Leading International Marathi News Daily

शनिवार, ६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

एक्स्प्रेस इन्व्हेस्टिगेशन
मुख्य सचिवांना माहिती देण्यासही विलंब
धवल कुलकर्णी, सागनिक चौधरी आणि वाय.पी. राजेश
मुंबई, ५ जून

 

२६/११ चा हल्ला घडल्यानंतर राज्याचे मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांना पोलिसांनी तात्काळ माहिती देणे अपेक्षित होते. परंतु त्यांनाही कळविण्यात आले नाही. तासाभरानंतर त्यांना या हल्ल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांनी केंद्रीय सुरक्षा पथकांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. केंद्रीय पथके येईपर्यंत अतिरेक्यांनी संपूर्ण ताबा घेतला होता.
स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरनुसार कायदा व सुव्यवस्था विभागाच्या पोलीस सहआयुक्ताने पोलीस नियंत्रण कक्षाचा ताबा घेऊन आपात्कालिन व्यवस्थेचा कमांडर म्हणून काम पाहणे आवश्यक होते. तथापि जेव्हा गफूर यांना हल्ल्याबाबत माहिती मिळाली तेव्हा त्यांनी गुन्हे विभागाचे सहआयुक्त राकेश मारिया यांना दूरध्वनी करून नियंत्रण कक्षाचा ताबा घेण्यास सांगितले. वास्तविक मलबार हिल येथील अवंती इमारतीत राहणारे मारिया आणि सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) के. एल. प्रसाद हे हल्ला झाला तेव्हा घरी होते आणि लगेचच ते एकाच वाहनातून निघाले. प्रसाद ओबेराय-ट्रायडेन्ट येथे उतरले तर मारिया नियंत्रण कक्षाच्या दिशेने गेले.
नरिमन पॉइंट-कुलाबा परिसर ज्या परिमंडळ एकमध्ये येतो त्या परिसराचे उपायुक्त विश्वास नांगरे-पाटील हे तेव्हा गाडीत ताज महल हॉटेल व टॉवरपासून १० मिनिटांवर होते. हल्ल्याचे वृत्त ऐकताच त्यांनी हॉटेलच्या दिशेने जाण्याचे ठरविले. पोलीस महासंचालक ए. एन. रॉय यांनी कुलाबा येथे विवाहसमारंभासाठी जात असताना बिनतारी संदेश यंत्रणेवर हल्ल्याबाबत ऐकले आणि तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांना दूरध्वनी केला. उपायुक्त घटनास्थळी पोहोचत असल्याचे पाटील यांना सांगून रॉय हे आपल्या कार्यालयाकडे गेले. तेथे त्यांनी नियंत्रण कक्ष स्थापन केला. आर. आर. पाटील हेही तेथे आले. तरीही हल्ल्याच्या ठिकाणी पोलीस पथके पाठविण्याचे सुरूच होते. (उर्वरित वृत्त )