Leading International Marathi News Daily

बुधवार, ३ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

पर्यावरणदिनानिमित्त जळगावमध्ये ‘सृष्टी ९’ चे आयोजन
जळगाव, २ जून / वार्ताहर

 

मूळजी जेठा महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शाळा तसेच महाविद्यालयाच्या वतीने ‘सृष्टी ०९’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत जनजागृतीसाठी आयोजित विविध स्पर्धाना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे संचालिका चेतना नन्नावरे यांनी सांगितले.
‘सृष्टी ०९’ हा कार्यक्रम सकाळी १० ते दुपारी १ दरम्यान होणार असून यात माझा आवडता पक्षी व माझे आवडते फुल या विषयावरील पोस्टर स्पर्धा, ६ ते १० वयोगटासाठी प्रदुषणाचा धोका आणि वातावरणीय बदलांचे दुष्परिणाम या विषयांवर ११ ते १५ वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा होईल. पृथ्वीवर वृक्ष नसतील तर, मी आणि माझ्या घरचे पर्यावरण, पर्यावरण संरक्षण-काळाची गरज व जलसंवर्धनात माझा सहभाग किंवा योगदान या विषयावर निबंध स्पर्धा आयोजिली असून पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या संस्था व कार्यकर्त्यांनाही या उपक्रमात सन्मानित करण्यात येणार आहे. उपक्रमांतर्गत पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती करणाऱ्या पत्रकारांनाही विशेष पुरस्कृत करण्यात येणार आहे. उपक्रमात पर्यावरणीय चित्रपट व माहिती पटांचा महोत्सवही आयोजित करण्यात आला आहे. पर्यावरणप्रेमी नागरिकांनी या कार्यक्रमास मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नन्नावरे यांनी केले आहे.