Leading International Marathi News Daily

बुधवार, ३ जून २००९

विलासरावांची तुतारी!
सत्तासंग्राम ०९

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे पडघम आताशा कुठे दूरवरून ऐकू येत आहेत तेवढय़ात विलासराव देशमुखांची ‘स्वबळा’ची तुतारी का बरे वाजली असावी ? या प्रश्नाचे वरवरचे उत्तर म्हणजे काँग्रेसने शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेला दबाववजा इशारा असला तरी या एका प्रश्नाला वेढूनच महाराष्ट्राच्या आगामी सत्तासंग्रामातील लढाया खेळल्या जाणार आहेत. काँग्रेसने आता स्वबळावर विधानसभा निवडणुका लढवाव्या, हे वक्तव्य विलासरावांनी पहिल्यांदाच केले आहे काय ?

तोडफोडीनंतर गड राखण्याचे शिवसेनेपुढे आव्हान!
परभणी मतदारसंघ
आसाराम लोमटे
परभणी विधानसभा मतदारसंघातील परभणी व पूर्णा या दोन शहरांमध्ये दलित-मुस्लिम मतदारांची संख्या निर्णायक असूनही हा मतदारसंघ सातत्याने शिवसेनेच्या हाती विजयाची पताका देतो. यामागचे रहस्य जसे सहजासहजी उमजणार नाही तसेच या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मताधिक्य असते यामागचे गणितही अनेकांना सुटणार नाही. विधानसभेला शिवसेनेला निवडून द्यायचे आणि लोकसभेला मात्र या मतदारसंघात आघाडी द्यायची ती काँग्रेसला असा हा अजब कौल आहे.

अमृतस्पर्शी विधानसभा
१९ जुलै १९३७ ला पार पडलेल्या शपथविधीनं अस्तित्वात आलेलं तत्कालीन मुंबई प्रांताचं, खेर मंत्रिमंडळाच्या नेतृत्वाखालचं सरकार ४ नोव्हेंबर १९३९ ला, एका तडकाफडकी देण्यात आलेल्या राजीनाम्यानं संपुष्टात आलं.. याला निमित्त झालं, ते मात्र ब्रिटिश सरकारचं भारतविरोधी धोरण.. भारतीय जनतेला विश्वासात न घेता ब्रिटिश सरकारनं भारताला युद्ध-राष्ट्र म्हणून घोषित केलं.. २५ ऑक्टोबर १९३९ ला त्याचा तीव्र निषेध करणारा, झाल्या घटनेविषयी तीव्र खेद व्यक्त करणारा, ठराव विधानसभेनं संमत केला आणि थेट राजीनामाच देऊ केला..

काँग्रेसला अडथळा राष्ट्रवादीचाच
नवापूर मतदारसंघ
रमेश चव्हाण
सातपुडा पवर्तराजीत वसलेला आदिवासीबहुल नंदुरबार जिल्हा आजवर काँग्रेसचा अभेद्य गड मानला जात असला तरी या गडाला लोकसभा निवडणुकीत खुद्द मित्रपक्षाच्या काही मंडळींकडून बसलेल्या हादऱ्यांचे परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीत जाणवणार आहेत. नवापूर विधानसभा मतदारसंघ हा त्या यादीतील सर्वात अग्रस्थानी असणारा मतदारसंघ म्हणावा लागेल. सलग सहा वेळा काँग्रेसच्या तिकीटावर भरभक्कम आघाडी घेवून सहज विजयी होणारे राज्याचे परिवहनमंत्री सुरूपसिंग नाईक यांचा हा मतदारसंघ. भाजप, शिवसेना व इतर पक्षांचा येथे फारसा प्रभाव नसल्याने खुद्द नाईक यांना कोणतीही निवडणूक अवघड ठरली नाही.

अशोकरावांची विलासरावांवर कुरघोडी तर फडणवीसांचे शिवसेनेला चिमटे!
मुंबई, २ जून / खास प्रतिनिधी

केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या अभिनंदनाचा विधानसभेत आज ठराव करण्यात आला. मात्र हा ठराव मांडताना मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विलासरावांवर कुरघोडी करण्याची संधी सोडली नाही, तर उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी निवडणुकीनंतर विलासराव पुन्हा येऊ शकतात, असे सांगत मुख्यमंत्र्यांना सावध केले. राष्ट्रीय पक्ष मजबूत झाले पाहिजेत या विलासरावांच्या विधानाचा उल्लेख करून भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला हलकेच चिमटे काढले. विलासरावांनीही मग गरज भासेल तेव्हा बोलवा मी तयारच आहे, असे सूचक उद्गार काढले.