Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

चढय़ा दराने खतविक्री; शेतक ऱ्यांमध्ये संताप
परळी वैजनाथ, ३ जून/वार्ताहर

 

शेतक ऱ्यांची मागणी असलेले राशी-२चे बियाणे व डीएपी सम्राट खताचा बाजारात तुटवडा झाला असल्याचे सांगत आहेत. या बाबीकडे येथील कृषी विभागाचे पुरवठा अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे शेतक ऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
मागील दोन वर्षांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे जमिनीतील पाणीपातळी खोल गेली आहे. परिणामी सिंचनाचे क्षेत्रही कमी झाले. त्यामुळे शेतक ऱ्यांचा कल नगदी पीक म्हणून कापसाची लागवड करण्यावर आहे.
हवामान खात्याने या वर्षी मान्सून वेळेत दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तविल्यामुळे शेतक ऱ्यांनी बियाणे व खते खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र व्यापाऱ्यांनी चढय़ा भावाने बियाणे व खतविक्री सुरू केलेली आहे. शेतकरी या बाबतीत दरवर्षीप्रमाणे या वर्षीही बळी पडताना दिसत आहे. व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या बियाणे व खताच्या किमतीसह एकूण बियाणांच्या बॅगा व खताच्या पोत्याची संख्या लिहिणे बंधनकारक असताना अशा प्रकारचे फलक दुकानांमध्ये दिसत नाहीत. राज्य सरकारने शेतक ऱ्यांची लुबाडणूक होऊ नये यासाठी खताचा व बियाणांचा पुरवठा योग्य भावात व्हावा असे आदेश दिलेले असतानाही अशा प्रकारच्या व्यापाऱ्यांच्या धोरणांमुळे शेतकरीवर्गात संताप व्यक्त केला जात आहे.