Leading International Marathi News Daily

शनिवार, ६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

कोर्ट फी स्टँपची पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी
नागपूर, ५ जून / प्रतिनिधी

कोर्ट फी स्टँपची पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाच्या लिगल सेलतर्फे करण्यात आली आहे. स्टँप विक्रेत्यांच्या बेमुदत संपामुळे कोर्ट फी स्टँप खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद झाले आहेत. परंतु त्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्याकरता कोणत्याही प्रकारची व्यवस्था प्रशासनाने केलेली नाही. त्यामुळे वकील, पक्षकार यांना न्यायालयामध्ये तसेच विविध

 

सरकारी कार्यालयात अर्ज करताना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लिगल सेलचे अध्यक्ष अॅड. नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय तसेच कलेक्टर ऑफ स्टँप यांना जाहीर निवेदन सादर केले आहे. त्या निवेदनाची दखल घेत पडोळे यांनी इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्री (आय.जी.आर.) यांच्या कार्यालयाशी संपर्क करून यासंदर्भात चर्चा केली. कोर्ट फी स्टँप उपलब्ध करून देण्याची पर्यायी व्यवस्था एक दोन दिवसात होऊन वकील, जनतेला कागदपत्रे सादर करताना मुद्रांक विक्रेत्यांच्या बेमुदत संपामुळे उद्भवलेल्या स्थितीचा त्रास होणार नाही, असे आश्वासन दिले. एक दोन दिवसात प्रशासनातर्फे पर्यायी व्यवस्था करण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना, जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, असे आश्वासन अतिरिक्त जिल्हाधिकारी राजलक्ष्मी शाह यांनी सुद्धा दिले. शिष्टमंडळामध्ये नितीन देशमुख यांच्या सोबत इतर पदाधिकारी विशाल सुरपाम, अख्तर अन्सारी, रामन नाकतोडे, अन्वर अली सय्यद, अमरीश सोनक, चंद्रशेखर साखरे, नवीन पटेल, चैतन्य बारापात्रे, प्रशांत गोडे तसेच विधि पदवीधर संदीप बावनगडे, रूपेश पाटील, हितेश काटेकर आदी वकील मंडळी उपस्थित होती.