Leading International Marathi News Daily
बुधवार, ३ जून २००९
  आंतरराष्ट्रीय विकास क्षेत्रातील संधी
वर्ल्ड बँकेतील करिअर्स
  करिअर सल्ला
पैलूदार अन् बावन्नकशी!
  करिअर नामा
यू-टय़ूबची महती
  स्कॉलरशीप
न्यूझीलंडमधील उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती
  मोठी स्वप्नं
  संशोधनगाथा
संशोधन लेखकाचा हेतू
  स्पर्धा परीक्षांचे जग
बी.एड्. सीईटी
  स्वयंरोजगार
उद्योगाच्या यशस्वितेसाठी..
  शालेय शिक्षणात ग्रंथालयांचा वापर

संशोधनगाथा
संशोधन लेखकाचा हेतू
लेखन हा संज्ञापनाचा भाग आहे आणि संज्ञापनाचा प्रत्येक भाग लेखकाच्या मनातील हेतूने सुरू होतो. लेखकाचे काही हेतू या ठिकाणी दिलेले आहेत.
माहिती देणे, शिक्षण देणे : माहितीपत्रक
अनुकूल करून देणे, समजूत घालणे : जाहिरात
मनोरंजन वा संतुष्ट करणे : कविता, विनोद, इत्यादी
उत्कट भावनांची अभिव्यक्ती : राजकीय लेख
हेतुपरत्वे भाषेचे आयोजन व संकल्पना अभिव्यक्तीचे मार्ग वेगळे असतील. जाहिराती व उत्कट भावनांच्या अभिव्यक्तीसाठी
 

भडक, स्फोटक आणि काही वेळा बहुढंगी भाषेची गरज असते. याउलट माहिती नेमकी, तार्किक व नियोजित पद्धतीने दिली जाते.
एक संशोधक म्हणून तुम्हाला ज्ञाननिर्मिती वा ज्ञानाचा शोध घ्यावयाचा असतो. तुम्ही तुमच्या ज्ञानाप्रत शास्त्रशुद्ध व तार्किक पद्धतीने पोहोचलेले आहात हे दर्शविणे आवश्यक असते. या पद्धतीची पुनरावृत्ती दुसरी कोणतीही व्यक्ती करू शकते. त्यासाठी तर्कसंगत व बुद्धिवादी विधानांची आवश्यकता असते. आपण जी भाषा वापरतो तीसुद्धा हेतूला पूरक असावी लागते. आपल्या लेखनातून तर्कशुद्ध पद्धतीचा प्रत्यय यायला हवा. संशोधन/ अहवालात अतिशयोक्तीपूर्ण भाषेपेक्षा तात्कालिक, सूचक, भाषा अधिक उचित ठरते. याचे कारण सुरचित पर्यावरणातील घटना जशा घडल्या त्याचे तुम्ही वर्णन करणार असता.
प्रबंध व हेतूपूर्ण वाक्ये
पूर्वीच्या एका प्रकरणात प्रबंध वाक्यांचा संदर्भ आलेला आहे. प्रबंध वाक्यातून संशोधनाची मध्यवर्ती कल्पना स्पष्ट होते. तसेच संदर्भाची एक विशिष्ट चौकट स्पष्ट होते. त्यामुळे तुम्ही जेव्हा संशोधनकार्य सुरू करता तेव्हा पुन:पुन्हा त्याचा संदर्भ पाहून तुम्हाला अभिप्रेत असलेल्या गोष्टी पडताळून पाहता येतात. प्रबंध वाक्ये दिली आहेत, ती काळजीपूर्वक पाहा.
माझा प्रबंध असा आहे की, दूरदर्शनवरील शैक्षणिक प्रसारणाला दररोज दोन तास दिल्याने नियोजित जनसंख्येतील पुष्कळसे लोक प्रत्यक्षात कार्यक्रम पाहू शकत नाहीत. प्रेक्षकांत मुख्यत: सेवानिवृत्त लोक व गृहिणी यांचाच भरणा आहे. आता खाली दिलेली वाक्ये प्रबंध वाक्ये म्हणून संबंधित आहे याचा शोध घ्या.
(अ) शैक्षणिक प्रसारण बंद करावे हे प्रेक्षकांना पटवून देणे हा माझा हेतू आहे.
(आ) शैक्षणिक प्रसारणाची वेळ बदलावी हे श्रोत्यांना कळविणे हा माझा हेतू आहे.
