Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ५ जून २००९

व्यापार - उद्योग

‘फिशिंग अॅटॅक्स’पासून बचावासाठी नेटकरांना मार्गदर्शक
व्यापार प्रतिनिधी:
कन्टेट मॅनेजमेंट सिस्टिम सुरक्षित राखण्यासाठी सेवा उपलब्ध करणाऱ्या प्रख्यात कॅस्पर्सकी लॅबने फेसबुक संदर्भातील फिशिंग अॅटॅकपासून सुरक्षित राहण्यासाठी इंटरनेट यूजर्सना लाभदायक ठरणारे गाईड उपलब्ध केले आहे. सायबर गुन्ह्य़ांपासून आता सुरक्षित राहता येईल. परंपरागत सुरक्षाप्रणालींपेक्षा ही प्रणाली अधिक सुरक्षित असून, ई-मेलद्वारे होणाऱ्या हल्ल्यापासून संरक्षण करते. कॅस्पर्सकी लॅबच्या ग्लोबल रिसर्च अँड अॅनालेसिस टीमचे सदस्य डेव्हिड एम्म यांनी स्पष्ट केले की, ‘फेसबुकला वाढता प्रतिसाद मिळाल्यानंतर ट्वीटरप्रमाणेच आणखी काही लोकप्रिय साईटसुद्धा याकडे आकर्षित झाल्या आहेत. त्यामुळे सायबर क्राईमचा धोकासुद्धा वाढला आहे. सायबर गुन्हेगारांचे फिशिंग स्कॅम्स यशस्वी होऊ लागले असून, त्यामुळे त्यांच्या जाळ्यात न फसण्यासाठी अतिशय काळजी घेणे गरजेचे आहे. ईमेलद्वारे संभवणाऱ्या धोक्यापासून सुरक्षित राहण्यासाठी ही प्रणाली अतिशय प्रभावशाली आहे. इंटरनेट यूजर्सने विश्वासार्ह मित्रांनी पाठविलेल्या लिंकवरच क्लिक करावे. सर्वसाधारण स्पॅम मेसेजबाबतही खबरदारी घ्यावी. कॅस्पर्सकीच्या असे निदर्शनास आले की, हे गुन्हेगार फेसबुकवर छोटा मेसेज करून महत्त्वपूर्ण माहिती हॅक करतात आणि यूजर्सचे मोठे नुकसान होऊ शकते. आयटी सिक्युरिटी संदर्भात सुरक्षा कवच पुरविणारी ही वैश्विक स्तरावरील कंपनी आहे. व्हायरस, स्पायवेअर, क्राईमवेअर, हॅकर्स, फिशिंग, स्पॅमबाबतही कं पनी सुरक्षा प्रदान करते. घरगुती ग्राहक, एसएमबीएस मोठय़ा संस्था आणि मोबाईल कम्प्युटिंग क्षेत्रात कॅस्पर्सकी लँब उच्च श्रेणीची सुरक्षा प्रदान करते.

सन्मार स्पेशालिटी केमिकल्सच्या ‘इंटेक बिझनेस’वर डॉर्फ केटलचा ताबा
व्यापार प्रतिनिधी:
सन्मार स्पेशालिटी केमिकल्स लिमिटेडने इंटेक बिझनेस विभाग आघाडीची स्पेशालिटी केमिकल्स कंपनी डॉर्फ केटलला हस्तांतरित केला आहे. इंटेक हा ऑरगॅनिक टिटानेट्स, पोलिव्हिनील फॉर्मल आणि पोली आयसोसिएट्समधील जगभरातील आघाडीच्या व्यवसायांपैकी एक असून त्याचा उत्पादन प्रकल्प दादर येथे आहे. या व्यवसायामध्ये ६० व्यावसायिक कार्यरत आहेत. संशोधन व विकास सुविधा असलेल्या या व्यवसायाने निर्यातीवरही भर दिला आहे. डॉर्फ केटल केमिकल्स ही सध्या जगभरात झपाटय़ाने वाढणारी स्पेशालिटी केमिकल्स कंपनी आहे. १५ वर्षांहूनही कमी काळात डॉर्फ केटलने डाऊनस्ट्रीम हायड्रोकार्बन इंडस्ट्रीज आणि अँकिलरी इंडस्ट्रीजसाठी स्पेशालिटी केमिकल्स पुरवठादार म्हणून आपली ओळख प्रस्थापित केली आहे. डॉर्फ केटलचा भर नावीन्यपूर्ण उत्पादने आणि दर्जेदार उत्पादनप्रक्रियेवर असल्याने डॉर्फ केटलने खरेदी केल्याने इंटेकचा व्यवसाय वृद्धिंगत होणार आहे.

