Leading International Marathi News Daily
रविवार, ३१ मे २००९

यशस्वी ग्रहकाळ
राशिस्थानी शुक्र-मंगळ, लाभात गुरू आणि शुक्र-गुरूचा शुभयोग यांच्यातील परिणाम प्रयत्नांत उत्साह निर्माण करतो. कृतीमधून यश आणि समाजात सन्मानाचे स्थान मिळेल. पंचमातील शनी हाती घेतलेले कार्य अपूर्ण राहू देत नाही. यासाठी याच वेळी प्रयत्न करावा. कला, साहित्य, विज्ञान, शिक्षण यात मेष व्यक्ती आघाडीवर राहतील. व्यापाराची घडी बसवता येईल आणि परमेश्वरी चिंतनातून आनंद मिळेल.
दिनांक : ३१, १, ४, ५ शुभ काळ.
महिलांना : यश, कर्तृत्व उजळून निघेल.

यश प्रसाद म्हणून स्वीकारा
चतुर्थात शनी, व्ययस्थानी शुक्र-मंगळ अशी ग्रहस्थिती असेपर्यंत मिळणारं यश प्रयत्नाला न्याय देणारं नसलं; तरी मिळालेले यश प्रसाद म्हणून स्वीकारा आणि पुढचा प्रवास सुरू ठेवा. याचा लाभ अल्पावधीतच दृष्टीपथात येऊ लागेल. सध्या तरी व्यापार, राजकारण, संसार, प्राप्ती यातील समस्यांत संयम ठेवावा. अवास्तव साहस टाळा, भाग्यातील राहू धर्मकार्यातून आनंद देतो. अचानक प्रवास घडतील.
दिनांक : १, २, ३, ६ शुभ काळ.
महिलांना : वाद टाळा, प्रकृती सांभाळा.

प्रभाव वाढेल
भाग्यात गुरू, लाभात शुक्र-मंगळ, पराक्रमी शनी आणि शुक्र-गुरूचा शुभयोग याच ग्रहांमधून अपेक्षित यश मिळवता येते. संपर्क, संबंध, चर्चा यामधून प्रभाव प्रस्थापित करता येतो. नवीन कल्पना, नवीन योजना यांना प्रतिसाद मिळवता येतो. यासाठी परिश्रम घ्यावे लागतील. खर्चही अधिक करावा लागेल. त्यातून व्यापारपेठ, राजकारण, कलाप्रांत, विज्ञान यामधून उजळणारी प्रतिमा समाधान मात्र देऊन जाते आणि रवी, राहूची अनिष्टता नियंत्रित करता येते.
दिनांक : ३१, ४, ५ शुभ काळ.
महिलांना : निर्धाराने पुढे चला, सफलता मिळेल.

विचलित होऊ नका
सप्तमात राहू, दशमात शुक्र-मंगळ, अनुकूल सूर्य-बुध असल्याने परिश्रमाचा आनंद मिळेल. साडेसाती, अष्टमात गुरू निर्णय कृतीमध्ये व्यत्यय आणतील, परंतु विचलित होऊ नका. शनिवारच्या चंद्र-हर्षल नवपंचम योगातून अचानक प्रकरणांना कलाटणी मिळेल. त्यामध्ये व्यापार, राजकारण, शिक्षण, कला असे विभाग असतील. यात प्रगतीचा प्रवास आपणास सुरू ठेवता येईल. मंगलकार्ये ठरतील. बढती, बदली संभवते. नवीन परिचय होतील.
दिनांक : ३१, १, २, ३ शुभ काळ.
महिलांना : प्रयत्न करा, यश मिळेल.

अनिष्टता नियंत्रित कराल
भाग्यात शुक्र-मंगळ, सप्तमात गुरू, दशमात सूर्य आणि बुधाचं सहकार्य याच ग्रहांमधून विचारांना वेग मिळेल. कर्तृत्वाला उत्थान लाभेल आणि सिंह व्यक्ती शनी, राहूची अनिष्टता नियंत्रित करून अनेक प्रांतात यशस्वी ठरू लागतील. मंगळवारच्या शुक्र-गुरू शुभयोगाच्या आसपास काही घटना अविस्मरणीय असतील. त्यात शिक्षण, कला, प्रपंच, उद्योग यांचा समावेश राहील. श्री मारुतीची उपासना, आराधना मन:शांतीची ठरणार आहे. नोकरीचा खटाटोप सत्कारणी लागेल, जागेचा प्रश्न सुटेल.
दिनांक : १ ते ५ शुभ काळ.
महिलांना : समाजात सन्मान मिळतील.

सीमारेषेवर असंतोष
साडेसाती, अष्टमात शुक्र-मंगळ, गुरूची नाराजी कन्या व्यक्तींच्या व्यावहारिक सीमारेषा असंतोषांनी धुमसत राहतील. संयम, शिस्त, सत्य, प्रार्थना व रवी, राहूच्या सहकार्याने कामे होतील. शुक्रवारच्या बुध राश्यांतरापासून त्याचा परिणाम प्रभावी होऊ लागेल. त्यातून कार्य, कृती यांना वेग देता येईल. हवामानाचा अंदाज घेऊन कार्याचं रंगरूप ठरवा. त्यामध्ये कृषी, प्रांत, कला, प्रयोग, व्यापारी केंद्र यांचा समावेश असेल.
दिनांक : १ ते ५ शुभ काळ.
महिलांना : सफलतेसाठी सामना करावा लागेल.

