Leading International Marathi News Daily

मंगळवार, २ जून २००९

शालेय सुटीचा आनंद घेण्यासाठी बच्चे कंपनीने मुंबईत अनेक उद्यानात विविध खेळांसाठी गर्र्दी केली आहे, येथील अनेक मॉलनीही या मुलांना आकर्षित करण्यासाठी मनोरंजनात्मक खेळांची सुविधा उपलब्ध केली आहे. मालाड येधील इनऑरबीट मॉलमध्ये हवेतील पाळण्यात झुल्याचा आनंद घेताना एक चिमुरडी.

लेखी परीक्षा मुंबईत आणि तोंडी परीक्षा बाहेर
अधिक गुण मिळविण्यासाठी एमबीएच्या विद्यार्थ्यांची क्लृप्ती

सुनील डिंगणकर

एमबीएच्या सामायिक प्रवेश परीक्षेसाठी (सीईटी) बसलेल्या मुंबईतील अनेक विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षा मुंबईत दिली असली तरी ग्रुप डिस्कशन (जीडी) आणि पर्सनल इंटरव्ह्यूसाठी (पीआय) मात्र त्यांनी औरंगाबाद, नाशिक, नांदेड येथील केंद्रांची निवड केली आहे. मुंबईबाहेर ‘जीडी-पीआय’ दिल्याने सीईटीच्या या टप्प्यांमध्ये जास्त गुण मिळवून एमबीएच्या गुणवत्तायादीत वरचा क्रमांक मिळविता येईल, अशी या विद्यार्थ्यांची समजूत आहे. एकेका गुणासाठी चुरस असताना, ज्या केंद्रातून लेखी परीक्षा दिली, त्याच केंद्रातून जीडी-पीआय देणे सक्तीचे करावे, अशी अपेक्षा मुंबईतूनच सीईटीचे तीनही टप्पे देणाऱ्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.

दहिसर, पोईसर नद्यांच्या विस्तारीकरणाबाबत चितळे समितीच्या सूचनेकडे दुर्लक्ष
प्रतिनिधी

मिठी नदीच्या विस्तारीकरणाचा प्रकल्प जवळपास पूर्ण झाला आहे, असा दावा पालिका प्रशासन आणि एमएमआरडीए वारंवार करीत आहेत. गेल्या काही वर्षांत आपण केलेली ही एक मोठी कामगिरी आहे, असा दावा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. मात्र मालाड ते दहिसर परिसरातील मुंबईकरांसाठी धोकादायक ठरणाऱ्या दहिसर आणि पोईसर नद्यांबाबत पालिका प्रशासन उदासीन असल्याचे दिसत आहे. या दोन्ही नद्यांचे विस्तारीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे पश्चिम उपनगरातील मुंबईकरांना यंदा पावसाळ्यात तडाखा बसण्याची शक्यता आहे.

‘नाटय़कर्मी धनराज सरवदे.. एक आठवण’
प्रतिनिधी

एकवीस वर्षांच्या छोटेखानी जीवनपटात त्याने आपला दिलखुलास स्वभाव आणि अभिनय कौशल्याने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. गेल्या पाच वर्षांत कीर्ती महाविद्यालय, संवेदना परिवार आणि उदयोन्मुख नाटय़ चळवळीचा तो अविभाज्य घटक बनला होता. धनराज सरवदे हे नाणे मग व्यावसायिक रंगभूमीवरही खणखणले. ‘आम्ही सारे लेकुरवाळे’ या नाटकातून धनराजने व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले. पण मार्च महिन्यातील ‘त्या’ घटनेने सर्वाच्याच काळजाचा ठोका चुकला. धनराजचे अपघाती निधन झाले.

हवी सरकारी मदतीची ‘हनुमान उडी’
विक्रमवीर आप्पासाहेब ढुस यांच्याबाबत भेदभाव का?

