Leading International Marathi News Daily

बुधवार, ३ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

दीडशे पोलिसांच्या बदल्या
पंढरपूर, २ जून / वार्ताहर

 

सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील सुमारे दीडशे ते पावणे दोनशे पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या या प्रशासकीय कामानिमित्ताने केल्या असून जे काही कर्मचारी पंढरपूर शहर व तालुक्यात पाच ते आठ वर्षांपासून एनकेन कारणाने ठाण मांडून बसले आहेत. त्यांना इतरत्र ग्रामीण पोलीस अधीक्षक हलवणार काय हा खरा प्रश्न आहे.
नुकत्याच बदल्या झाल्या असून जे पोलीस बदली झालेले आहेत त्या ठिकाणी जाण्यास राजी आहेत. काहींनी बदलीचे ठिकाणी कामावर रुजू झाले परंतु गेली सहा ते आठ वर्षे झाली पंढरपूर शहर व तालुका पोलीस स्टेशन हे सोडण्यास राजी नाहीत हे लोक इतके चाणाक्ष आहेत. आपली बदली होत आहे हे कळताच घरातील कुणाला तरी एकाला आजारी पाडतात, राजकीय वशिला लावून आहे त्याच ठिकाणी राहण्याच्या खटाटोपीत आहेत.
काहीना तर इतके वर्षे राहिल्याने केवळ कामापेक्षा कमावण्यात धन्यता मानत असल्याने पंढरपुरातून त्यांना जाण्यास नको वाटत आहे. त्यामुळे जे पोलीस बदली झाले ते झालेल्या ठिकाणी रुजू झाले, ते प्रामाणिकपणे बदलीचे ठिकाणी गेले त्यांचेवर एकप्रकारे अन्यायच होत आहे. अशी भावना निर्माण झाली आहे.