Leading International Marathi News Daily

शनिवार, ६ जून २००९

‘घसरगुंडी’वरचा मराठी टक्का
मराठी टक्का का घसरला ? या चार शब्दांच्या प्रश्नावरून कदाचित महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीची लढाई घनघोर होऊ शकेल! इतकी ही गंभीर बाब आहे आणि सत्ताधाऱ्यांना घायाळ करण्यासाठी विरोधकांना आयते सापडलेले धारदार शस्त्र आहे !
जागतिक मंदीच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात सर्व स्तरांवर विविध उत्पादनाचा टक्का तर घसरलाच पण सर्वात गांभीर्याची बाब म्हणजे महाराष्ट्राच्या लोकसंख्येत मराठी माणसाचाही टक्का वर्षांगणिक घसरत चालला आहे. महाराष्ट्राच्या २००८ - ०९ च्या आर्थिक पाहणीने हे धक्कादायक चित्र सामोरे आणले आहे.

काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी विरोधक सज्ज
गणेश कस्तुरे

नांदेड जिल्ह्य़ातल्या वेगवेगळ्या मतदारसंघाची झालेली पुनर्रचना, मतदारसंघात चव्हाण परिवाराला मानणारा मोठा गट, मतदारसंघात झालेली विकासकामे, शिवसेना-भाजपा युतीचे या भागात असलेले नगण्य अस्तित्व, मुख्यमंत्री समर्थकांची असलेली मोठी फळी या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यापुढे आव्हान कसे उभे करावे या विवंचनेत विरोधी पक्षाचे पदाधिकारी आहेत. काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला सुरूंग लावता येईल की नाही यासाठी आतापासून चाचपणी सुरू असली तरी विरोधी पक्षाला कोणताही मार्ग सापडला नाही. काँग्रेसचे दिवंगत नेते शंकरराव चव्हाण यांनी दीर्घकाळ नेतृत्व केलेल्या या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसनेही बऱ्यापैकी पाय रोवले आहेत.

सुरक्षित मतदारसंघात राष्ट्रवादीची सत्वपरीक्षा!
जयप्रकाश पवार

बारामतीनंतर सर्वाधिक सुरक्षित म्हणून दिंडोरी लोकसभा मतदारसंघाला शरद पवारांनी आपल्या यादीत स्थान दिल्यानंतरही त्यांचा हा दावा मतदारांनी भाजपला विजयी करीत सपशेल खोटा ठरविला. अनुसूचित जमातीसाठी राखीव, निवडून येणारा उमेदवारही आदिवासी असला तरी आजवरच्या निवडणुकांत स्थानिक सधन तसेच मराठा नेत्यांची पडद्यामागील सूत्रधाराची भूमिका कळीची ठरत आली. येत्या विधानसभा निवडणुकीतही ‘मागील पानावरून पुढे सुरु’ या उक्तीला अनुसरत लोकसभेतील घटनाक्रमाची पुनरावृत्ती झालीच तर हा सुरक्षित मतदारसंघ राष्ट्रवादीची सत्वपरीक्षा पाहणारा ठरू शकतो. काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेसकडे असा या मतदारसंघाचा प्रवास झाला आहे. थोडक्यात, चुरशीच्या तीव्रतेमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ जशी राष्ट्रवादीची दमछाक करेल तव्द्तच कम्युनिस्ट, युतीलाही ते सहजी खिशात घालता येणे अवघड आहे.

विधान परिषद व राज्यसभेसाठी नेत्यांची मोर्चेबांधणी
नगर जिल्हा
श्रीरामपूर, ५ जून/प्रतिनिधी

लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असले, तरी नगर जिल्ह्य़ात मात्र राज्यसभा आणि विधान परिषदेवर वर्णी लागावी, म्हणून नेत्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
राज्यसभेच्या तीन जागा रिक्त आहेत. राष्ट्रवादीचे नेते गोविंदराव आदिक, काँग्रेसचे माजी खासदार बाळासाहेब विखे यांचे राज्यसभेसाठी प्रयत्न सुरू आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेले रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले यांनीही राज्यसभेचा आग्रह धरला आहे.

अपंग मतदारांकडेही लक्ष द्या!
मुंबई, ५ जून / प्रतिनिधी

राज्यातील एकूण मतदारांपैकी सुमारे पाच लाख मतदार (२००१ च्या जनगणनेनुसार) अस्थिव्यंगाने अपंग आहेत. ते हिररीने मतदानही करतात. असे असले तरी मतदान केंद्रांपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक सुविधा पुरविण्याकडे मात्र दुर्लक्ष करण्यात येते, असा आरोप ‘अपंग हक्क विकास मंच’ या संस्थेचे संघटक शंकर साळवे यांनी केला आहे. ते म्हणाले की, शहरी भागांतील मतदान केंद्रे पहिल्या, दुसऱ्या तर काही वेळा तिसऱ्या मजल्यावर असतात. अपंगांसाठी त्या ठिकाणी अपंगांसाठी रॅम्प असणे गरजेचे आहे. तात्पुरत्या स्वरूपात रॅम्प बसविण्यासाठी निधीही उपलब्ध करून दिलेला असतो.

‘मंदिर वही बनाएंगे’ कॅसेटवरील बंदी उठविण्याची मागणी
विधानपरिषद प्रश्नोत्तरे
मुंबई, ५ जून / प्रतिनिधी
‘मंदिर वही बनाएंगे’ या कॅसेटवर घातलेली बंदी अयोग्य असल्याने ती त्वरित उठविण्यात यावी, अशी मागणी करीत आज विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधानपरिषदेत मोकळ्या जागेत धाव घेतली आणि त्यानंतर सभात्याग केला. शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर औरंगाबाद आणि नांदेडमध्ये दगडफेक करण्यात आली, या बाबत पाशा पटेल यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर नितीन गडकरी यांनी ‘मंदिर वहीं बनाएंगे’च्या कॅसेटचा विषय उपस्थित केला.