महेश विचारे

साहसी क्रीडाप्रकारांसाठी येणारा अफाट खर्च पेलणे एकटय़ा-दुकटय़ाचे काम नव्हे. त्यासाठी सरकारी, खाजगी संस्थांच्या मदतीशिवाय तरणोपाय नाही. या क्रीडाप्रकारात विक्रम नोंदविणाऱ्या एका खेळाडूवर सरकार मदतीचा वर्षांव होत असताना दुसऱ्या खेळाडूवर केवळ आश्वासनांची खैरात होत असेल तर या भेदभावाला काय म्हणावे?

टीपर चालक
नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतली ही घटना आहे. मुंबईच्या व्यापाऱ्याची गाडी भरदिवसा तीन-चार शस्त्रधारी दरोडेखोरांनी अडविली. व्यापाऱ्यावर तसेच त्याच्या वाहनचालकावर हल्ला करून दरोडेखोरांनी गाडीच्या डिकीतील रोकडसह ३० लाखांचा ऐवज लुटून नेला. साहजिकच दिवसाढवळ्या पडलेल्या या दरोडय़ामुळे नगर पोलिसांमध्ये खळबळ माजली. नगर पोलिसांनी जंग जंग पछाडले. मात्र आरोपींचा सुगावा लागू शकला नाही. घाटकोपर येथे राहणाऱ्या नवीन भानुशाली या व्यापाऱ्याबाबत ही घटना घडली.

पंजाबी ठेका आणि लोकसंगीताचा खुमार..
लाहोरच्या पांचोली आर्ट्स्तर्फे १९४२ साली आलेल्या ‘खजांची’ चित्रपटामध्ये संगीतकार गुलाम हैदर यांनी प्रथमच पंजाबी ढोलकवरील ठेका आणि लोकधुनांचा वापर करून हिंदी चित्रपटसृष्टीच्या संगीतात क्रांती घडवली. नंतरच्या ‘खानदान’मध्ये त्यांचा हा प्रयोग यशस्वी ठरला. नंतर निर्माता आणि दिग्दर्शक के. आसीफ यांनी १९४५ च्या आपल्या ‘फूल’ चित्रपटासाठी हैदर यांना जबरदस्त मेहनताना देऊन मुंबईत बोलाविले. मुंबईत आल्यानंतरही त्यांनी जे जे चित्रपट केले त्यातील संगीत कमालीचे यशस्वी ठरले. पण लाहोरवर त्यांचा जीव असल्याने फाळणीनंतर ते तिकडेच गेले. कारण लाहोरशिवाय त्यांना कुठे चैन पडायचे नाही.

‘सरकार की दुनिया’त आता ‘डान्सिंग क्वीन’ मिन्क
डान्सिंग क्वीन या कलर्स चॅनलवरील रिअॅलिटी शोची विजेती ठरलेली मिन्क ब्रार ही आता रिअल टीव्हीवरील ‘सरकार की दुनिया’च्या बेटावर जाणार आहे. आज रात्री १० वाजता दाखविण्यात येणाऱ्या भागात तिची एण्ट्री होत आहे. डान्सिंग क्वीन म्हणून प्रसिद्धी झोतात येईपर्यंत मिन्क ब्रार हिने काही चित्रपटांमधून अभिनय केला होता हे फारसे कोणाच्या गावीही नव्हते. पण यमराज, बंधन, हम आपके दिल में रहते है, सात रंग के सपने अशा काही चित्रपटांतून ती बॉलिवुड प्रेक्षकांसमोर आली.

प्रशांत दामलेकृत ‘यमाच्या बैलाला..’
प्रतिनिधी

आपल्याला कॅन्सर झालाय, असं कळलं की माणूस अध्र्याहून अधिक गर्भगळीत होतो. परंतु या दुर्धर आजाराचा प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आणि सकारात्मक दृष्टिकोनातून निश्चितच सामना करता येऊ शकतो, हे दाखवून देणारी ‘यमाच्या बैलाला..’ ही डॉ. शेखर कुलकर्णी लिखित व मंगेश कदम दिग्दर्शित धम्माल विनोदी एकांकिका प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन आणि आस्था ग्रुप यांच्यातर्फे सादर करण्यात येत आहे. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल अॅण्ड मेडिकल रिसर्च इन्स्टिटय़ूटच्या विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून, या एकांकिकेत प्रशांत दामले, मंगेश कदम, परि तेलंग आणि शिवानी कराडकर हे कलाकार काम करीत आहेत. या एकांकिकेचे शुभारंभाचे प्रयोग मंगळवार, २ जून रोजी सायं. ७.३० वा. दादरच्या शिवाजी मंदिरात; बुधवार, ३ जून रोजी रात्री ८.३० वा. ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये आणि गुरुवार, ४ जूनला रात्री ८ वा. पाल्र्याच्या दीनानाथ नाटय़गृहात होणार आहेत. हे प्रयोग सर्व रसिकांसाठी विनामूल्य आहेत.

