Leading International Marathi News Daily
गुरुवार । ४ जून २००९

आरोग्याची पहिली पायरी!
उकळवून पाणी पिणे हा पाणी शुद्धीकरणाचा आपल्याकडे पूर्वापार चालत आलेला सगळ्यात सोपा आणि सुरक्षित समजला जाणारा मार्ग. अलीकडच्या काळात पाणी शुद्धीकरणाची विविध तंत्रे उपलब्ध होऊ लागल्यावर उकळवून पाणी पिण्याला पर्याय मिळू लागला. तरी काहींच्या मते या प्रकारे पाणी शुद्ध करण्यापेक्षा उकळवूनच पाणी खऱ्या अर्थाने शुद्ध होतं. ते काहीही असलं तरी आज उकळवून पाणी पिणे हा एकच पर्याय उरलेला नाही. जगात कुठेही गेलात तरी पिण्याचे पाणी शुद्ध म्हणजे वासविरहित, रंगविरहित, बॅक्टेरियाविरहित आणि रसायनविरहित असणं गरजेचं आहे. मग शुद्धीकरणाचा मार्ग काहीही असेल, जसं पाणी उकळवून घेणं, अल्ट्रा व्हायलेट, अल्ट्रा फिल्ट्रेशन किंवा आत्ताचे नवे तंत्र ‘रिव्हर्स ओसमॅसिस’. या प्रत्येक प्रकारात काही ना काही गुण-दोष आहेतच.
अनेकदा रेस्टॉरंटमध्ये पाण्याचे जे ग्लास टेबलावर आदळले जातात ते बघूनच पाणी पिण्याची इच्छा नष्ट होते, त्यातूनही जर

 

खूपच तहान लागली आणि ग्लासच्या रंग-रूपाकडे काणाडोळा करत पाणी प्यायचा विचार करावा तर पाण्यावर तरंगणारा तेलकट थर आणि पाण्याचा मातकट रंग बघून चक्क १२-१५ रुपये घालवून पाण्याची बाटली विकत घेणं श्रेयस्कर वाटतं! खरं तर जिथं जाऊ त्या गावातल्या अन्नपाण्याची चव बघणं खूप महत्त्वाचं असतं. पण आज अशी परिस्थिती आहे की कुठेही बाहेर गेलं की सगळ्यात जास्त भीती वाटते पाणी पिण्याचीच. ‘बारा गावचं पाणी प्यायलेला माणूस’ ही आपल्याकडे सुप्रसिद्ध म्हण आहे, त्याचा अर्थ काहीही असेल पण आपण जर गावोगावचं पाणी पिण्याचं टाळलं तर कालांतराने ही म्हण नक्कीच अडगळीत पडेल!
गंमतीचा भाग जाऊ दे, पण स्वच्छ-शुद्ध पाणी ही आरोग्याची पहिली पायरी आहे. पिण्यासाठी पाणी मग ते बाहेर गेल्यावर असो किंवा घरात असो स्वच्छ, चांगलं आणि र्निजतुक असावं ही आपली पहिली गरज असते. स्वच्छ आणि र्निजतुक पाणी म्हणजे काय? आणि कशा प्रकारचं पिण्याचं पाणी सुरक्षित समजावं? या प्रश्नांना अनेक उत्तरे असू शकतात! सर्वसाधारणपणे आपल्याकडे पारंपरिक उकळवून-गाळून पाणी पिण्याला प्राधान्य दिलं जातं. तरीही काळाच्या ओघात पाणी शुद्धीकरणाची नव्या तंत्राचा शोध लागत असतो आणि आधीच्या पद्धतीपेक्षा या पद्धतीने पाणी पिणं जास्त योग्य वाटत राहतं. यामुळे इतका गोंधळ उडतो की शेवटी उकळून प्यावं या निर्णयाप्रत आपण येतो. पण पाणी उकळवून प्यावं म्हटलं तरी त्यातही प्रश्न उद्भवतातच, कोणी म्हणतं ते २० मिनिटांपर्यंत उकळवावं तर कोणी म्हणतं ४० मिनिटे मग नक्की किती मिनिटं पाणी उकळल्याने पाणी शुद्ध होतं हा प्रश्न जिथल्या तिथे राहतो.
