Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

जिल्हा न्यायालयात ७० प्रकरणे तडजोडीने निकाली
लातूर, ३ जून /वार्ताहर

 

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेतंर्गत येथील जिल्हा न्यायालयात लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. यात ७० प्रकरणे तजोड करून निकाली काढण्यात आली. यात सर्वाधिक ३६ प्रकरणे गातेगाव पोलीस ठाण्याअंतर्गत आहेत. लातूरचे जिल्हा न्यायाधीश पी. एन. देशमुख यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. या वेळी अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी एकनाथ डवले होते. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय लाठकर, सरकारी वकील तापडिया, अ‍ॅड. राजमाने, श्रीमती कारभारी, उपविभागीय पोलीस अधिकारी शंका मामीलवाड, पंकज डहाणे, पोलीस निरीक्षक जाधव, सोपनि सुनील जयतापूरकर, विठ्ठल कुबडे यांची उपस्थिती होती.
या वेळी बोलताना देशमुख म्हणाले, मागील वर्षांप्रमाणे काम करून जिल्हा प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी एकदिलाने काम केले पाहिजे. पोलीस अधीक्षक संजय लाठकर म्हणाले, लोकन्यायालयाच्या माध्यमातून गावागावातील तंटे मिटवून लोकांमध्ये जागृती निर्माण करणे लोकन्यायालयाचा उद्देश आहे.
जिल्हाधिकारी एकनाथ डवले यांनी अध्यक्षीय समारोप केला. गातेगाव पोलीस ठाण्याअंतर्गत ९ फौजदारी, २६ महसुली, १ दिवाणी प्रकरणाचा समावेश आहे. लातूर एमआयडीसी पोलीस ठाण्यातंर्गत १८, लातूर ग्रामीण ११ व मुरुड पोलीस ठाणे ५ अशी एकूण ७० प्रकरणे निकाली काढण्यात आली.