Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

खतवाटपात गोंधळ; पोलिसांचा लाठीमार
अंबड, ३ जून/वार्ताहर

 

येथील खरेदी विक्री संघाच्या कार्यालयासमोर आज सकाळपासून शेतक ऱ्यांनी खते घेण्यासाठी गर्दी केली होती. यात महिलांचाही सहभाग मोठय़ा प्रमाणात होता. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रत्येक शेतक ऱ्याला खतांच्या पाच बॅगा देण्याचे आश्वासन खरेदी-विक्री संघातर्फे देण्यात आले होते; मात्र ऐन वेळेस खतांच्या तीन बॅगांचेच वाटप करण्यात आले. सकाळपासून उन्हातान्हात रांगेत असलेल्या
शेतक ऱ्यांमध्ये त्यामुळे नाराजीचा सूर होता. गोंधळ घालणाऱ्या अनेक
शेतक ऱ्यांना पोलिसांचा काठीचा प्रसाद मिळाला.
या लाठीमारात ताडहादगाव (ता. अंबड) येथीलएका शेतक ऱ्याचे डोके फुटले. या शेतक ऱ्याला पोलिसांनीच सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
खरेदी-विक्री संघात खते येणार ही चर्चा शेतक ऱ्यांत काही दिवसांपासून होती. अखेर खरेदी-विक्री संघाने ३ जूनला खत वाटप होणार असल्याचे जाहीर केले. सकाळी सात वाजल्यापासून शेतक ऱ्यांनी खते घेण्यासाठी गर्दी केली. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. शेतक ऱ्यांच्या गर्दीची माहिती मिळताच तहसीलदार सुभाष काकडे घटनास्थळी दाखल झाले. खरेदी-विक्री संघाचे सभापती मनोज मरकड, उपसभापती दिनेश वाघ यांच्यासह कर्मचाऱ्यांना या वेळी सूचना देण्यात आल्या. पोलीस निरीक्षक चंद्रकांत दिलपाक हे देखील खरेदी-विक्री संघाची सूचना मिळताच खत वाटपस्थळी आपल्या फौजफाटय़ांसह दाखल झाले.
रांग तोंडून गोंधळ घालणाऱ्या शेतक ऱ्यांना काठीचा बेदम चोप देण्यात आला. धीम्या गतीने होणारे खत वाटप व पाच बॅगचे आश्वासन देऊन प्रत्यक्षात तीन बॅग मिळत असल्यामुळे काही वेळ शेतकरी संतप्त झाले होते. यामुळे गोंधळही उडाला. यात सुनील बाबुराव हंगारगे (ता. ताडहादगाव) या तरुण शेतक ऱ्याचे पोलिसांच्या काठीने डोके फुटले.

खतपुरवठय़ात भेदभाव !
खरेदी-विक्री संघ खतपुरवठा करीत असताना भेदभाव करीत असल्याचे
शेतक ऱ्यांत बोलले जात होते. महाकाळा (अंकुशनगर) डेपोत ४४५ मेट्रिक टन खताचा पुरवठा करण्यात आला. मात्र अंबड डेपोत यापेक्षा निम्मा म्हणजे २५५ मेट्रिक टन खत उपलब्ध केला. यामुळे शेतक ऱ्यांना खताच्या पाच बॅगांऐवजी तीन बॅगांवरच समाधान मानावे लागले. भविष्यात मागणीप्रमाणे खतपुरवठा न केल्यास शेतक ऱ्यांचा उद्रेकाची भीती व्यक्त केली जात आहे.