(इ) केवळ व्यक्तिगत वा अंतर्गत जाणिवेने नव्हे तर विषयाचा सखोल अभ्यास करून मी या निष्कर्षांप्रत आलो आहे हे श्रोत्यांना कळविणे हा माझा हेतू आहे.
संशोधन परिस्थितीत इ. विधान बरोबर उत्तर आहे हे स्पष्ट आहे. कारण अ व आ मध्ये प्रबंध वाक्य अगोदर सिद्ध झालेले आहे असे गृहित धरले आहे. ही विधाने संशोधनोत्तर उपयोजित प्रबंध वाक्ये म्हणून योग्य ठरू शकतील. रुपावली
विचारप्रक्रियेचे नमुने
लेखनाचा कोणताही भाग लेखकाच्या विचारप्रक्रियेचा नमुना प्रकट करतो. एखाद्या लेखनाच्या मुळाशी असलेला नमुना याचा रुपावली म्हणून उल्लेख केला जातो. रुपावलीमधून लेखकाची शैली व त्याच्या विचारातील टप्पे प्रतीत होतात.
रुपावलीचा विचार लेखकाच्या किंवा वाचकाच्या दृष्टिकोनातून केला जातो. लेखकाच्या बाबतीत रुपावली त्याच्या विचाराच्या मुळाशी असते व लेखनप्रक्रियेतून तिला मूर्त स्वरूप दिले जाते. वर दिलेला नमुना हा एक संशोधन लेखन रुपावलीचे उदाहरण आहे. वाचकसुद्धा लेखकाच्या रुपावलीचे अनुकरण करतो. लेखकाचे काही उतारे समजून घेण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या लेखनातून बौद्धिकदृष्टय़ा महत्त्वाचा भाग प्रकट होत असतो. लेखक वाचकांना रुपावली समजावून देण्यासाठी विविध तंत्रांचा अवलंब करतात. उदाहरणार्थ, अनुक्रमणिका, प्रस्तावना, प्रकरणांची शीर्षके विभाग, उपविभाग, इत्यादी अशा तंत्रामधून वाचकांना लेखकाची विचारप्रक्रिया समजते व आकलन सुलभ होते.
प्रबंधाचे औपचारिक परीक्षण करून त्यावर अभिप्राय द्यावयाचा असतो. त्यामुळे प्रबंधासंबंधी सर्व मूलभूत गोष्टी, प्रबंधाची मांडणी, रुपावली या सर्वाचे लेखकाने स्पष्टीकरण देणे अत्यंत महत्त्वाचे असते. खाली काही मूर्त स्वरूपाच्या रुपावलीची उदाहरणे दिलेली आहेत.
विश्लेषण रुपावली
प्रस्तावना (प्रबंधाचे वाक्य),
गुणवैशिष्टय़ १, गुणवैशिष्टय़ २, गुणवैशिष्टय़ ३, गुणवैशिष्टय़ ४, इत्यादी
निष्कर्ष (प्रबंधाचा सारांश)
वर्गीकरण रुपावली
प्रस्तावना (प्रबंधाचे विधान)
प्रकार १, प्रकार २, प्रकार ३, प्रकार ४, इत्यादी,
निष्कर्ष (प्रबंधाचा सारांश)
दृष्टांत रुपावली
प्रस्तावना (प्रबंध)
उदाहरण १, उदाहरण २, उदाहरण ३, उदाहरण ४,
निष्कर्ष (प्रबंधाचा सारांश)
कार्यकारण रुपावली
प्रस्तावना (प्रबंध)
कारण १, कारण २, कारण ३, कारण ४, इत्यादी
परिणाम, निष्कर्ष (प्रबंधाचा सारांश)
कार्यकारण परिणाम रुपावली
प्रस्तावना (प्रबंध)
परिणाम १, परिणाम २, परिणाम ३, परिणाम ४, इत्यादी परिणाम निष्कर्ष (प्रबंधाचा सारांश)
तुमच्या प्रकल्पासाठी कोणती रुपावली उपयुक्त
ठरेल हे तुम्हाला ठरवायचे आहे. पूर्वी दिलेल्या नमुन्यावर
प्रत्यक्ष रुपावली अवलंबून राहील. वर ज्या पाच
रूपावल्या दिल्या आहेत त्यांची वैशिष्टय़े एकत्रित
करून एक रुपावली निवडावी लागेल. थोडक्यात,
तुमच्या उद्देशाला अनुरूप अशी रुपावली तुम्हाला निर्माण
करता येईल.
रणजित राजपूत
ranjitrajput16@yahoo.in