Leading International Marathi News Daily
बुधवार, ३ जून २००९
  आंतरराष्ट्रीय विकास क्षेत्रातील संधी
वर्ल्ड बँकेतील करिअर्स
  करिअर सल्ला
पैलूदार अन् बावन्नकशी!
  करिअर नामा
यू-टय़ूबची महती
  स्कॉलरशीप
न्यूझीलंडमधील उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती
  मोठी स्वप्नं
  संशोधनगाथा
संशोधन लेखकाचा हेतू
  स्पर्धा परीक्षांचे जग
बी.एड्. सीईटी
  स्वयंरोजगार
उद्योगाच्या यशस्वितेसाठी..
  शालेय शिक्षणात ग्रंथालयांचा वापर

स्कॉलरशीप
न्यूझीलंडमधील उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती
अतुलनीय सृष्टीसौंदर्यं आणि पर्यटनाचे एक विलक्षण ठिकाण यासाठी न्यूझीलंडची ख्याती आहेच. पण अलीकडच्या काळात या देशातील उच्च व प्रगत शिक्षणाच्या उत्तमोत्तम सोयीही जगभरातून नावाजलेल्या जात आहेत. न्यूझीलंडमध्ये आठ सरकारी अनुदानित विद्यापीठे असून, पदवीपूर्व आणि पदव्युत्तर शिक्षणाची व्यवस्था त्यांच्याकडून पाहिली जाते. या शिवाय, सरकारी अनुदानित २५ पॉलिटेक्निक्स आणि तंत्रशिक्षण संस्था यामधून प्रगत व्यावसायिक शिक्षणाच्या जवळपास सर्वच अंगांना स्पर्श केला जातो. शिवाय येथील महानगरे म्हणजे केवळ गगनचुंबी इमारती आणि आलिशान मॉल्सचा झगमगाट नव्हे, तर मातीच्या सुगंधाचा दरवळ असलेली शेते व हिरवाईच्या सहजीवनात
 

शिक्षणासाठी येथे एक अत्यंत आदर्श वातावरण झाल्याचे पाहायला मिळते.
न्यूझीलंडमध्ये उच्च शिक्षणाची संधी मिळणे ही खरे तर पर्वणीच ठरावी. आता तर न्यूझीलंड सरकारने आपल्या शैक्षणिक व्यवस्थेच्या जगभरात प्रचार-प्रसारासाठी विदेशातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीही जाहीर केली आहे. न्यूझीलंडमध्ये जाऊन पीएच्. डी./ मास्टर्स/ पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम करू इच्छिणाऱ्या तीन भारतीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची ही संधी प्रदान केली जाईल. यापैकी एक ही पीएच्. डी.साठी तर दोन शिष्यवृत्ती ही मास्टर्स/ पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी आहे.
शिष्यवृत्तीसाठी काही विषयही निश्चित केली गेली आहेत. त्यात अक्षय्य ग्रामीण जीवनशैली (पशुधन, वनसंपदा, मत्स्य व फळफळावळ यांसह), शिशूंचे शिक्षण, द्वैभाषिक शिक्षण, शिक्षण व्यवस्थापन आणि प्राथमिक आरोग्य आदींचा समावेश आहे.
पी. एच्डी. साठी शिष्यवृत्ती प्राप्त करण्यासाठी अर्जदाराची किमान पात्रता म्हणजे भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून अक्षय्य ग्रामीण जीवन किंवा प्राथमिक आरोग्य या विषयात किमान ६० टक्के गुणांसह उमेदवाराने पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. तर मास्टर्स आणि पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवाराने वरील नमूद विषयापैकी कोणत्याही विषयातून पदवी अभ्यासक्रम किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेला असावा. शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांने मात्र सबंधित विषयात न्यूझीलंडमधील शिक्षणसंस्थेत प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण केलेली असावी.
शिष्यवृत्तीचे मूलत: न्यूझीलंडपर्यंत येण्याजाण्याचा सर्वात अल्पखर्चिक विमान प्रवासाचा (इकॉनॉमी श्रेणीचा) खर्च; त्याचप्रमाणे तेथील निवास व भोजनाचा खर्च, पुस्तके व
अन्य शैक्षणिक साहित्याचा खर्च, शिक्षणासांंधी त्या देशांतर्गत कराव्या लागणाऱ्या प्रवासाचा
खर्च आणि वैद्यकीय निगेचा खर्च वगैरेसाठी येणारी रक्कम ही न्यूझीलंड सरकारकडून
अदा केली जाईल. पीएच्. डी. अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीचा कालावधी हा तीन वर्षांचा
असून, विद्यार्थ्यांच्या विनंतीनुरूप त्याला
आणखी एका वर्षांची मुदतवाढ मिळविता येऊ शकेल. या व्यतिरिक्त अन्यथा मंजूर होणारी शिष्यवृत्ती ही अभ्यास अथवा संशोधनाच्या
विहित कालावधीपुरती असून, ती लाभार्थी विद्यार्थ्यांची प्रगती आणि त्या देशातील
व्यवहार समाधानकारक आहे याची
चाचपणी करूनच अदा केली जाईल. परंतु वरीलपैकी कोणत्याही शिष्यवृत्तीचा लाभ
चार वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी दिला जाणार नाही.
या शिष्यवृत्तीसाठी कमाल वयोमर्यादा ही ४० वर्षांची असून, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १५ जून २००९ अशी आहे.
शिष्यवृत्ती अर्जाचे १५ जूनपर्यंत ऑनलाइन सादरीकरणही करता येईल. मात्र ऑनलाइन अर्जासोतच, प्रमाणपत्र, गुणपत्रिका यांच्या नक्कली प्रती व अर्जाची प्रत प्रत्यक्ष रूपात विहित पत्त्यावर १५ जूननंतरच्या तीन दिवसांचा आत पोहचणे जरूरीचे आहे. ऑनलाइन अर्जासांंधी अन्य कोणत्याही शंकांचे निरसन scholarship.edu@nic.in या ई-मेलवर संपर्क साधून करता येऊ शकेल.
अर्ज पाठविण्याचा पत्ता:
कक्ष अधिकारी (ईएस. ४ कक्ष),
शिष्यवृत्ती विभाग,
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय,
उच्च शिक्षण विभाग,
ए२/ डब्ल्यू ४, कर्झन रोड बरॅक्स,
कस्तुरबा गांधी मार्ग, नवी दिल्ली- ११०००१.
चंद्रगुप्त अमृतकर
ग्लोबल फीचर्स/ globalfeatures@lycos.com