मुळात शुद्ध पाणी म्हणजे काय? हे समजून घ्यायला पाहिजे. पृथ्वीतलावरच्या एकूण पाण्याच्या साठय़ाच्या तीन टक्के पाणी पिण्यायोग्य असतं जे पावसामुळे मिळतं. पण हे पावसामुळे मिळणारं पाणी जसंच्या तसं तर प्यायलं जात नाही. हे पाणी जेव्हा आपल्या घरात येतं तेव्हा ते पिण्यायोग्य बनविण्यासाठी आपण त्यावर प्रक्रिया करतो. या प्रक्रिया कोणकोणत्या प्रकारच्या असतात हे सांगण्यासाठी ‘वॉटर टुडे’ ही पाणीविषयक काम करणारी संस्था वॉटर एक्झिबिशन आयोजित करते. त्यात घरगुती पिण्यासाठीचे शुद्ध पाणी म्हणजे काय? या विषयीची माहिती देण्यात येते.
उकळवून पाणी पिणे हा पाणी शुद्धीकरणाचा आपल्याकडे पूर्वापार चालत आलेला सगळ्यात सोपा आणि सुरक्षित समजला जाणारा मार्ग. अलीकडच्या काळात पाणी शुद्धीकरणाची विविध तंत्र उपलब्ध होऊ लागल्यावर उकळवून पाणी पिण्याला पर्याय मिळू लागला. तरी काहींच्या मते या प्रकारे पाणी शुद्ध करण्यापेक्षा उकळवूनच पाणी खऱ्या अर्थाने शुद्ध होतं. ते काहीही असलं तरी आज उकळवून पाणी पिणे हा एकच पर्याय उरलेला नाही. जगात कुठेही गेलात तरी पिण्याचे पाणी शुद्ध म्हणजे वासविरहीत, रंगविरहीत, बॅक्टेरियाविरहीत आणि रसायनविरहीत असणं गरजेचं आहे. मग शुद्धीकरणाचा मार्ग काहीही असेल, जसं पाणी उकळवून घेणं, अल्ट्रा व्हायलेट, अल्ट्रा फिल्ट्रेशन किंवा आत्ताचे नवे तंत्र ‘रिव्हर्स ऑस्मॉसिस’. या प्रत्येक प्रकारात काही ना काही गुण-दोष आहेतच.
उकळवलेल्या पाण्यात काही त्रुटी राहतातच. पाणी उकळल्यावर ते नंतर फक्त आठ मिनिटांपर्यंत उकळवलं तरी पुरेसं आहे. त्यामुळे पाण्यातले बॅक्टेरिया मरतील. पण पाण्यात कॉपर, नायट्रेट, मक्र्युरी, लेड यांसारखी जी विविध रसायनं असतात त्याचं काय? उकळल्यामुळे ती रसायनं निघून जात नाहीत. उलट पाणी उकळवल्यानंतर ती अधिक कॉन्सन्ट्रेट होतात आणि पाण्यातील टी.डी.एस. पातळीत वाढ होते. इतकंच नाही तर पाणी उकळताना जे जिवाणू मरतात ते थंड होताना हवेतील जिवाणूंचा परिणाम होऊन पाण्यात परत निर्माण होऊ शकतात!
‘यू व्ही रेज्’ हे शुद्धीकरणासाठी वापरलं जाणारं आणखी एक तंत्र. या तंत्रामुळे पाण्यातील बॅक्टेरिया पूर्णपणे मारले जात नसून काही काळ निकामी केले जातात. साधारण दहा तासांनंतर हे बॅक्टेरिया परत कार्यरत होतात. त्यानंतर हे पाणी पिण्यायोग्य राहात नाही.
हाय टेक, केंटसारख्या वॉटर प्युरीफिकेशनमध्ये अग्रणी असणाऱ्या कंपन्या ‘रिव्हर्स ऑस्मॉसिस’ या तंत्राचा उपयोग करतात. या शुद्धीकरणाच्या तंत्रात पाण्यात अधिक मात्रेत असणारी रसायनं ९५% पर्यंत, तर बॅक्टेरिया आणि व्हायरस ९९% पर्यंत काढून टाकले जातात. त्याचबरोबर या तंत्रात पाण्यात असणारी खनिजंदेखील नष्ट होतात. तरीही या तंत्राचा हल्ली सगळ्यात सुरक्षित पाणी देणारं तंत्र म्हणून सर्वाधिक उपयोग केला जातो आहे. या तंत्रामुळे जी खनिजं नष्ट होतात ती खनिजं आपण आपल्या आहारातून मिळवू शकतो असं या तंत्राचा उपयोग करून वॉटर प्युरीफायर बनविणाऱ्या कंपन्यांचं म्हणणं आहे.