एअरटेलचा ‘बडा टॉपअप रिचार्ज’
व्यापार प्रतिनिधी:
भारती एअरटेलने आपल्या महाराष्ट्र आणि गोवातील प्रीपेड ग्राहकांसाठी फक्त १५० रुपयांचे आजपर्यंतचे सर्वात स्वस्त ‘बडा टॉपअप रिचार्ज’ सादर केले आहे. याचा फायदा मुंबई व्यतिरिक्त महाराष्ट्र व गोवा मंडळातील प्रीपेड ग्राहकांना होणार आहे. या बडा टॉपअप रिचार्जद्वारे ग्राहकांना १५० रुपयांत संपूर्ण टॉकटाइमसह एअरटेलची उच्च दर्जाची दूरसंचार सेवा अनुभवता येणार आहे. एअरटेलने राज्यातील आपल्या सेवेच्या विस्तारांतर्गत महाराष्ट्रात १८०० नवीन साइटचा समावेश केला आहे. त्यामुळे मागील वर्षभरामध्ये मुंबई, महाराष्ट्र व गोवा यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या एअरटेलच्या एकूण साईटची संख्या ९००० पर्यंत पोहोचली आहे. एअरटेलतर्फे सादर करण्यात आलेल्या या नेटवर्क विस्तार व किफायतशीर लाभ योजनांचा राज्यामध्ये मोबाईल सेवांचा विस्तार करणे हा मुख्य उद्देश आहे, असे एअरटेलचे महाराष्ट्र-गोवा विभागाचे सीईओ मनू तलवार यांनी सांगितले.

‘हेल्दी फॅमिली’ आरोग्य विमा योजना
व्यापार प्रतिनिधी:
‘मॅक्स न्यूयॉर्क लाईफ इन्शुरन्स’ने संपूर्ण कुटुंबासाठी ‘लाईफलाईन हेल्दी फॅमिली’ ही नवी आरोग्य विमा योजना सादर केली आहे. रुग्णालयीन उपचार, शस्त्रक्रिया, गंभीर आजार अशा स्थितीत संपूर्ण कुटुंबाला एकाच छत्राखाली दीर्घकालीन विमा संरक्षण मिळवून देणारी ही र्सवकष आणि अशा स्वरुपाची पहिलीच योजना आहे. ‘लाईफलाईन हेल्दी फॅमिली’ योजनेअंतर्गत ग्राहकांना विमा उद्योगातील सध्याची सवरेत्कृष्ट आणि पहिलीच अशी अनेक वैशिष्टय़े देऊ करण्यात आली आहेत. विशेषत: जन्मजात दोषांबाबत (कॉन्जनायटल डिसऑर्डर) विमा संरक्षण देणारी पहिली अणि एकमेव कंपनी हा मान ‘मॅक्स न्यूयॉर्क लाईफ’ ला मिळाला आहे. पॉलिसीत मातेला सलग १२ महिन्यांचे विमा संरक्षण असेल तर तिने जन्म दिलेल्या आपत्याचे जन्मजात दोष दूर करण्यासाठी सूचीत समावेश असलेल्या प्राथमिक टप्प्याच्या शस्त्रक्रियांच्या खर्चाची भरपाई ही योजना देते. या योजनेत रुग्णालयीन उपचाराचा सर्वाधिक दिवसांचा काळ व दैनिक खर्च मर्यादा दिला जातो. विमा संरक्षण दिल्या जाणाऱ्या गंभीर आजारांची संख्याही सर्वाधिक आहे. ही योजना सर्वाधिक दीर्घ म्हणजे १० वर्षांच्या मुदतीसाठी आरोग्य विमा संरक्षण देते. कुटुंबाच्या संख्येवर कमाल मर्यादा नाही. विमा दावा केल्यानंतरही शस्त्रक्रिया लाभांत वार्षिक वृद्धी होते. वयाच्या ७५ वर्षांपर्यंत खात्रीपूर्वक नूतनीकरण करता येते. पालकांसाठी सुसंगत व गटवार फायदे मिळतात. असे कंपनीने वरिष्ठ उपाध्यक्ष सुमीत राय यांनी सांगितले.

