Leading International Marathi News Daily

बुधवार, ३ जून २००९

(सविस्तर वृत्त)

पढेगाव-नेवासे रस्त्याचे काम करण्याचे आश्वासन
श्रीरामपूर, २ जून/प्रतिनिधी

विशेष रस्ते दुरूस्ती अंतर्गत पढेगाव- नेवासे रस्त्याचे काम प्राधान्याने हाती घेण्यात येईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाने दिल्यानंतर छावा संघटनेने आंदोलन मागे घेतले.

 

पढेगाव ते नेवासे रस्त्याची दुरूस्ती करावी, अशोकनगर ते कारेगाव, कारेगाव ते टाकळीभान व कारेगाव ते गुजरवाडी या रस्त्यांच्या कामास प्रारंभ न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा छावाने दिला होता. बांधकाम अधिकाऱ्यांनी संबंधित रस्त्यांची कामे करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित केल्याचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे व संजय माळी यांनी सांगितले.
ह्रदयरोग शिबिर
मानवी कल्याण सेवाभावी संस्थेच्या वतीने रविवारी (दि. ७) सकाळी १० ते ५ या वेळेत काचोळे विद्यालयात मोफत हृदयरोग व मणकेविकार शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिरात रुग्णांची तपासणी डॉ. बापूसाहेब कांडेकर, डॉ. सुरज धूत, डॉ. अजय साबळे, डॉ. पांडूरंग डौले, डॉ. विजय पाटील, डॉ. दीपक कुंकूलोळ करतील.
शिबिराचा गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष सुनील साळवे, भरत कुंकूलोळ, नानासाहेब देवकर यांनी केले आहे.
रत्नमाला झिरमिटे ऑस्ट्रेलियाला रवाना
प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी रत्नमाला भास्कर झिरमिटे या नुकत्याच ऑस्ट्रेलियाला रवाना झाल्या.