याला आणखी एक पर्याय म्हणजे बाजारात विकत मिळणारं खनिजयुक्त पाणी, म्हणजेच मिनरल वॉटर. मिनरल वॉटर म्हणजे बाटलीत मिळतं ते पाणी हा आपल्याकडचा सर्वसामान्य समज आहे. पण बाजारात बाटल्यातून विकत मिळणारं सगळंच पाणी मिनरल वॉटर नसतं. ज्या कंपन्या खरंच मिनरल वॉटर देतात त्यावर ‘मिनरल वॉटर’ असं लिहिलेलं असतं; बिसलेरीच्या बाटलीवर असं लिहिलेलं असतं. जे खनिजयुक्त पाणी नसतं त्यावर ‘पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर’ लिहिलेलं असतं. म्हणजेच यात मिनरल्स घातलेली नसतात. आज आपल्याकडे नॅचरल मिनरल वॉटर देणारी ‘बिसलेरी’ ही एकमेव कंपनी आहे.
या सगळ्या चर्चेनंतरदेखील घरात पाणी शुद्धीकरणासाठी नक्की कोणता पर्याय वापरावा हा प्रश्न तसाच राहतो! यावर सर्वसाधारणपणे हायटेक किंवा ‘रिझव्र्ह ऑस्मॉसिस’ हे तंत्र सगळ्यात सुरक्षित हे उत्तर मिळतं. पण याचं खरं उत्तर म्हणजे आपल्या कुटुंबाच्या स्वास्थ्याला कसं पाणी योग्य ठरेल आणि पाणी शुद्धीकरणाचा कुठला पर्याय वापरणं सोपं जाईल हे ज्याचं त्यानं ठरवणं अधिक श्रेयस्कर.
शुद्ध पाणी म्हणजे नक्की काय, याचा विचार करताना पाण्यातल्या टी. डी. एस. पातळीचा विचार करण्याची काहीच गरज नसते. टी. डी. एस. पातळी म्हणजे पाण्यात असणारी खनिजे. तर इथे पी. एच. बॅलन्सचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे. पी. एच. बॅलन्स म्हणजे पाण्यातील आवश्यक त्या खनिजांचं योग्य प्रमाण. पाण्यातलं पी. एच. बॅलन्सचं प्रमाण म्हणजेच हायड्रोजन आणि आयॉनचं प्रमाण ६.५ ते ८.५ इतकं असणं गरजेचं आहे. जर हे प्रमाण कमी झालं तर पाण्यावर आम्लाची प्रक्रिया होऊन पाणी खराब होतं. म्हणूनच परदेशी लोकांना आपल्या इथलं साधंच काय पण उकळलेलं पाणीदेखील पचत नही. ते फक्त बाटलीबंद पाणी पिणं पसंत करतात!
परदेशीच नाही तर आज आपणदेखील घराबाहेर गेलं की पाण्याची बाटली विकत घेतो. म्हणून तर अगदी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धाब्यावरदेखील काही नाही तरी पाण्याची बाटली नक्कीच विकत मिळते. कोणत्याही बऱ्यापैकी रेस्टॉरंटमध्ये नॉर्मल वॉटर की मिनरल, हा प्रश्न आवर्जून विचारला जातो. रेस्टॉरंटमध्ये पाण्याची बाटली टेबलवर असणं ही फॅशन किंवा स्टेटस सिंबॉल झाला आहे ते वेगळं! अर्थात आज पाण्याची बाटली विकत घेणं हे फक्त स्टेटस सिंबॉल राहिलेला नाही तर वाढत्या प्रदूषणामध्ये आपल्या स्वास्थ्यासाठी ही गरज झाली आहे.

