Leading International Marathi News Daily

बुधवार, ३ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

सिंधुदुर्गात वळवाचा पाऊस
सावंतवाडी, २ जून/वार्ताहर

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुपारी मान्सूनपूर्व वळवाचा पाऊस कोसळला. आकाशात ढग जमा झाल्याने वाजतगाजत पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त केली होती. मात्र काही वादळसदृश स्थितीत पाऊस कोसळला. शेतकरी वर्ग मान्सूनपूर्व पावसाच्या प्रतीक्षेत होता. भाततरवा पेरणी पावसाअभावी जळून जाण्याची भीती होती. या पावसाने काही प्रमाणात शेतकरी वर्ग समाधान व्यक्त करीत आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी हा पाऊस कोसळला. त्यानंतर पावसाळी वातावरण आकाशात होते, मात्र पावसाला जोर नव्हता.
आरवली-वेळागर समुद्रात तरुण बुडाला
आरवली-वेळागर समुद्रात राकेशकुमार वर्मा (२२) हा तरुण बुडाला. तो उत्तर प्रदेशचा होता. बेळगाव येथील के.एल.ई. सोसायटीच्या वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी होता. त्याच्यासह सात विद्यार्थी आणि तीन विद्यार्थिनी पर्यटनासाठी समुद्रकिनारी आले होते. वर्मा आंघोळीसाठी समुद्रात उतरला होता.