आयडियल क्लासेस, लोकसत्ता आयोजित ‘दहावीनंतर काय?’ चर्चासत्रास उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी

आयडियल क्लासेस आणि लोकसत्ता यांच्या संयुक्त विद्यमाने दहावीनंतर काय? या विषयावर मुंबईत ठिकठिकाणी आयोजित केलेल्या चर्चासत्रास विद्यार्थ्यांसह पालकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वांद्रे, मालाड, कांदिवली, गोरेगाव, चर्नीरोड, दादर येथे या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. १० वीनंतरचे कोर्स, कॉलेज, व्यावसायिक अभ्यासक्रम यांची निवड कशी करावी? कोणकोणते पर्याय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत, पालकांची मानसिकता कशी असावी अशा विविध मुद्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली. या चर्चासत्रात प्रा.मनीषा लोपेझ, प्रा.अशोक तिवारी, प्रा.सुचित पिंपुटकर, प्रा.राजेंद्र लोखंडे, प्रा.नेहल डगली, प्रा.रत्ना नांबीसान, प्रा.अँन्जेलीन, अँन्थनी यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. पुढील चर्चासत्र ६ व ७ जून रोजी बोरिवली, भाईंदर, दहिसर, नालासोपारा, डोंबिवली, वसई, विलेपार्ले, विरार येथे आयोजित करण्यात आले आहे. नाव नोंदणीसाठी ६५९५६८३३, ६५१७५४५३ या दूरध्वनी वा १८००२२३५४५ यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांसाठी ‘जिज्ञासा’ प्रकल्पाबाबत प्रशिक्षण कार्यशाळा
प्रतिनिधी

‘स्त्री मुक्ती संघटना’ आणि ठाणे येथील ‘इन्स्टिटय़ूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ’ या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई उपनगरांतील जागरुक पालक, नागरिक तसेच शेवटच्या वर्षांत शिकणारे महाविद्यालयीन व पदव्युत्तर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी १९, २० व २१ जून रोजी ‘जिज्ञासा’ प्रकल्पाबाबत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती स्त्री मुक्ती संघटनेच्या अध्यक्ष ज्योती म्हापसेकर आणि चिटणीस शारदा साठे यांनी पत्रकाद्वारे दिली. या प्रकल्पाद्वारे नवव्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांशी प्रशिक्षित संवादकांमार्फत नाटय़, गाणी, गोष्टी या माध्यमांचा वापर करत ‘कुमारवय’, ‘ताणतणावांशी सामना’, ‘मूल्यशिक्षण’, ‘तुमचे भविष्य तुमचा व्यवसाय’, ‘व्यसनविरोधी विचार’, ‘कुटुंबजीवन शिक्षण’ या विषयांबाबत संवाद साधण्यात यतो. १९९६ साली सुरू झालेल्या या प्रकल्पाच्या माध्यमातून आतापर्यंत पावणेचार लाख विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. या शिबिराचे प्रशिक्षण शुल्क ५०० रुपये असून अधिक माहिती व नावनोंदणीसाठी ‘३१, श्रमिक (रॉयल क्रेस्ट), लोकमान्य टिळक वसाहत मार्ग क्र. ३, दादर (पू.)’ या पत्त्यावर किंवा ६५७४५८४८, २४१७४३८१ या क्रमांकांवर किंवा वसंत खेडेकर (९८६९६९५६१६) यांच्याशी संपर्क साधावा.