Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

व्यापार - उद्योग
(सविस्तर वृत्त)

देशाच्या संरक्षणविषयक उणीवांचे परीक्षण करण्यासाठी संरक्षण तज्ज्ञांचा‘थिंक टँक’
व्यापार प्रतिनिधी:
संरक्षणविषयक विदेशी तज्ज्ञांच्या सल्ल्याऐवजी आपल्याला स्थानिक अनुभव अधिक उपकारक ठरेल. अमेरिकेने ९/११ घटनेसाठी जो मार्ग स्वीकारला तोच आपल्याला २६/११ साठी वापरात आणता येणार नाही. प्रत्येक देशाची संरक्षणासंबंधी आपली स्वत:ची योजना असायला हवी, अशी टिप्पणी प्रख्यात संरक्षण तज्ज्ञ व ‘मायक्रो सिक्युअर थिंक टँक

 

(एमएसटीटी)’चेअध्यक्ष विजय मुखी यांनी केली.
मायक्रो टेक्नॉलॉजीज इंडियाने दहशतवादाविरूद्ध सुरू असलेल्या युद्धात नवीन आणि अद्य्यावत तंत्रासंबंधी शिक्षण तसेच प्रबोधनाचे लक्ष्य ठेऊन ‘एमएसटीटी’ नावाच्या ना-नफा तत्त्वावरीलसंरक्षण व्यासपीठाची स्थापना केली आहे. भारतात अशा तऱ्हेचा हा पहिलाच संरक्षणविषयक बिगर-सरकारी पुढाकार असून, संरक्षण क्षेत्रातील विशेषज्ज्ञांच्यासहभागाने बनलेल्या ‘एमएसटीटी’चे अध्यक्षपद मुखी यांच्याकडे आहे, तर माजी केंद्रीय दक्षता आयुक्त एन. विठ्ठल हे एमएसटीटीचे सदस्य आहेत.
नियमित रूपाने देशाच्या व्यक्तिगत, कॉर्पोरेट तसेच संस्थागत संरक्षणाचा आढावा एमएसटीटी घेतला जाईल. संरक्षणासंबंधी उपायांना चालना देण्याच्या उद्देशाने हा मंच आपल्या निष्कर्ष व शिफारशींना वेळोवेळी आपल्या वेबसाइटवर प्रसारीत करेल. ‘एमएसटीटी’ केवळ एका सल्लागाराच्या रूपात कार्य करेल. समाजाच्या सर्व घटकांना संरक्षणविषयक नियोजनात सामावून घेताना, त्यांना सतर्क करणारी व संरक्षणाच्या प्रश्नावर आवाज उठविण्याचे काम ‘एमएसटीटी’ करेल.
मायक्रो सिक्युअर थिंक टँकद्वारे व्यक्ती किंवा संस्था या सर्वाच्या जिवित-मालमत्तेच्या प्रभावी तसेच किफायतशीर संरक्षणाविषयी जागृतीचा कार्यक्रम राबविला जाईल. थिंक टँक अशा तज्ज्ञ मंडळींचा गट असेल जो संरक्षण क्षेत्रात विचार प्रवर्तकाचे काम करेल तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील संरक्षणाच्या प्रश्नावर विश्लेषणात्मक अहवाल नियतकालिक रूपात प्रसृत करेल.
पुढे जाऊन एमएसटीटी महाराष्ट्र राज्यासाठी विशेष ‘संरक्षणात्मक आराखडय़ा’ची रचनेसाठीही पाऊल टाकणार आहे, असे मुखी यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, आजवर कोणत्याच राज्यासाठी अशी कोणती विशेष लिखित सामग्री पुढे आलेली नाही. सध्या आम्ही ज्या संरक्षण व्यवस्थेत जगत आहोत तिच्या कमजोऱ्यांना निर्भयतेने व पक्षपात न करता आम्ही आमच्या विश्लेषक अहवालातून प्रकाशात आणू.’