Leading International Marathi News Daily
बुधवार, ३ जून २००९
  आंतरराष्ट्रीय विकास क्षेत्रातील संधी
वर्ल्ड बँकेतील करिअर्स
  करिअर सल्ला
पैलूदार अन् बावन्नकशी!
  करिअर नामा
यू-टय़ूबची महती
  स्कॉलरशीप
न्यूझीलंडमधील उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती
  मोठी स्वप्नं
  संशोधनगाथा
संशोधन लेखकाचा हेतू
  स्पर्धा परीक्षांचे जग
बी.एड्. सीईटी
  स्वयंरोजगार
उद्योगाच्या यशस्वितेसाठी..
  शालेय शिक्षणात ग्रंथालयांचा वापर

मोठी स्वप्नं
जेव्हा एखादा माणूस सारखं सारखं आपलं स्वप्नं मनात आणत राहतो तेव्हा त्याचं अंतर्मन त्याला ते प्राप्त करण्याचे मार्ग दाखवून देतं. मोठी माणसं केवळ मोठी स्वप्नं पाहण्याचे काम करत नाहीत तर ते साकारण्याच्या दिशेने सतत प्रयत्नशील असतात. डोनाल्ड ट्रम्प हे एक असं जबरदस्त व्यक्तिमत्त्वाचं उदाहरण आहे ज्यांनी मोठय़ा स्वप्नांचं महत्त्व जगाला पटवून दिलं. ते आपल्या मार्गदर्शनातून नेहमी सांगतात की मी मोठी स्वप्नं पाहण्याची आवड निर्माण केलेली आहे. जर आपण रोज स्वप्नं पाहतच असतो तर मग ती मोठी का पाहू नये. १९९० साली डोनाल्ड ट्रम्प यांची परिस्थिती इतकी वाईट होती की त्यांच्या डोक्यावर ९० कोटी डॉलर्सचं कर्ज होतं. त्याचबरोबर डायव्होर्स घेतलेल्या त्यांच्या पत्नीने दोन बिलियन डॉलर्सची सेटलमेंटची रक्कम मागितली होती. पण आपल्या जिद्दीच्या व कर्तृत्वाच्या जोरावर त्या भयंकर
 

परिस्थितीतून बाहेर येऊन त्यांनी जगातील पाचशे पहिल्या श्रीमंत लोकांच्या यादीत स्वत:चे स्थान पक्के केले.
डोनाल्ड ट्रम्प यांचा जन्म १९४६ साली क्वीन्स येथे न्यूयॉर्क शहरात झाला. त्यांचे वडील निर्माण क्षेत्रात प्रवीण होते आणि विशेष करून ते रियल इस्टेट डेव्हलपर होते. एकंदरीत डोनाल्ड यांच्या संपूर्ण परिवारातच रियल इस्टेट संदर्भातील वातावरण होते त्यामुळे त्या संदर्भातील बऱ्यापैकी माहिती डोनाल्ड यांना लहानपणीच मिळाली होती. आपण लहान व तरुण वयात जे जे काही थोडय़ा अधिक प्रमाणात शिकत असतो त्याचा खूप खूप फायदा कालांतराने आपण निवडलेल्या क्षेत्राकरिता होत असतो. डोनाल्ड यांनी मोठेपणी रियल इस्टेटमध्ये जी गुंतवणूक केली त्याकरिता त्यांना लहानपणी मिळालेल्या ज्ञानाचा खूप फायदा झाला. जी काही संपत्ती त्यांनी या क्षेत्राचा आधार घेऊन मिळवली त्याकरिता त्यांनी फार दूरवरचा विचार केला होता. प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन जो माणूस साहसी वृत्ती दाखवतो त्याला मोठं यश मिळतंच हे त्यांचं म्हणणं असायचं.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या माध्यमातून ‘मोठे लक्ष्य’ साध्य करण्यास झपाटलेल्या माणसाचे दर्शन जगाला होते. वाईट परिस्थिती असताना आपण हलाखीच्या परिस्थितीत आहोत हे जगाला दिसलेच नाही पाहिजे. त्यांचं म्हणणं असायचं की कुठल्याही अवस्थेत माणसाने श्रीमंत व सामथ्र्यवान दिसलं पाहिजे. वाईट परिस्थितीतून बाहेर पडण्याचा पक्का निर्धार करायला हवा. ते म्हणत की जेव्हा माझ्या डोक्यावर मोठं कर्ज होतं ते रस्त्यावर दिसणारा भिकारीदेखील माझ्यापेक्षा मला खूप श्रीमंत जाणवायचा म्हणून माझ्या स्वगतातून मी स्वत:ला बाहेर काढण्याचा पक्का निश्चय केला.
मंदीमध्ये न्यूयॉर्क शहरातील जागांचे भाव खूपच खाली आले होते तेव्हा डोनाल्ड यांनी ते विकत घेण्याचे साहस केले. त्यांना विश्वास होता की, मंदी जाताच आपल्याला त्याचा खूप फायदा होईल आणि अगदी तसेच झाले. जेव्हा लोक परिस्थितीला घाबरून विकाविकी करतात तेव्हा डोनाल्डसारखी माणसं खरेदी करण्यासाठी उतावळी असतात. चांगल्या परिस्थितीत सर्वच खरीददार पुढे येतात. तेव्हा स्वस्तात घेतलेल्या गोष्टीला चांगला भाव मिळतो. यालाच म्हणतात प्रवाहाविरुद्ध जाणं. आज ट्रम्प यांचं नाव असलेल्या असंख्य गगनचुंबी इमारती न्यूयॉर्कमध्ये पाहायला मिळतील. आज ध्येयवेडा एक मोठा समुदाय डोनाल्ड यांचे विचार व मार्गदर्शन नियमित ऐकण्यास उत्सुक असतो.
‘‘काही लोक अशक्य गोष्ट
शक्य करतात याचं कारण ती
गोष्ट अशक्य आहे हे मुळातच त्यांना ठाऊक नसतं.’’ डोनाल्ड पुढे सांगतात की, ‘‘हे युग ‘माहिती’चे असले
तरीही कृती आणि ‘टायमिंग’ आजही सर्वाच्या पुढे आहे.’’ डोनाल्ड यांची ैळँी अस्र्स्र्१ील्ल३्रूी' ही मालिका आजही गाजते आहे. जनतेला आणि गुंतवणूकदारांना आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या आणि जिद्दीच्या बळावर आकर्षित करण्याचे
जबरदस्त तंत्र ट्रम्प यांना आजही अवगत आहे. ते जगाला सुचवतात की, जी माणसं प्रबळ इच्छेशिवाय काम करत राहतात ती माणसं आपल्या साऱ्या शक्तीचा ऱ्हास करत असतात. ध्येयप्राप्तीसाठी माणसाने झपाटून
गेलं पाहिजे.
विलास मुणगेकर
९८९२०७८७१३