हेल्थ अॅडव्हान्टेज प्लस योजना
व्यापार प्रतिनिधी:
आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इंश्युरन्स या खासगी विमा कंपनीने ‘हेल्थ अॅडव्हान्टेज प्लस’ आरोग्य विमा योजना सुरू केली आहे. या आरोग्य विमा योजनेचे वैशिष्टय़ म्हणजे महिलांना प्रसूती काळात प्रसूती खर्चासह इस्पितळाचा ओपीडी खर्च भरून देणारे विमा संरक्षण देण्यात आले आहे. या योजनेंतर्गत औषधे, ड्रग्स, अॅम्ब्युलन्स भाडे आणि इस्पितळातील वास्तव्यासाठीच्या खर्चाची भरपाई केली जाणार आहे. आयसीआयसीआय लोंबार्डची हेल्थ अॅडव्हँटेज प्लस पॉलीसी खरेदी केल्याच्या पहिल्या दिवसापासूनच ओपीडी खर्चाचे संरक्षण देण्यात येते. तसेच पॉलिसीधारक आयकर अधिनियम कलम ८० डी अंतर्गत कर कायद्यानुसार मिळणारे अधिकाधिक लाभ उठवू शकतो. त्याचप्रमाणे या पॉलिसीत मोतिबिंदू, मूतखडा, अँजिओग्रॅफी, केमोथीरॅपी, नेत्रशस्त्रक्रिया तसेच डायलेटेशन व क्युरेटेज इत्यादी विकारांच्या उपचारात हॉस्पिटलमधील २४ तासांपेक्षा कमी वास्तव्यासाठी सुद्धा विमा संरक्षण देण्यात येते, असे आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इंश्युरन्स विमा कंपनीने हेल्थ इंश्युरन्स विभाग प्रमुख संजय दत्त यांनी सांगितले.

‘गॅरंटी बिल्डर’ युलिप योजना
व्यापार प्रतिनिधी:
खासगी क्षेत्रातील आयुर्विमा कंपनी भारती अक्सा लाइफ इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडने गुंतवणूक मुद्दल अर्थात प्रीमियम रकमेबाबत पॉलिसीधारकांना हमी देणारी ‘गॅरन्टी बिल्डर’ नावाची नवीन युनिटसंलग्न योजना दाखल केली आहे. युलिप योजनेचे उद्दिष्ट हे ग्राहकांच्या दीर्घकालीन गरजांची काळजी घेत असते, तर ‘गॅरन्टी बिल्डर’ योजना सध्याच्या अनिश्चिततेबाबत सावध असलेल्या तरीही भारतीय अर्थव्यवस्थेच्या वृद्धींगतेत सहभाग हवा असणाऱ्या पारंपरिक आणि नवीन गुंतवणूकदारांसाठी आहे. नावाप्रमाणे ‘गॅरन्टी बिल्डर’ वृद्धी आणि संरक्षण यांच्यात परिपूर्ण संतुलन प्राप्त करून देते. केवळ गुंतवणूक मुद्दलीची हमी नव्हे तर ही योजना पॉलिसीधारकांना वाढत जाणारे ‘गॅरन्टीड मॅच्युरिटी’ मूल्यही देऊ करते. ही वाढ प्रति वर्ष एक टक्का इतकी आहे. मुदतपूर्तीनंतर पॉलिसीधारकाला फंडाचे मूल्य किंवा १५ वर्षांच्या शेवटी असलेली ११५ टक्के गॅरन्टीड मॅच्युरिटी व्हॅल्यू यापैकी जे अधिक असेल ते मिळते. भारतीय ग्राहकांना अशा तऱ्हेने प्राप्त झालेली ही पहिलीच सुविधा असल्याचे भारती अक्सा लाइफचे सीईओ नितीन चोप्रा यांनी सांगितले.