Leading International Marathi News Daily
गुरुवार । ४ जून २००९

पर्यावरण सर्वेक्षण
जागतिक तापमान वाढीचा प्रश्न गेली अनेक वर्षे संपूर्ण जगासमोर आहे. एकीकडे तापमानावर होणारा हा परिणाम थांबवण्यासाठी आणि पृथ्वीला वाचवण्यासाठी अनेक स्तरांवरुन प्रयत्न केले जात आहेत. संयुक्त राष्ट्रांतर्फे २००७ साली इंडोनेशियातील बाली येथे याच विषयावर जगातील छोटय़ा-मोठय़ा राष्ट्रांची परिषद भरली होती. त्यात अनेक छोटय़ा राष्ट्रांनी, या तापमान वाढीला सगळ्यात जास्त जबाबदार असलेल्या अमेरिकेला चांगलच फैलावर घेतलं होतं. आपल्याकडेही स्थनिक पातळीवर अनेक संस्था आणि व्यक्ती वसुंधरेला वाचवण्यासाठी पोटतिडकीने काम करत आहेत. याच सगळ्याची परिणिती म्हणजे गेल्या वर्षी प्रथमच पर्यावरण रक्षणासाठी अल गोर आणि पचौरी यांना नोबेल पारितोषिकही देण्यात आले. पर्यावरण रक्षणासाठी फक्त मोठय़ा व्यक्तीच काम करत आहेत असं नाही. तरुणही हिरीरीने आणि अभ्यासपूर्ण मार्गाने पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्नशील आहेत. पर्यावरण दिनानिमित्त व्हिवाने केलेल्या सर्वेक्षणात पुढील निरीक्षणे आढळली.. काहींना पर्यावरणाबद्दल आस्था होती. आपापल्या परीने पर्यावरण रक्षणासाठी खारीचा वाटा उचलत आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये याबद्दल जागरुक होते. तर काहींचं या विषयाशी काहीच देणं घेणं नव्हतं. सुरुवातीला शे-दोनशे लोकांशी बोलायचं ठरलं होतं. पण लोकांशी बोलता बोलता हा आकडा १२७२ पर्यंत कधी पोहोचला ते कळलंच नाही!
आम्ही विचारलेले प्रश्न आणि मिळालेली उत्तरे :
स्वप्नाली देसाई , दिपाली पवार