Leading International Marathi News Daily
बुधवार, ३ जून २००९
  आंतरराष्ट्रीय विकास क्षेत्रातील संधी
वर्ल्ड बँकेतील करिअर्स
  करिअर सल्ला
पैलूदार अन् बावन्नकशी!
  करिअर नामा
यू-टय़ूबची महती
  स्कॉलरशीप
न्यूझीलंडमधील उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती
  मोठी स्वप्नं
  संशोधनगाथा
संशोधन लेखकाचा हेतू
  स्पर्धा परीक्षांचे जग
बी.एड्. सीईटी
  स्वयंरोजगार
उद्योगाच्या यशस्वितेसाठी..
  शालेय शिक्षणात ग्रंथालयांचा वापर

करिअर नामा
यू-टय़ूबची महती
भाग - १
ज्याला इंटरनेट माहित्येय, गुगल माहीत आहे, त्याला ‘यू-टय़ूब’ नक्कीच माहीत असणार, पण ज्यांना त्यावर फक्त व्हीडीओ क्लिप पाहायला मिळतात. जे फक्त टाइमपास किंवा एंटरटेन्मेंटसाठी आहे असं वाटते, ते एज्युकेशनलही आहे. ते कसे? ते आपण आता पाहणार आहोत-
पेपालमधले तिघेजण बाहेर पडले आणि त्यांनी फेब्रुवारी २००५ मध्ये यू-टय़ूबची स्थापना केली. अवघ्या काही महिन्यांत इतका विस्तार व प्रचार झाला की, नोव्हेंबर, २००६ मध्ये गुगलने यू-टय़ूबला ‘टेकओव्हर’ केले.
आजच्या घडीला लर्निगच्या १०० टूल्स म्हणजे साधनांमध्ये यू-टय़ुबचा १७ वा क्रमांक लागतो. आणि शंभर वर्कप्लेस
 

लर्निगमध्ये २९ वा नंबर लागतो. जगभरातील कानाकोपऱ्यातून प्रतिदिनी ६५,००० नवीन व्हीडीओ या ‘यू-टय़ूब’वर अ‍ॅड केल्या जातात. तर एका महिन्याला किमान २० मिलियन व्ह्य़ूवर्सतर्फे ही साईट बघितली जाते.
‘यू-टय़ूब’ ही तर एका साध्या सोप्या संकल्पनेवर उभारण्यात आली आहे. तुम्ही तुमची व्हीडीओ या पोर्टलवर टाकू शकता जी जगभरातील लोक पाहू शकतील आणि आपली प्रतिक्रिया नोंदवू शकतली. खरे तर हे मानवी स्वभावाचा अभ्यास करून तयार केलेले आहे. कारण आपली हुशारी साऱ्या जगाने पाहावी आणि आपले कौतुक करावे असे प्रत्येकालाच कमी-जास्त प्रमाणात वाटत असते. ही प्रवृत्तीच यू-टय़ूबच्या जगव्यापी, घवघवीत यशास कारणीभूत ठरलेली आहे. चावडीवरच्या गप्पा, पारावरच्या गजालीप्रमाणे इंटरनेटवरील यू-टय़ूब हे स्वत:साठी व लोकांसाठी ‘प्रेक्षणीय स्थळ’ झाले आहे. आज जगभरात याहू, गुगलखालोखाल यू-टय़ूब हे तिसऱ्या क्रमांकावर आहे, यातच त्याचे महत्त्व लक्षात येते.
यू-टय़ूबचे स्वरूप
यू-टय़ुबवर एकूण आठ चॅनेल्स-म्हणजेच विभाग आहेत. कॉमेडियन, डायरेक्टर, गुरू, म्युझिशियन, नॉन-प्रॉफिट, रिपोर्टर पोलिटिशिअन्स, यू-टय़ूबवर सतत यू-टय़ूब पाहणारे, म्हणजे विनोदवीर, दिग्दर्शक, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ-गुरुपातळीवरील मंडळी, संगीतकार, जगभरातील एनजीओज्, कोणीही वार्ताहार- बातमीदार आणि राजकारणी-याचा सार्वत्रिक वापर-तोही विनाशुल्क करू शकतात.
