Leading International Marathi News Daily

मंगळवार, २ जून २००९

माहिती आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करणार का?
राज्य माहिती आयोगाने शासनास केलेल्या शिफारशी
१. माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ च्या कलम ४ प्रमाणे मागील अहवालात शिफारस केल्याप्रमाणे बहुतांश सार्वजनिक प्राधिकरणामध्ये अधिनियमाचे कलम ४ प्रमाणे जी आबंधने आहेत त्या आबंधनाप्रमाणे कार्यवाही झालेली दिसून येत नाही. परिणामी, माहिती मागण्याच्या अर्जामध्ये बरीच वाढ झालेली आहे. २. कलम ४ च्या आबंधनामध्ये जन प्राधिकरण अभिलेखे योग्य रीतीने सूचिबद्ध करील आणि त्यांची निर्देश सूची तयार करील व ज्यांचे संगणकीकरण करणे योग्य आहे, असे सर्व अभिलेखे विशिष्ट कालावधीत व साधनसामग्रीच्या उपलब्धतेनुसार संगणकीकरण केले जातील असे पाहावयास मिळत आहेत, असे आढळून येत नाही.

‘ग्रीन एनर्जी’चे अवडंबर कशासाठी?

बिहारचा छोटा नागपूर, ओरिसाचा ‘केबीके’ म्हणून प्रचलित असलेला कालाहंडी-बोलंगीर-कोरापूट विभाग, मध्यप्रदेशचा बस्तर, बंगालच्या सुंदरबन सागरी बेटांचा परिसर, सिक्कीमसह सर्व पूवरेत्तर राज्ये, अंदमान, निकोबार व लक्षद्वीप, राजस्थानचा बारमेर जिल्हा तसेच महाराष्ट्रातील सातपुडय़ाचे खोरे किंवा नंदूरबारचा आदिवासी विभाग.. देशाचे सर्वाधिक मागासलेले, ‘बीमारू’; भूकबळींनी ग्रस्त असलेले आणि पोट जाळण्यासाठी जन्मदात्या आईला प्रसंगी पोटचा गोळा विकावा लागावा अशा दारूण घटनांमुळे प्रकाशझोतात आलेले हे भूभाग आहेत. शायनिंग इंडियावर काळीमा असणाऱ्या या क्षेत्रांना जोडणारा आणखी एक समान दुवा अलीकडच्या काळात पुढे आला आहे. हे भूभाग म्हणजे भारताच्या नव-विकासवादी धोरणाच्या ‘प्रयोगशाळा’ बनल्या आहेत.

लोणावळा चिक्कीचा जन्म
मुंबई-पुणे लोहमार्गाच्या निर्मितीचा प्रवास मोठा रंजक आहे. या प्रवासात अनेक रंजक सांस्कृतिक संदर्भ हाती लागतात. लोणावळा हे या प्रवासातलं महत्त्वाचं स्थानक. लोणावळा चिक्कीचं हे जन्मस्थान. चिक्कीसारखा साधा सोपा आणि खमंग खाद्यपदार्थ तिथेच का उगम पावला याची एक आख्यायिका इतिहासकार रंगवून सांगतात. ही रेल्वेलाइन टाकताना, विशेषत: बोर घाट बांधताना जे स्थानिक मजूर तिथे राबत होते, त्यांची कार्यक्षमता इंग्रज अभियंत्यांना असमाधानकारक वाटत होती. असं का, याच्या मुळाशी ते शिरले तेव्हा त्या अधिकाऱ्यांना जाणवलं की त्या भारतीय मजुरांचा स्टॅमिना फार कमी आहे. तो वाढवायचा तर त्यांना पोषक आहाराची जोड दिली पाहिजे. मग अशा आहाराचा शोध सुरू झाला. गरिबांचे काजू-बदाम समजले जाणारे शेंगदाणे आणि लोहयुक्त गूळ यांची ‘गुडदाणी’ त्या मजुरांना खायला दिली जाऊ लागली. तो पौष्टिक आणि खमंग खाऊ मजुरांच्या रसनेला तृप्त करत होता आणि शरीरालाही बळ देत होता. शिवाय हे दोन्ही घटक पदार्थ त्या भागात सहज उपलब्ध होते. त्या गुडदाणीच्या गोळ्यांची मागणी इतकी वाढत गेली की, बघता बघता तो एक व्यवसाय बनला. पुढे कालांतराने त्याचे सफाईदार चिक्कीत रुपांतर झाले. तेव्हापासून लोणावळा हे शेंगदाणा चिक्कीचे मोठे व्यापारकेंद्र बनले. पुढेपुढे त्यात वैविध्याची भर पडत गेली आणि लोणावळा चिक्कीच्या अनेक व्हरायटी बनू लागल्या. आजही मुंबई-पुणे प्रवास लोणावळा चिक्कीच्या खरेदीशिवाय पूर्ण होत नाही. इंग्रजांनी ही रेल्वे बांधायला घेतली ती त्यांचा कापसाचा व्यापार वाढवण्यासाठी. सैनिकांची ये-जा सुलभ आणि वेगवान करण्यासाठी. डलहौसीचे लोहमार्ग निर्मितीचे ते स्वप्न साकारणे हे मोठे आव्हानाचे काम होते. डोंगरदऱ्या कापत, बोगद्यातून धावणारी रेल्वेगाडी हे तत्कालीन भारतीयांसाठी मोठे आश्चर्यनिधान होते. केवळ ते पाहण्यासाठी विनाकारण मुंबई-पुणे प्रवास केला जायचा. पर्यटनाला तेव्हा फार अधिष्ठान नव्हते, तरी मुंबई-पुणे प्रवास हेच पर्यटन मानले जायचे. लोणावळा चिक्की, दिवाडकरांचा वडा असे त्या पर्यटनातील आकर्षक थांबे बनत गेले. आज डेक्कन क्वीनला स्वत:चं स्वयंपाकघर आहे, त्यात खाण्या-पिण्याची चंगळ आहे. सकाळ-संध्याकाळच्या प्रवासात क्षुधाशांती करण्याची शाही सोय त्या राणीच्या मुदपाकखान्यात आहे आणि तरीही लोणावळा आणि कर्जतचे खमंग वास येताच चिक्की आणि वडे घेण्याची परंपराही अबाधित आहे. मुंबई-पुणे वाहतूक क्रांतीला अशी सांस्कृतिक किनार आहे. एक्स्प्रेस वेने हा प्रवास जलद आणि अधिक सुकर केला. पण त्या मार्गाने लोणावळा चिक्कीला बायपास केले. आजही मुंबई-पुणे रेल्वे प्रवासाची मौज अनेकांना न्यारी वाटते. कारण रेल्वेने त्या खाद्यसंस्कृतीला बायपास केलेले नाही!
शुभदा चौकर