Leading International Marathi News Daily

बुधवार, ३ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

विवाह सोहळ्यात १०० जणांना विषबाधा
मालेगाव, २ जून / वार्ताहर

 

विवाह सोहळ्यात बनविलेला उपमा खाल्ल्याने वधूसह १०० जणांना विषबाधा होण्याचा प्रकार आज सकाळी येथे घडला. या सर्वावर येथील ग्रामीण रुग्मालय आणि पालिकेच्या वाडिया रुग्णालयात उपचार करण्यात आले.
सर्व रुग्णांवरील धोका टळल्याने त्यांना नंतर रुग्णालयातून सोडून देण्यात आले. दुपारी आयोजित करण्यात आलेला विवाह सोहळा मग सायंकाळी उरकण्यात आला. मालेगाव कॅम्प भागात संगमेश्वरच्या ब्राम्हण समाज मंगल कार्यालयात सुभाष मोरे व सुनीता दराडे यांचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. सकाळी दहाच्या सुमारास वऱ्हाडी मंडळींना नाश्त्यामध्ये उपमा देण्यात आला. उपमा खाल्ल्यानंतर वऱ्हाडींना मळमळ, उलटय़ा तसेच पोटात आग होऊ लागली. त्यामुळे मंगल कार्यालयातून एकच गोंधळ सुरू झाला. काही वऱ्हाडींना जवळच असलेल्या वाडिया रुग्णालयात तर काहींना सटाणारोड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. विषबाधा झालेल्यांमध्ये वधू सुनीतासह ४५ महिला व १० बालकांचा समावेश होता. मोठय़ा संख्येने रुग्ण दाखल झाल्याने दोन्ही रुग्णालयांमध्ये खाटांची संख्या अपुरी पडली. त्यामुळे अनेकांवर वऱ्हाडय़ांतच उपचार करण्यात आले.