Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘हस्ताक्षर हे माणसाच्या मनाचे प्रतिबिंब’
धारूर,३ जून /वार्ताहर

 

सुंदर हस्ताक्षर हे माणसाच्या मनाचे प्रतिबिंब दाखवते. व्यवसाय व प्रगतीही व्यक्तीची हस्ताक्षरातूनच दिसून येत असल्याचे प्रतिपादन गटशिक्षण अधिकारी आर. एन. राऊत यांनी केले.
ज्ञानदीप विद्यालयाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी हस्ताक्षर सुधार प्रात्यक्षिक शिबिर १ ते ४ जून दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमात श्री. राऊत बोलत होते. या वेळी हस्ताक्षर सुधारक अशोक सप्तर्षी, केंद्रप्रमुख रामचंद्र तिडके यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी बोलताना गटशिक्षण अधिकारी श्री. राऊत म्हणाले की, ज्ञानदीप विद्यालय हे उपक्रमशील असून उपक्रमाच्या यशस्वितेसाठी पालकांचा सहभाग महत्त्वाचा असतो, असे सांगून सुंदर हस्ताक्षर हे माणसाचे जीवन यशस्वी करते असेही त्यांनी सांगितले. हस्ताक्षरसुधारक अशोक सप्तर्षी यांनी सुंदर हस्ताक्षराचे महत्त्व सांगून चांगले हस्ताक्षर कसे काढावे याबद्दल माहिती सांगितली. योग्य गुरु मिळाला, कष्ट केले तर यश निश्चितच मिळत राहते. जीवनात चांगल्या हस्ताक्षरालाही महत्त्व मिळते.
या वेळी रामचंद्र तिडके यांचे भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रकांत देशपांडे यांनी केले तर सूत्रसंचालन अमोल गुळवे यांनी केले.