झटपट निर्णय घ्या
पंचमात गुरू, लाभात शनी यांच्या भक्कम आधारामुळे रवी, राहूचे अनिष्ट परिणाम प्रतिष्ठेपर्यंत पोहचू शकणार नाहीत. सप्तमातील शुक्र, मंगळ सहयोग आर्थिक, प्रापंचिक, व्यावसायिक समस्या सोडवण्यात सहकार्य करतील. शक्यतो झटपट निर्णय घेऊन कृती करणे अधिक फायद्याचे आहे आणि वाट पाहण्यात धोका आहे. शुक्र, गुरूचा शुभयोग कलाप्रांत, शिक्षण, अभिनव उपक्रम यातून यश देतो.
दिनांक- ३१, ४, ५, ६ शुभ काळ.
महिलांना- हुशारीने विजय संपादन कराल.

धावपळ सुरू होईल
शनी, राहू अनुकूल आहेत. सप्तमात सूर्य, षष्ठात मंगळ यांच्यामुळे नियमित उपक्रम सुरू ठेवता येतील. नवीन कार्यक्षेत्राशी संबंध प्रस्थापित करू शकाल. कृषी कार्याची रूपरेखा पक्की करावी लागणार आहे. चतुर्थात गुरू, नाराज बुध, शुक्र काही दिवस सारखी धावपळ करायला लावतील. दुसऱ्यांवर विसंबून अवास्तव साहस करू नका. तसेच मध्यस्थी कटाक्षाने टाळा. धर्मकार्यात आनंद मिळेल. यात्रा ठरतील. नवीन नोकरीचा शोध सुरू करावा लागेल. मात्र शोधकार्यात संयम ठेवावा लागेल.
दिनांक- ३१ ते ३ शुभ काळ.
महिलांना- प्रपंच आणि प्रकृतीवर लक्ष ठेवा. विचार करून निर्णय घ्या.

प्रशंसा होईल
पराक्रमी राहू, पंचमात शुक्र-मंगळ, भाग्यात शनी अनंत हस्ते देणारा काळ, अशी प्रशंसा या ग्रहकाळाची होत असते. मंगळवारच्या शुक्र-गुरू शुभयोगाच्या आसपास असाल त्या क्षेत्रात याचा प्रत्यय येऊ शकेल. प्रवास होतील. शुभकार्ये ठरतील, समाजात सन्मान मिळतील. कला, शिक्षण, विज्ञानात धनू व्यक्तींच्या स्मरणात राहतील अशा काही घटना घडतील. थोडक्यात, अविस्मरणीय घटनांचा काळ आहे. षष्ठातला रवी शत्रूंना पुढे सरकू देत नाही. अचानक नवे मोठे परिचय होतील, सभा गाजतील.
दिनांक- १ ते ५ अनुकूल काळ.
महिलांना- श्रेष्ठत्व सिद्ध करणारा ग्रहकाळ असल्याने आनंदी राहाल.

भाऊबंदकी त्रास देईल
राशिस्थानी राहू-अनुकूल गुरू, पंचमात सूर्य यांच्यामुळे मकर व्यक्तींच्या उलाढाली सुरू राहतील. बुध-शुक्र सहयोग प्राप्ती आणि प्रपंचात सहकार्य करणार आहे. शुक्र- गुरू शुभयोगातून काही दडपण कमी होतील, परंतु शनी, मंगळाच्या अनिष्ट परिणामांनी शत्रू, समस्या, शासकीय प्रकरण यांना आक्रमणांची संधी मिळू नये यासाठी सतर्क राहावे लागणार आहे. भाऊबंद, भागीदार त्रास देतील. पण संयमाने निर्णय घ्या. शुक्रवारचा बुध राश्यांतर शिक्षणात उपयुक्त ठरणार आहे.
दिनांक- १ ते ५ शुभ काळ.
महिलांना- वाद टाळा, संधी साधा, सन्मान होतील. मन प्रसन्न राहील.

प्रवास सत्कारणी लागेल
राशिस्थानी गुरू, पराक्रमी शुक्र-मंगळ, सप्तमात शनी या ग्रहकाळामुळे सुरू असलेल्या प्रवासात मागे वळून बघण्याची गरज उरणार नाही. खरेदी-विक्री, करार, भेटी, चर्चा संपर्क यांमधून शनिवारच्या चंद्र-हर्षल नवपंचम योगापर्यंतचा प्रवास सत्कारणी लागणारा आहे. कला, साहित्य, शिक्षण क्षेत्रात नव्या संधी उपलब्ध होतील. व्यापार पैसा देईल. चतुर्थात सूर्य, व्ययस्थानी राहू प्रकृती आणि प्रपंच यांमधील प्रश्न वेळेवर सोडवले तर त्रास देणार नाहीत. भक्तिमार्ग आनंद देईल.
दिनांक- ३१, ४, ५, ६ शुभ काळ.
महिलांना- दुसऱ्यांवर विश्वासून कृती करू नका. स्वत:च्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा.

संधीवर लक्ष ठेवा
पराक्रमी सूर्य मेष राशीत शुक्र- मंगळ, लाभात राहू यांच्यातील शुभ परिणाम अचूक टिपण्यासाठी प्रत्येक संधीवर लक्ष ठेवावे लागणार आहे. अन्यथा अनिष्ट गुरू, शनी सफलता रोखू शकतील. व्यापारी सौदे, नवे करार, उधारी- उसनवारी, आश्वासन, कला आविष्कार, साहित्याचे विषय, शिक्षणात प्रवेश अशा संधींचा समावेश होईल. परमेश्वरी चिंतनातून होणारी एकाग्रता शुक्र-नेपच्यून शुभयोगामुळे व्यावहारिक यशात रूपांतरित होऊ शकते. स्फूर्ती त्याचा केंद्रबिंदू राहील.
दिनांक- १, २, ३, ६ शुभ काळ.
महिलांना- प्रपंच प्रसन्न ठेवाल. सांस्कृतिक क्षेत्रात चमकाल.