पावसाचे पाणी
जिथे उत्तम पाऊस पडतो आणि पिण्यासाठी पावसाचं पाणी वापरलं जातं तिथल्या लोकांचं आरोग्य अधिक उत्तम असतं. जमिनीतील पाण्यापेक्षा पावसाचं पाणी पचायला अधिक हलकं, चवीला चांगलं आणि आरोग्यदायी असतं. पावसाच्या पाण्यातच औषधी गुणधर्म असतात. आपण महाराष्ट्रात त्यातही मुंबई-कोकण प्रांतात राहाणे खूपच भाग्यवान, कारण आपल्याला पिण्यासाठी पावसाचं पाणी मिळतं! तसंच प्रत्येक नक्षत्रात पडणाऱ्या पावसाचं वेगळं महत्त्व असतं. हस्त नक्षत्रात पडणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे पाण्याचं आयुष्य वाढतं. जे पाणी वाहात नसतं ते शुद्ध ठेवण्यासाठी हस्तातला पाऊस मदत करतो. तुम्हीही जर घरी हस्त नक्षत्रातल्या पावसाचं पाणी साठवून ठेवलं तर त्याचा उन्हाळी रोगांवर औषध म्हणून उपयोग करता येईल. उन्हाळ्यात जर एक छोटा चमचा हस्ताचं पाणी रोज घेतलं तर उन्हामुळे घशाला पडणारी कोरड, पोटातली जळजळ बऱ्याच प्रमाणात कमी होईल. या पाण्याच्या डोळ्यावर पट्टय़ा ठेवल्या तर डोळ्यांची जळजळ कमी होऊन डोकंही शांत राहील. मात्र हे पाणी कोणत्याही धातूच्या भांडय़ात साठवू नये. पूर्वी त्यासाठी मातीची भांडी वापरत. आता त्याची जागा प्लॅस्टिक आणि काचेनं घेतली आहे. हे पाणी थेट आकाशातून साठवण्याच्या भांडय़ात पडलं पाहिजे. यात पागोळ्यातून गळणारं पाणी पडता कामा नये. मग किती साठेल तितकं पाणी साठेल. हे साठलेलं पाणी काचेच्या बाटलीत झाकण घट्ट बंद करून ठेवावं. वर्षांनुर्वष या पाण्यावर काहीही परिणाम होत नाही.

बिसलेरी
आज बिसलेरी हे ‘जेनेरीक नेम’ झालंय. आपण दुकानात जाऊन ‘पाण्याची बाटली द्या’ म्हणत नाही तर ‘बिसलेरी द्या’ म्हणतो! पण..!
हा पणच बिसलेरीची खंत आहे! त्याविषयी बोलताना बिसलेरीच्या बिझनेस डेव्हलपमेंट आणि ह्य़ूमन रिसोर्स संचालक अंजना घोष म्हणतात, ‘आम्ही जेव्हा मार्केट सव्र्हे केला तेव्हा बहुतांशी लोकांकडून पाण्याची बाटली म्हणजे बिसलेरी हेच उत्तर मिळालं हे खरं आहे, आपण गंमत म्हणजे आपण बिसलेरी द्या इतकं फक्त म्हणतो, मात्र दुकानदार ज्या कोणत्या कंपनीची बाटली देतो ती घेतो. तो बिसलेरीच देतो आहे किंवा नाही याकडे लक्षच देत नाही.’
आज बाजारात पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या विकणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. पण जेव्हा बिसलेरीने भारतात पाऊल टाकलं तेव्हा पाणी विकत घेऊन प्यायचं ही कल्पनादेखील आपण केली नव्हती. त्या काळात म्हणजे १९६० साली ही इटालियन कंपनी भारतात स्थापित झाली. बिसलेरीला बाजारात पाय रोवण्यासाठी पाच-सात र्वष द्यावी लागली! पाच-सात वर्षांनंतरदेखील मुंबई, कोलकात्यासारख्या मोठय़ा शहरात केवळ एकाच दुकानात बिसलेरी पाण्याच्या बाटल्या ठेवलेल्या असायच्या! कारण पाणी विकत घेणे ही पध्दत तेव्हा रूढ झालेली नव्हती.
तिथपासून सुरुवात करून आज बिसलेरीने साम्राज्य उभं केलं आहे. त्या साम्राज्याला खिळखिळं करण्यासाठी बाजारात खूप स्पर्धा निर्माण झाली असली तरीदेखील पाण्याच्या विश्वात बिसलेरी आपलं पहिल्या क्रमांकावरचं स्थान कायम टिकवून आहे.
बिसलेरी पाण्याला सगळ्यात शुद्ध का समजायचं? आपण घरात पिण्यासाठी म्हणून पाणी शुद्ध करतो ते आणि बॉटल वॉटर यात काय फरक आहे? सांगताना अंजना घोष म्हणतात, ‘आपल्याकडे पाणी शुद्धीकरणाचा सगळ्यात पारंपरिक मार्ग म्हणजे उकळून पाणी पिणं. पण जर पाणी वीस मिनिटांपर्यंत नाही उकळवलं गेलं तर त्यातले जिवाणू मरत नाहीत. शिवाय हे पाणी थंड होताना जो हवेशी संपर्क होतो त्यामुळे त्यात पुन्हा जिवाणू जन्म घेऊ शकतात. जर हे पाणी घट्ट बंद झाकणाच्या बाटल्या किंवा भांडय़ात नाही भरून ठेवलं तरी ते शुद्ध राहात नाही. प्युरीफायरचंच तेच आहे, प्युरीफायरचा फिल्टर जर स्वच्छ ठेवला नाही तर त्या अस्वच्छ फिल्टरमुळेच पाणी अशुद्ध होऊ शकतं. पाण्यातल्या टी.डी.एस. लेव्हलचं प्रमाण खूप असू शकतं. टी.डी.एस. लेव्हलचा संबंध असतो तो कॅल्शिअमशी. आपलं शरीर १०० ते ३०० पर्यंत टीडीएस पचवू शकते पण ५०० वगैरे टी.डी.एस.मुळे किडनी स्टोनसारख्या आजाराचं प्रमाण वाढू शकतं. पॅकेज्ड वॉटरमध्ये टी.डी.एस.चं हेच प्रमाण १२० पर्यंत कायम राखलं जातं. बाटल्यामधील पाण्याचे ओझोनेशन केलेलं असतं. शिवाय त्या सील्ड असल्यामुळे त्याचा हवेशी संपर्कदेखील येत नाही. त्यामुळे सीलबंद बाटलीतलं पाणी वापरायला सगळ्यात सुरक्षित समजायला हरकत नाही.’
