Leading International Marathi News Daily
बुधवार, ३ जून २००९
  आंतरराष्ट्रीय विकास क्षेत्रातील संधी
वर्ल्ड बँकेतील करिअर्स
  करिअर सल्ला
पैलूदार अन् बावन्नकशी!
  करिअर नामा
यू-टय़ूबची महती
  स्कॉलरशीप
न्यूझीलंडमधील उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती
  मोठी स्वप्नं
  संशोधनगाथा
संशोधन लेखकाचा हेतू
  स्पर्धा परीक्षांचे जग
बी.एड्. सीईटी
  स्वयंरोजगार
उद्योगाच्या यशस्वितेसाठी..
  शालेय शिक्षणात ग्रंथालयांचा वापर

करिअर सल्ला
पैलूदार अन् बावन्नकशी!
मी अकरावीची परीक्षा दिली असून मला जेमॉलॉजीबद्दल माहिती द्यावी?
- संदीप कोळी
रत्नशास्त्र म्हणजे जेमॉलॉजी. ही रत्नांचा, मौल्यवान खडय़ांचा अभ्यास करणारी मिनरॉलॉजीची एक शाखा आहे. यात रत्नांची पारख करणे, पैलू पाडणे, कृत्रिमरीत्या रत्न तयार करणे, पॉलीश करणे, अनमोल धातू (सोने, चांदी इ.) व मिश्रधातू यांचे स्रोत व उगमस्थान शोधणे, त्यांचे स्रोत वर्गीकरण व मूल्यांकन करणे यांसारख्या गोष्टी येतात.
रत्नांच्या अभ्यासात त्यांचे वर्गीकरण करणे ही पहिली पायरी असते. त्यानंतर त्याच्या भौतिक व प्रकाशीय गुणधर्माविषयी जाणून घ्यावे लागते. रत्नांना पैलू पाडणे, वर्गीकरण करणे, दर्जा ठरवणे, त्यांचे मूल्यांकन करणे, संगणकाच्या मदतीने त्यांचे आकर्षक पॅटर्न तयार करणे, रत्नविषयक सल्ला देणे, विक्री करणे अशा अनेक विषयांचे शिक्षण घेता येते. त्यात स्पेशलायझेशन प्राप्त करता येते.
जेमॉलॉजीमध्ये कामाच्या तसेच रोजगाराच्या दृष्टीने निर्मिती, डिझाइन, मार्केटिंग असे विभाग पडतात.
 

निर्मिती विभागामध्ये खालीलप्रमाणे काम करता येते.
१) जेमॉलॉजिस्ट : मौल्यवान खडय़ांचा प्रकार, आकार व वजन बघणे हे यांचे काम असते. प्रक्रिया करून रत्नांचा रंग बदलणे किंवा त्यांचे सादरीकरण बदलणे हेदेखील जेमॉलॉजिस्टचेच काम असते.
२) जेम ग्राइंडर : मौल्यवान खडय़ांना, रत्नांना आवश्यक त्या आकारात आणण्याचे काम जेम ग्राइंडर करतात. याकरिता अत्याधुनिक अवजारांचा उपयोग केला जातो. रत्न घासताना सातत्याने त्याकडे लक्ष द्यावे लागते. छोटीशी चूकदेखील चांगले रत्न मातीमोल करू शकते.
३) जेम पॉलिशर : आवश्यकतेनुसार रत्नांचा मशीनद्वारे व हाताने चकाकी आणण्याचे काम जेम पॉलिशरला करावे लागते.
४) जेम सॉर्टर अ‍ॅण्ड सेटर : जेम सॉर्टर उपलब्ध असलेल्या खडबडीत खडय़ांमधून रत्न शोधून त्यांचे वर्गीकरण करतात व त्याला योग्य आकार देण्यासाठी पाठवतात. जेम सेटर रत्नांना आभूषणामध्ये डिझाइनप्रमाणे बसवण्याचे काम करतात.
५) एनग्रेव्हर : सृजनशील कामाची दृष्टी व बारकाईने काम करण्याचे कसब असणे या कामासाठी आवश्यक आहे. रत्नावरील कोरीव काम करून त्यातून अक्षरे वा विविध आकार साकारण्याचे काम एनग्रेव्हर करतात.
डिझाइन : यामध्ये निरनिराळ्या रत्नांची विविध दरांमधील सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी पारंपरिक तसेच आधुनिक आदी सर्व प्रकारच्या रत्नालंकाराची डिझाइन्स तयार करावी लागतात. एक्स्पोर्ट हाऊसेसमध्ये यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी मागणी आहे.