व्हीडीओचा दर्जा- आपण जो व्हीडीओ पाहतो, त्याचे आपण मूल्यांकन करू शकतो. त्याआधी चार विभागांत ते मोडतात. आज, हा आठवडा, हा महिना आणि सर्व काळ पाहता येण्याजोगे. दर्जा देताना- फीचर्ड, राईझिंग व्हीडीओज, मोस्ट डिस्कस्ड, मोस्ट व्ह्य़ूड, टॉप फेव्हरिट, मोस्ट पॉप्युलर, मोस्ट रिस्पाँडेड, टॉप रेटेड- अशा प्रकाराने वर्गवारी-प्रतवारी होऊ शकते.
जागतिक संपर्काचे साधन: यू-टय़ूबचा प्रचार आणि प्रसार हा किती प्रभावशाली आहे, हे जर जाणून घ्यायचे असेल तर कॉमेडियन जुडसन लिपलोचे उदाहरण देता येईल. त्याची सहा मिनिटांची व्हीम्डीओ क्लीप जगभरातील ४१ मिलियन लोकांनी पाहिली आहे.
इतकेच कशाला अमेरिकेचे सध्याचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी आपली निवडणूक लढवताना यू-टय़ूबच्या विस्तृत जाळ्याचा संपर्कासाठी उपयोग केला होता. आपल्या निवडणूक मोहिमेंतर्गत यू-टय़ूबला खूपसे प्राधान्य दिले होते. त्यांनी एकूण १८०० व्हीडीओज् वापरले आणि ते ११० दशलक्ष लोकांनी बघितले (म्हणून त्यांना यू-टय़ूब प्रेसिडेंट म्हटले जाते.) अमेरिकेसारख्या महाकाय देशात निवडणूक लढवण्यासाठी या आधुनिक तंत्राचा कार्यक्षमतेने वापर केला गेला. अर्थात आपल्या राजकारण्यांनी, राजकीय पक्षांनीदेखील यू-टय़ूबवर आपली प्रतिमा उजळवली होती!
आजच्या घडीला इंटरनेट हे सर्वाधिक प्रमाणात वापरले जाते. वेब ट्रॅफिक हा रोडट्रॅफिकइतकाच वर्दळीचा झालेला आहे. (कारण कुठल्याही ऑफीसचे पान, हे गुगलचं पेज उघडय़ाखेरीज हालतच नाही, अशी स्थिती आहे!) यू-टय़ूबच्या ट्रॅफिकविषयीचा खालील तक्ताच खूप बोलका आहे.
तक्ता : यू-टय़ूबवर प्रत्येक सेकंदाला सहा तासांचे व्हीडीओज् ‘अपलोड’ होतात.
- एकूण वेबट्रॅफिकच्या १०टक्के ट्रॅफिक ही यू-टय़ूबसाठी असते.
-यू-टय़ूबला प्रतिदिन ७५ अब्जे ई-मेल्सचा ओघ चालू असतो.
खुद्द यू-टय़ूबच्या फाऊंडर्सना-स्टीव्ह चेन आणि चॅड हर्ली, जावेद करीम यांना देखील अशा विक्रमी लोकप्रियतेची आधी कल्पना नसेल! अमेरिकन अध्यक्ष ओबामा दर आठेत. यू-टय़ूबवर- व्हीडीओ क्लिप्स, मूव्ही क्लिप्स, टीव्ही प्रोग्रॅम्सचे क्लिप्स आणि म्युझिकल व्हीडीओज ‘अपलोड’ करू शकता. नोव्हेंबर २००८ नंतर पूर्ण लांबीचे सिनेमे, ‘अपलोड’ केले जात आहेत. एमजीएम, लायन्स गेट इंटरनॅशनल अशा नामांकित सिनेमा कंपन्यांचे सहकार्य घेतले आहे. बीबीसी व सीबीएससारख्या मीडिया कॉर्पोरेशन्सदेखील आपले काही कार्यक्रम या साईटद्वारे दाखवतात. अनेकदा हौशी क्लिपिंग्जचे प्रमाण अधिक असते. आणि जाहिराती तर असायलाच हव्यात!
रजिस्टर्ड युझर्स- हे अमर्यादीत व्हीडीओज अपलोड करू शकतात.
अनरजिस्टर्ड युझर्स- यांच्या व्हीडिओ अपलोड करण्यावर नियंत्रण असते.
रजिस्टर्ड युझर्सच्या खात्याला ‘चॅनेल्स’ असे संबोधले जाते.
डिफेमेशन, पोर्नोग्राफी, कॉपीराईटचा हक्कभंग होईल किंवा क्रिमिनल गोष्टीस प्रोत्साहन देणाऱ्या व्हीडीओजना यू-टय़ूबवर ‘बंदी’ आहे.
राजीव जोशी
rjoshi@gols.in