आपल्याकडे आजही कित्येक घरात नाइलाज झाला तरच पाण्याची बाटली विकत घेतली जाते. विकत घेऊन पाणी पिणं हे आपल्या संस्कृतीतच नाही. या पाश्र्वभूमीवर अंजना म्हणतात.. ‘आपण घरी पाणी उकळवून पितो किंवा प्युरीफायर आणतो. हा खर्च करण्यापेक्षा बिसलेरीचा वीस लिटरचा कॅन विकत घ्यायचा. हा कॅन ७० रुपये म्हणजेच साधारण तीन रुपये दर लिटरमागे पडतात. इतका खर्च तर कोणत्याही प्रकारे पाणी शुद्धीकरणासाठी येतोच..’ तरी आपल्याकडे अजून १०/१५ र्वष तरी घराघरात पिण्याच्या पाण्यासाठी बिसलेरीचे कॅन घेतले जातील हे चित्र दिसेलसं वाटत नाही!
पाण्याच्या बाटलीबाबत आणखी एक गैरसमज असतो तो म्हणजे हे ‘मिनरल वॉटर’ असतं. पण प्रत्येक पाण्याची बाटली म्हणजे ‘मिनरल वॉटर’ नव्हे. ‘बीआयएसच्या बॉटल वॉटर स्टॅण्डर्स’ नुसार पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांमध्ये दोन प्रकार आहेत. एक ‘पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर’ तर दुसरा ‘नॅचरल मिनरल वॉटर बॉटल.’ याविषयी अधिक माहिती देताना अंजना सांगतात, ‘बिसलेरीचा तिसरा प्रकार म्हणजे ‘अॅडेड मिनरल वॉटर.’ त्या आधी ‘पॅकेज्ड ड्रिंकिंग’ आणि ‘नॅचरल मिनरल वॉटर बॉटल’ म्हणजे काय सांगायचं तर, पॅकेज्ड वॉटर शुद्ध करून बाटलीत सीलबंद केलं जातं. यात मिनरल्स नसतात. तर नॅचरल मिनरल वॉटर म्हणजे जिथे शुद्ध पाण्याचे जिवंत झरे असतात तिथून मिळवलेलं पाणी. बिसलेरीचा अशा पाण्याच्या उगमाजवळच प्लान्ट आहे. रुद्रपूर इथे आमचा जो प्लान्ट आहे तिथे मी स्वत: जिवंत पाण्याचे झरे बघितले आहेत. तर बिसलेरी जे अॅडेड मिनरल वॉटर आणत त्यात आम्ही दोन मिनरल्स मुद्दाम घालतो. आपण सर्वसाधारणपणे खूप उकाडा झाला किंवा घाम आला की पाणी पितो. अशा वेळी अगोदरच
घामामुळे आपल्या शरीरातील मिनरल्स बाहेर टाकली जातात. या पाण्यामुळे ती परत मिळतात.’
यानंतर एक प्रश्न उरतोच की या पाण्याचं आयुष्य किती असतं?
‘बाटलीचं सील उघडत नाही तोपर्यंत हे पाणी पिण्यासाठी सुरक्षित असतंच आणि सील उघडल्यावरदेखील जोपर्यंत आपण ते त्याच बाटलीत झाकण घट्ट बंद करून ठेवतो आहोत तोपर्यंत ते पाणी पिण्यासाठी योग्य असतं. कारण आमच्या बाटल्यादेखील अतिशय काळजीपूर्वक बनविल्या जातात. भांडय़ात पाणी घेतल्यावर मात्र ते लगेच संपवायला हवं.’
मनीषा सोमण
maneesha24april@rediffmail.com