउद्योजकांना आदानप्रदान व भेटीगाठींसाठी तसेच गुंतवणूकदार समुदायातील ज्येष्ठ सदस्यांकडून कानमंत्र ऐकण्यासाठी हे फोरम एक उत्तम व्यासपीठ ठरले.

मॉरिशस टुरिझमची स्वागत मोहीम
व्यापार प्रतिनिधी:
मॉरिशस टुरिझमने भारतातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी काही खास कार्यक्रम राबविताना ‘स्वागत’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्वागत कार्यक्रमांअंतर्गत सप्टेंबपर्यंत बुकिंग करणाऱ्यांना काही खास आर्थिक सवलत मिळणार आहेत. या कार्यक्रमाअंतर्गत भारतीय पर्यटकांना विशेष आकर्षित करण्यासाठी मॉरिशसमध्ये हॉटेलसेवेत भारतीयांच्या आहारानुसार मेन्यूत बदल, हिंदी भाषिक सेवा आदी सेवा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मॉरिशसला फ्रान्सचे पर्यटक मोठय़ा संख्येने भेट देतात. त्यानंतर यूके, इटली या देशांचा क्रमांक लागतो. हिंदी महासागरात बेट असलेल्या मॉरिशसचे भारताशी ऐतिहासिक काळापासून संबंध आहेत. त्या संबंधाचा धागा पकडत आधुनिक काळात भारतातील मोठी क्षमता असलेल्या पर्यटक क्षेत्रात मोठय़ा ताकदीने घुसण्याचा मॉरिशस टुरिझमचा प्रयत्न आहे. गेल्या वर्षी मॉरिशसला भेट देणाऱ्या भारतीयांची संख्या ४३७९५ इतकी होती. त्यात या वर्षी किमान १० टक्के भर पडण्याची शक्यता आहे.

कॅम्लिन फाइन केमिकल्सने गाठला १०० कोटींच्या उलाढालीचा टप्पा
व्यापार प्रतिनिधी:
कॅम्लिन फाइन केमिकल्स लि. ही फूड ग्रेड अँटिऑक्सिडंट्स टीबीएचक्यू आणि बीएचए यांच्या निर्मितीतील जगातील अग्रेसर कंपनी, जुलै २००६ मध्ये कॅम्लिन समूहातून विभाजन होऊन कार्यान्वित झाली. गत तीन वर्षांच्या काळात म्हणजे मार्च २००९ अखेपर्यंत या कंपनीने एकंदर उत्पन्नात रु. १०० कोटींचा महत्वपूर्ण टप्पा ओलांडला असून, जागतिक आर्थिक मंदी आणि विदेशी चलनातील वादळी वध-घटींनंतरही आधीच्या वर्षांच्या तुलनेत कंपनीचे उत्पन्न यंदा २४.९८ टक्क्यांनी वाढले आहे. कंपनीने ३१ मार्च २००९ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षांसाठी उत्तम वित्तीय कामगिरी जाहीर केली आहे. कंपनीचा करांपूर्वीचा नफा २४.९६% वाढून रु. ५२०.५२ लाखांवर गेला आहे, तर व्याज, घसारा व करांपूर्वीचे एकंदर उत्पन्न १४% वाढून रु. १४७५.११ लाखांवर तर विक्री/उलाढाल उत्पन्नात २४.९८ % वाढली आहे.

होंडाच्या इंटरनॅशनल फन बाइक्स
व्यापार प्रतिनिधी:
टू व्हीलर्सची जगातील सर्वात मोठी निर्माती असणाऱ्या होंडा मोटर कंपनी, जपान यांच्या १०० मालकीची टू व्हीलर सबसिडीयरी असणाऱ्या होंडा मोटार सायकल अॅण्ड स्कूटर इंडिया प्रा. लि. (एचएमएसआय) यांनी आज मुंबईमध्ये नवीन सीबीएफ स्टनर पीजीएम- एफआयच्या सोबतच त्यांच्या सीबीआर १००० आरआर फायरब्लेड आणि सीबी १००० आर या बाइक्स सादर केल्या आहेत. या बाइक्सच्या सादरीकरणाद्वारे होंडा तरुण पिढीमध्ये फन बाइकिंग संस्कृतीचा प्रसार करण्याचा विचार करीत आहेत. या दोन्ही इंटरनॅशनल बाइक्स त्यांच्या मनोैरंजनपर कामगिरीद्वारे ग्राहकांना अपेक्षित आनंद देण्यासाठी बनविण्यात आल्या आहेत. खास ग्राहकांना नजरेसमोर ठेवून तयार करण्यात आलेल्या या बाइक्स त्यांचे देखणे रूप, मजबूत कामगिरी, गुणवत्ता आणि अत्यंत उत्तम प्रतिसाद देणाऱ्या कंट्रोल्सद्वारे मोटरसायकल्सच्या कार्यक्षमतेमध्ये अशी काही नवीन प्रमाणे प्रस्थापित करीत आहेत की जी भारताच्या ‘फन बाइकिंग’च्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहेत. निवडी वाढत असल्यामुळे आजचे यशस्वी भारतीय त्यांचे जीवन आनंदाने भरून टाकू शकेल असा ‘मौज’ हा घटक मोठय़ा प्रमाणात पुरविणाऱ्या ब्रॅण्डस्च्या शोधात सक्रिय झाले आहेत.‘सीबीआर १००० आरआर फायरब्लेड आणि सीबी १००० आर’ या अत्यंत आकर्षक रचना व प्रतिसादात्मक कार्यक्षमता यामुळे या वर्गवारीत अगदी अचूक बसतात.

स्टेट बँकेला ग्राहक सेवेसाठी उत्कृष्ट तंत्रज्ञान वापराचे पारितोषिक
व्यापार प्रतिनिधी:
स्टेट बँक ऑफ इंडियाला ग्रामीण आणि अर्धग्रामीण भागातील ग्राहक सेवेसाठी उत्कृष्ट तंत्रज्ञानाचा वापर केल्याचे ‘आयडीआरबीटी बँकिंग टेक्नॉलॉजी एक्सलन्स अॅवॉर्ड’ मिळाले आहे. देशातील मोठय़ा बँकांच्या विभागातील हे पारितोषिक आहे. हैदराबाद येथे पार पडलेल्या एका समारंभात बँकेने हे पारितोषिक रिझव्र्ह बँक गव्हर्नर डॉ. डी. सुब्बाराव यांच्याकडून स्वीकारले. आयडीआरबीटीने हे पारितोषिक २००१ पासून सुरू केले. तंत्रज्ञान वापराबाबत बँका-बँकातून स्पर्धा निर्माण व्हावी हा उद्देश होता. स्टेट बँकेने हे तंत्रज्ञान खेडेगावापर्यंत पोहोचविण्यात अगदी पुढाकार घेतला होता. बँकेच्या ११,९९५ पैकी ७० टक्क्यांहून अधिक शाखा ग्रामीण आणि निमग्रामीण भागात आहेत. तेथेही कोअर बँकिंग सोल्युशन, स्मार्ट कार्ड, एटीएम, इंटरनेट बँकिंग, आरटीजीएस आणि एनइएफटी आदी सर्व सुविधा पोहोचल्या आहेत.