Leading International Marathi News Daily

मंगळवार, २ जून २००९

परीक्षेपेक्षा ऑनलाइनचेच टेन्शन अधिक!
कॅम्पस मूड टीम

दरवर्षी अकरावीच्या अॅडमिशन्ससाठी काही ना काहीतरी वेगळे बदल घडवून आणण्यासाठी उत्सुक असलेलं शिक्षण महासंचालनालय व महाराष्ट्र बोर्ड या ना त्या कारणाने एक तर राजकीय पक्षांच्या कात्रीत सापडतात, नाही तर विद्यार्थ्यांमधील प्रचंड असंतोषाला सामोरं जाण्याची वेळ त्यांच्यावर येते.

तरुणांचे टिळक आणि आगरकर
दोन-दोन, तीन-तीन महिने कसून चालणाऱ्या तालमी, कटिंग मारता मारता होणारी चर्चा, प्रयोग जवळ आल्यानंतर वाढणारी धावप्ांळ, प्रयोगाआधी विंगेत होणारी हृदयाची धडधड आणि तिसऱ्या घंटेनंतर अंगात संचारणारं स्फुरण, त्यातून साकारणारं नाटक.. आजचे तरुण कॉलेज वयात असतानाच नाटय़शास्त्र, नाटक आणि त्याबाबतच्या तंत्रांचं शिक्षण घेताना दिसतात. अशाच काही तरुणांना एकत्र घेऊन सिनेसृष्टीत लेखक म्हणून स्थिरावत असलेल्या कौस्तुभ सावरकर या तरुणाने विश्राम बेडेकर लिखित ‘टिळक आणि आगरकर’ या नाटकाचा दीर्घाक सादर करण्याचा संकल्प सोडला आहे.

भारतीय बॅडमिंटनमधील उगवती जोडी : अक्षय-जिष्णू
आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन संघटनेच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी ठाण्यातील अक्षय देवलकर आणि जिष्णू सन्याल या दोघांची पुरुष दुहेरीत निवड झाली आहे. वयाच्या विसाव्या वर्षीच या स्पर्धेत सहभागी होणारे ठाण्यातील ते पहिले खेळाडू आहेत. अक्षय-जिष्णू दोघेही ठाणे महापालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थी असून श्रीकांत वाड या ज्येष्ठ बॅडमिंटनपटूच्या मार्गदर्शनाखाली ते बॅडमिंटनचा गेली अनेक वर्षे सराव करीत आहेत. या जोडगोळीपैकी जिष्णू गेल्या दहा वर्षांपासून बॅडमिंटन खेळत असून तो सुरुवातीला एकेरी खेळत असे. मात्र गेल्या वर्षांपासून अक्षय-जिष्णू एकत्र खेळत असून आज ते जागतिक क्रमवारीत ७७ व्या स्थानावर आहेत.

प्रबोधिनीच्या प्रांगणात..
कॅम्पस मूड टीम ही नुसते लेख लिहिण्याच्या पलीकडे जाऊन काही ना काही उपक्रम राबवत असते. जे उपक्रम तरुणाईच्या विचारशीलतेला चालना देतील.. तरुणांच्या सामाजिक जाणिवेला खतपाणी देतील.. काहीतरी वेगळं पाहावं.. वेगळं शिकावं जेणेकरून आपल्या विचारकक्षा रुंदावतील असा ‘कॅम्पस मुडीं’चा कायमच प्रयत्न असतो. या वेळी अशाच एका उपक्रमाच्या निमित्ताने आम्ही रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, उत्तन येथे भेट दिली.. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचा तो ‘मौनी मतदार सव्रेक्षण’ ‘कॅम्पस मुडीं’नी केला होता.

विद्यार्थी संघटना करताहेत काय?
अॅड‘मिशन’

गेल्या वर्षीची पर्सेटाइल सिस्टीम, या वर्षीचा ‘बेस्ट ऑफ फाइव्ह’ पर्याय आणि या गोंधळात भर म्हणून आता ऑनलाइन अॅडमिशनची प्रक्रिया. यंदाची अॅडमिशन प्रक्रिया कशी असणार याबद्दल विद्यार्थ्यांसमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. असे असतानाच अनेक पालक- विद्यार्थ्यांना अॅडमिशन ऑनलाइन होणार आहे, हेच माहीत नाही. म्हणूनच त्यांच्यासाठी ऑनलाइन अॅडमिशन ‘मिशन’ ठरणार आहे. ऑनलाइन अॅडमिशनमधील त्रुटी शोधण्याऐवजी किंवा या प्रक्रियेला पूर्ण विरोध करण्यापेक्षा ही प्रक्रिया सुरळीत पार कशी पडेल हे पाहणे महत्त्वाचे.

दिल से..
प्रिय मिहीर,

हाय! कसा आहेस? दिल्लीतला ‘निवडणूक फीव्हर’ उतरला की नाही? मुंबईला पुन्हा एकदा सगळं रुटीन ‘बॅक टू नॉर्मल’ झालं आहे. सगळेजण पुन्हा आपापल्या उद्योगांमध्ये व्यस्त झाले आहेत. तरुण वर्ग मात्र अजूनही कुठे कुठे निवडणूक, निकाल, मंत्रिमंडळ यांबद्दल चर्चा करताना दिसतोय. नवीन मंत्रिमंडळाकडून खूपच अपेक्षा आहेत आणि ‘तरुण’ लोकसभेमुळे लोक बऱ्यापैकी खूषही आहेत. अर्थात, हा आनंद ‘पाण्यावरचे बुडबुडे’ न ठरावा, इतकंच मनापासून वाटतंय. असो.

‘क्रिकेट टू टेनिस व्हाया फूटबॉल’
मैदानावरील चौकार-षटकारांची आतषबाजी, धडाधड पडणाऱ्या विकेटस्, अफलातून कॅचेस, शेवटच्या चेंडूपर्यंत उत्कंठा वाढवणाऱ्या श्वास रोखून धरणाऱ्या मॅचेस, तर मैदानाबाहेर चिअर गर्ल्सची धूम.. असा हा आयपीएलचा धडाका संपल्यानंतर तरुणांनी मोर्चा वळवला आहे तो फूटबॉल आणि टेनिसकडे. चॅम्पिअन्स लीगची फायनल पाहिल्यानंतर फूटबॉलप्रेमींची एफए कप फायनलची प्रतीक्षाही संपली. आता टेनिसप्रेमी युवकांचे डोळे लागले आहेत ते सध्या चालू असणाऱ्या फ्रेंच ओपनकडे.

कॅम्पसवर ‘फ्रेम्स’ अनेक असतात, पण त्या ‘क्लिक’ करणं फार थोडय़ांना जमतं. आपमे हैं वह बात? तर मग उचला कॅमेरा आणि तुम्ही काढलेले फोटोज् campusmood@gmail.com वर पाठवा. अट एकच. फोटो कॉलेजशी, कॉलेज जीवनातील ‘हट के प्रसंगांशी आणि एकंदरीतच ‘कॅम्पसच्या मूड’शी मॅच होणारे हवेत. सवरेत्कृष्ट फोटोला ‘कॅम्पस मूड’मध्ये प्रसिद्धी दिली जाईल. आणि हो! फोटोला शीर्षक तसेच फोटोबरोबर तुमचे नाव, कॉलेज व फोन नंबर पाठवण्यास विसरू नका.