Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

डोक्यावर दांडय़ाने मारून एकाला लुटले
औरंगाबाद, ३ जून /प्रतिनिधी

 

बसमधून उतरताच एकाच्या डोक्यात लाकडी दांडक्याचा प्रहार करून त्याच्या खिशातील रोख पाच हजार रुपये आणि अडीच हजार रुपये किमतीचा मोबाईल अशा साडेपाच हजार रुपयांचा ऐवज लुटला. ही घटना मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास जालना मार्गावरील
गुरुद्वारा गेटजवळ सिंधी कॉलनी येथे घडली.
गोपाळ गोवर्धन शर्मा (वय ४८, रा. शारदाश्रम कॉलनी) हे या हल्ल्यात जखमी झाले. ते ठेकेदार आहेत. जालन्याहून येणाऱ्या बसने उतरून ते घराकडे निघाले होते. तोच त्यांच्यासमोर एक ३५ वर्षे वयाचा एक इसम आला. अंगात सफारी घातलेला आणि बारीक केसाच्या या इसमाने शर्मा यांच्या डोक्यात जोरात प्रहार केला. नंतर त्यांना समजण्याच्या आतच त्याने शर्मा यांच्या खिशातील रोख रक्कम आणि मोबाईल काढून पळ काढला. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
घरासमोरून दुचाकी पळविली
रात्री घरासमोर उभी केलेली ५० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरटय़ांनी पळविली. आनंद मुरलीधर मोरे (वय २५, रा. सुदर्शननगर, हडको एन-११) या विद्यार्थ्यांने दिलेल्या तक्रारीनुसार शनिवारी रात्री त्याने हिरो होंडा सीबीझेड ही दुचाकी घरासमोर उभी केली होती. सकाळी बघितले असता मोटार जागेवर नव्हती.