Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

महाराष्ट्रात मंदीची चाहूल
स्थूल उत्पन्नात घट; अन्नधान्याच्या उत्पादनात २४ टक्क्यांची घसरण
मुंबई, ३ जून / प्रतिनिधी
राष्ट्रीय नमुना पाहणीवर आधारित निष्कर्षांनुसार राज्यातील रोजगार सातत्याने वाढून २००४-०५ मध्ये तो ४.३ कोटी इतका झाला असला तरी २००७-०८ मध्ये तो कमी होऊन ४.१ कोटी इतका झाल्याने मंदीची चाहूल स्पष्टपणे दिसून येत असल्याचा निष्कर्ष महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २००८-०९ मध्ये काढण्यात आला आहे. राज्यांतर्गत स्थूल उत्पन्नात घट ६.७ टक्क्यांनी घट झाली असून खरीप आणि रब्बी हंगामातील एकत्रित अन्नधान्याचे उत्पादन गेल्या वर्षीच्या उत्पादनापेक्षा २४ टक्क्यांनी कमी आहे. तेलबियांच्या उत्पादनातही ४९ टक्के इतकी तीव्र घट अपेक्षित असून उसाचे उत्पादनही गेल्यावर्षीच्या तुलनेत ४३ टक्क्यांनी कमी आहे, असे निष्कर्षही अहवालात नमूद करण्यात आले आहेत.

अमृतस्पर्शी विधानसभा
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भरलेल्या विधीमंडळाच्या बहुदा पहिल्याच अधिवेशनात गृहमंत्री मोरारजी देसाई यांनी ठराव मांडला तो रस्ता वाहतुकीचं राष्ट्रीयीकरण करण्याचा.. ती घटना ७ ऑक्टोबर १९४७ ची.. पण त्या ठरावाला कायद्याचं रुप यायला आणखी तीन र्वष जावी लागली.. १९५० मध्ये तो कायदा संमत झाला.. राज्यातील एका गावातून दुसऱ्या गावी जाण्यासाठी प्रवाशांना खाजगी बस कंपन्यांचा आधार घ्यावा लागत असे.. या कंपन्या प्रवाशांची जी लूट करीत असत त्याला मर्यादाच नसे.. आज आता इतक्या वर्षांनंतर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेस जी सेवा उपलब्ध करून देत आहेत ती पाहिल्यानंतर या कायद्याचं महत्व पुरेपूर पटतं..

रोहिदास पाटलांची अस्वस्थता हाच मुद्दा
धुळे ग्रामीण मतदारसंघ
संतोष मासोळे
एकेकाळी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या रोहीदास पाटील यांचा कुसुंबा मतदारसंघ नव्या रचनेत धुळे ग्रामीण या नावाने ओळखला जाणार असून त्यात नव्या ४२ गावांची भर पडल्याने जवळपास सव्वा लाख मतदारांची वाढ झाली आहे. खान्देश भागातील आमदारांना एकत्र करून अलीकडे विशाल खान्देशचा प्रयोग करणारे पाटील सध्या पक्षांतर्गत साठमारीमुळे अस्वस्थ असून त्यांची ही अस्वस्थता आणि त्या अनुषंगाने विरोधकांची होणारी मोर्चेबांधणी हेच येत्या निवडणुकीचे वैशिष्टय़ ठरणार आहे.

विलासरावांचा वारसदार कोण?
लातूर मतदारसंघ
प्रदीप नणंदकर
लातूरची ओळख राज्यभर करून देण्यात या मतदारसंघाचे सातत्याने प्रतिनिधित्व करणाऱ्या विलासराव देशमुखांना श्रेय जाते. शिक्षण, सहकार, व्यापार अशा विविध क्षेत्रांतील लातूर पॅटर्न गाजतो आहे. १९९५ च्या निवडणुकीत विलासराव देशमुखांचा दारुण पराभव जनता दलाच्या तिकिटावर निवडणूक लढविणाऱ्या शिवाजी पाटील कव्हेकर यांनी केला. १९९५ ते ९९ दरम्यान मतदारांशी संपर्क ठेवून १९९९ साली विलासराव राज्यात सर्वाधिक मताने विजयी झाले. ते थेट राज्याचे मुख्यमंत्री बनले. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत विलासरावांना पुन्हा शिवाजी पाटील कव्हेकर यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून आव्हान दिले मात्र विलासरावांनी ७७ हजार मतांनी त्यांचा पराभव केला व दुसऱ्यांदा ते मुख्यमंत्री झाले.

दलित चळवळीचा लचका.. कुणीही मोडावा!
सत्तासंग्राम ०९

काँग्रेसने दगाबाजी केल्याचा आरोप करीत रिपब्लिकन नेते रामदास आठवले सध्या राजकीय वाळवंटात वणवण भटकत आहेत. त्यांचा ठणाणा कितपत गांभीर्याने घ्यायचा यावर सावकाश विचार करू, अशा बेफिकिरीत काँग्रेस नेतृत्व आहे. तिकिटापासून ते मंत्रीपदापर्यंत कमरेपर्यंत झुकणाऱ्या नेत्यांसमवेत ऐक्य कसे होणार, असा उपहासगर्भ सवाल करीत भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी आठवले यांना जोरदार टोला लगावला आहे तर याचवेळी आंबेडकरी चळवळीतील आणखी एक नेते ‘पीपल्स रिपब्लिकन’चे जोगेंद्र कवाडे यांची शिवसेनेशी घसट वाढू लागली आहे.