मार्केटिंग : देशांतर्गत विक्री व निर्यात या दोन्ही ठिकाणी वरील क्षेत्रात कामाच्या भरपूर संधी आहेत. मात्र यासाठी रत्न व ज्वेलरीसंबंधातील इत्थंभूत माहिती असणे आवश्यक आहे. रत्नांची शास्त्रीय माहिती देणे, आभूषणाची व्यवस्थित मीमांसा करणे, किमतीचे विवरण देणे, रत्न व दागिन्यांची घ्यायची काळजी याबद्दल माहिती देणे, ग्राहकांची आवड व क्रयशक्ती जोखून योग्य दागिने दाखवणे आदी गोष्टींचा या कामामध्ये अंतर्भाव असतो. मात्र संवादकौशल्य व माणसांची चांगली पारख असणे आवश्यक आहे.
संस्था व अभ्यासक्रम : जेमॉलॉजिकल इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया, मुंबई. १९७१ मध्ये जेम अ‍ॅण्ड ज्वेलरी एक्स्पोर्ट असोसिएशनच्या वतीने या ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर चालणाऱ्या संस्थेची स्थापना झाली. जेमॉलॉजिकल असोसिएशन ऑफ ग्रेट ब्रिटनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या एफ. जी. ए. (लंडन) या परीक्षेकरिता विद्यार्थ्यांना इथे प्रशिक्षित केले जाते तसेच या परीक्षेचे जी. आय. आय. मान्यताप्राप्त केंद्र आहे.
या संस्थेमधून खालील विषयांसाठी अभ्यासक्रम चालवले जातात.
जेमॉलॉजी
डायमंड ग्रेडिंग कोर्स
जेमॉलॉजी (पत्राद्वारे)
ज्वेलरी डिझायनिंग बेसिक कोर्स
ज्वेलरी डिझायनिंग अ‍ॅडव्हान्स कोर्स
शॉर्टटर्म डायमंड कोर्स
शॉर्टटर्म जेमॉलॉजी कोर्स
ज्वेलरी कॉस्टिंग कोर्स
पर्ल कोर्स
संपर्क : जेमॉलॉजिकल इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया, ३०४, ५०३ सुखसागर बिल्डिंग, एन. एस. पाटकर मार्ग, ऑपेरा हाऊस, मुंबई- ४००००७. दूरध्वनी- ०२२- २३६१२७६९, www.giionline.com
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ जेमॉलॉजी
वरील संस्थेची १९९१ ला स्थापन झाली असून ती इंडियन डायमंड इन्स्टिटय़ूट सोसायटी (भारत सरकार पुरस्कृत) व पीएच.डी. चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीची सदस्य आहे. या संस्थेमध्ये खालील अभ्यासक्रम चालवले जातात.
जेम आयडेंटिफिकेशन अ‍ॅण्ड कलर स्टोन्स.
अ‍ॅडव्हान्स जेम आयडेंटिफिकेशन कोर्स.
डायमंडस् अ‍ॅण्ड डायमंड ग्रेडिंग कोर्स.
संपर्क : १०९८०, ईस्ट पार्क रोड, करोलबाग, नवी दिल्ली- ११०००५. दूरध्वनी : ०११-२३५२०९७४. www.iigdelhi.com
इंडियन डायमंड इन्स्टिटय़ूट
या संस्थेमधून खालील अभ्यासक्रम चालवले जातात.
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डायमंड टेक्नॉलॉजी.
डिप्लोमा इन डायमंड प्रोसेसिंग.
डिप्लोमा इन डायमंड ट्रेड मॅनेजमेंट.
डिप्लोमा इन जेमॉलॉजी.
प्रमाणपत्र अभ्यासक्रम
इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ डायमंड ग्रेडिंग.
ग्रेडिंग
कटिंग
पॉलिशिंग
ब्रुटिंग
हार्डशेप ग्रुव्हिंग
कलर जेम स्टोन कटिंग अ‍ॅण्ड पॉलिशिंग.
कोर्स इन ज्वेलरी डिझाइन अ‍ॅण्ड मशीनकास्ट ज्वेलरी.
संपर्क : कातरगाम, जी. आय. डी. सी., सुमुलडेअरी, सुरत- ३९५००८. गुजरात. दूरध्वनी- ०२६१- ७४८०८०९/ ७४८१८२२. वेबसाइट- www.diamondinstitute.net
सेंट झेवियर्स कॉलेज (महापालिका मार्ग, मुंबई-१) या संस्थेमध्ये खालील अभ्यासक्रम चालवले जातात.
डिप्लोमा इन जेमॉलॉजी (कालावधी- तीन महिने).
सर्टिफिकेट कोर्स इन डायमंड ग्रेडिंग (कालावधी- एक महिना).
सर्टिफिकेट कोर्स इन ज्वेलरी डिझायनिंग (कालावधी- तीन महिने).
झवेरी सेंटर फॉर डायमंड टेक्नॉलॉजी
या संस्थेमध्ये १२ वीनंतर डायमंड टेक्नॉलॉजीचा एक वर्षांचा डिप्लोमा चालवला जातो.
संपर्क- भगुभाई पॉलिटेक्निक, ईर्ला, जुहू रोड, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई.
आनंद मापुस्कर
फोन : ०२२-३२५०८४८७.