Leading International Marathi News Daily

सोमवार, १ जून २००९

(सविस्तर वृत्त)

प्रबोधिनीच्या प्रांगणात..
कॅम्पस मूड टीम ही नुसते लेख लिहिण्याच्या पलीकडे जाऊन काही ना काही उपक्रम राबवत असते. जे उपक्रम तरुणाईच्या विचारशीलतेला चालना देतील.. तरुणांच्या सामाजिक जाणिवेला खतपाणी देतील.. काहीतरी वेगळं पाहावं.. वेगळं शिकावं जेणेकरून आपल्या विचारकक्षा रुंदावतील असा ‘कॅम्पस मुडीं’चा कायमच प्रयत्न असतो. या वेळी अशाच एका उपक्रमाच्या निमित्ताने आम्ही रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, उत्तन येथे भेट दिली.. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचा

 

तो ‘मौनी मतदार सव्रेक्षण’ ‘कॅम्पस मुडीं’नी केला होता. त्यावरच्या प्रतिक्रिया शेअर करण्यासाठी अनेक संस्थांचे स्वयंसेवक तसेच ‘लोकसत्ता कॅम्पस मूड टीम’ यांनी म्हाळगी प्रबोधिनीच्या सदस्यांची भेट घेतली. त्यातून अनेक निष्कर्ष निघाले, लोकांना बोलायचं आहे, पण त्यासाठी व्यासपीठ मिळत नाही हा अनेकांच्या बोलण्यात आलेला मुद्दा चर्चेचा विषय ठरला. याचबरोबर लोकांमध्ये एकूणच व्यवस्थेविषयी असलेलं अज्ञान हाही मुद्दा उपस्थित झाला.
‘कॅम्पस मूड’च्या टीमबरोबरच इतर अनेक संस्थांचे स्वयंसेवक या चर्चेमध्ये सहभागी झाले होते. वांद्रा-खेरवाडी येथे काम करणारे ‘यूथ पार्लमेंट’ संस्थेचे पदाधिकारी, ठाण्याच्या ‘व्यास क्रिएशन’चे स्वयंसेवक या सर्वानी ‘मौनी मतदार सर्वेक्षण’बद्दलचे आपले अनुभव सर्वाना सांगितले. या चर्चेमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता, तो म्हणजे मतदान प्रक्रिया व त्यातील तांत्रिक अडथळे. एकूणच मतदारयादीत नाव येण्यासाठी करावी लागणारी लांबलचक प्रक्रिया, त्यानंतरही मतदारयादीत नाव नसणं, लिंग चुकीचे असणे यासारखे अनेक प्रॉब्लेम्स येत असतात. यामुळे अनेकांनी मतदान केले नाही असे ‘मौनी मतदार सव्र्हे’मध्ये आढळून आले. त्यावरही या वेळी चर्चा करण्यात आली. या प्रश्नावर राष्ट्रीय ओळखपत्र हा एक चांगला उपाय असू शकतो, असंही तेथील तज्ज्ञांनी सांगितले.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधीनीचे महासंचालक विनय सहस्रबुद्धे, कार्याध्यक्ष रवींद्र साठे तसेच प्रकल्प समन्वयक रत्नाकर पाटील यांनी चर्चेत उपस्थित झालेल्या अनेक मुद्यांवर उपाय शोधणं ही या सव्र्हेची पुढची पायरी असेल, असे सांगितले. लोकांना खूप बोलयाचे असते, आपले प्रश्न मांडायचे असतात, पण त्यासाठी त्यांना माध्यम मिळत नाही. यासाठी आपण काही तरी केले पाहिजे, हे प्रश्न केवळ चर्चेपुरते न राहता त्यावर तोडगा निघायला हवा. त्यासाठी सक्रिय प्रतिक्रिया उमटली पाहिजे, असा निष्कर्ष या चर्चेतून निष्पन्न झाला.
कॅम्पस मूड टीम