Leading International Marathi News Daily

शनिवार, ६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘बँकेने शेतकऱ्यांना त्वरित कर्ज द्यावे’
अन्यथा हल्लाबोल आंदोलन, भाजपचा इशारा
नागपूर, ५ जून/प्रतिनिधी

पेरणीचा हंगाम सुरू होण्यास अत्यंत कमी कालावधी असताना बँकांकडून शेतक ऱ्यांना शेतीच्या कामासाठी कर्ज वितरित न केल्याने शेतक ऱ्यांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. राष्ट्रीयीकृत आणि

 

जिल्हा बँकांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून न दिल्यास बँकांवर हल्लाबोल आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष अशोक धोटे यांनी पत्रकार परिषदेत दिला. तसेच शेतक ऱ्यांना चांगल्या दर्जाचे बी-बियाणेही लवकरच उपलब्ध करून द्यावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
पेरणीसाठी बँकांकडून पीककर्ज वितरित करण्याची घोषणा करण्यात आली होती. यात जिल्हा बँकेकडून २०० कोटी, तर तर राष्ट्रीयीकृत बँकांकडून ५९५ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. मात्र, अजूनपर्यंत जिल्हा बँकेने ८६ कोटींचे कर्ज वाटप केले आहे. त्यामुळे अनेक शेतक ऱ्यांना कर्ज मिळाले नाही. तसेच अनेक कर्जमुक्त शेतक ऱ्यांना बँकां चुकीच्या धोरणामुळे कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे ऐन हंगामाच्या तोंडावर बँकांनी कर्ज न दिल्यास खाजगी सावकारांकडे जाण्याची वेळ शेतक ऱ्यांवर येईल आणि याच शासनच जबाबदार राहील, असेही धोटे यावेळी म्हणाले. त्यामुळे सरकारने यात हस्तक्षेप करून कर्ज वितरणाची प्रक्रिया सुरळीतपणे हाताळावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
यावेळी सरकारच्या शेती उपयोगी वस्तूंच्या पुरवठय़ाबाबत धोटे म्हणाले, गेल्यावर्षी मागणीच्या तुलनेत शासनाने केवळ ३५ टक्के बियाण्यांचा पुरवठा केला होता. यंदाही सरकारने बियाणे आणि खतांची कुठल्याही प्रकारे टंचाई जाणवणार अशी घोषणा केली असली, तरी कृषी विभाग अजूनही यासंदर्भात पूर्णपणे तयारीत दिसत नाही. महाबीजने यंदा खाजगी वितरकांच्या तुलनेत कमी दराने बियाणे उपलब्ध करून देण्याची घोषणा केली असली, तरी प्रत्यक्षात बियाणेच अजूनही बाजारात उपलब्ध नसल्याची स्थिती आहे.
या सर्वावर वेळीच उपाययोजना न केल्यास भाजपतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे. यासंबंधी सर्व माहिती आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन कृषीमंत्री व जिल्ह्य़ाचे पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांना देण्यात आले आहे. त्यामुळे यावर काहीतरी उपाययोजना करण्यात येतील, अशी अपेक्षा धोटे यांनी यावेळी केली. पत्रकार परिषदेला आशीष देशमुख यांच्यासह जिल्हा भाजपचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.