Leading International Marathi News Daily

शनिवार, ६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

उत्तर महाराष्ट्रातील अनेक शाळांच्या टक्केवारीत वाढ
ठिकठिकाणच्या वार्ताहरांकडून

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात बहुतेक कनिष्ठ महाविद्यालयांचा बारावीचा निकाल ९० टक्क्यांपेक्षा अधिक लागला. विविध पक्ष, संस्था व संघटनांकडून महाविद्यालयांमधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या

 

सत्कारांचे आयोजन ठिकठिकाणी होत आहेत.
माया आवारे प्रथम
सिडको येथील कर्मवीर शांतारामबापू कोंडाजी वावरे महाविद्यालयाचा निकाल ८२.४९ टक्के लागला. विज्ञान शाखेचा निकाल ८८.३३ टक्के लागला असून माया आवारे (८३.६७) महाविद्यालयात प्रथम आली. कला व वाणिज्य शाखेचा निकाल अनुक्रमे ७५ व ८३ टक्के लागला. कला शाखेत ज्योती वाघचौरे (८०.१७) व वाणिज्य शाखेत प्रियंका वाघ (७९.३३) प्रथम आले.
सटाणा केंद्रात प्रिया संतानी प्रथम
सटाणा महाविद्यालयाचा निकाल ७० टक्के लागला. विज्ञान शाखेची प्रिया संतानी ८७.२५ टक्के गुण मिळवत केंद्रात पहिली आली. व्ही.पी.एन. कनिष्ठ महाविद्यालय व जिजामाता कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल अनुक्रमे ७५.३४ व ८१.१७ टक्के लागला. सटाणा महाविद्यालयातून विज्ञान शाखेचा प्रकाश बिरारी (८६.८३) टक्के गुण मिळवून व्दितीय आला. कला विभागातून रोहन अहिरे (८४.२५) व राजेंद्र चौधरी (७९) पहिले व दुसरे आले. वाणिज्य विभागातून निलेश निकम (७६.३३) प्रथम तर नसरीन शेख (७३.४०) द्वितीय आली. किमान कौशल्य शाखेतून शिवदास बोराडे (६९.३३) व दीपक पवार (६६.१७) प्रथम व द्वितीय आले.
जिजामाता कला महाविद्यालयात भाग्यश्री पवार (८१.१७), शुभांगी साळवे (७७.३३) तर व्ही.पी.एन. कनिष्ठ महाविद्यालयात गौरव चव्हाण (८०.१७)व अविनाश मोरकर (७८) प्रथम व द्वितीय आले.
हरसुल महाविद्यालयाचा निकाल ८१.३७ टक्के
हरसुल येथील के.बी.एच. कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ८१.३७ टक्के निकाल लागला. छाया बाविस्कर ७७.५० टक्के गुण मिळवून प्रथम, मयुरी बावीस्कर (७५.८३) तर नविन शेंडे(७५) व्दितीय व तृतीय आले.
मेशीचा निकाल ९४.६१ टक्के
देवळा तालुक्यातील मेशी येथील जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९४.६१ टक्के लागला असून मनीषा सोनवणे (७९) कला शाखेत प्रथम आली. पूनम सूर्यवंशी (७४.६७), हर्षांली पवार (७३.६७) द्वितीय व तृतीय आले.
मनमाडच्या छत्रे विद्यालयाचा १०० टक्के निकाल
मनमाडच्या छत्रे विद्यालयाचा १०० तर मरेमा विद्यालयाचा निकाल ९४ टक्के लागला. केंद्राचा एकूण निकाल ६० टक्के लागला. पुनर्रपरीक्षार्थीचा निकाल ३५.२८ टक्के लागला. छत्रे विद्यालयात रमेश रामधनी (८२.८३) प्रथम, राहुल खैरे (७७.८३) व धनंजय घोरपडे (७६.३३) अनुक्रमे द्वितीय व तृतीय आले. मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९४ टक्के लागला. क्रांती शेजवळकर (८८.६७) प्रथम तर पूजा चकोर (८६.१७), हर्षद शेवाळे (७७.८३) दुसरे व तिसरे आले. महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित मनमाड महाविद्यालयाचा चारही शाखांचा निकाल ५७.३६ टक्के लागला. कला शाखा ५९, विज्ञान ५७ तर वाणिज्य शाखेचा ६०.२२ टक्के निकाल लागला. किमान कौशल्याचा सर्वाधिक म्हणजे ७० टक्के निकाल लागला.
नांदगाव
नांदगाव महाविद्यालयात कला शाखेचा निकाल ५३.०१, वाणिज्य ३०.०६ तर विज्ञान शाखेचा निकाल ८६.८६ टक्के निकाल लागला. कला शाखेत माधुरी आहिरे (६९.३३), भाग्यश्री चोळके (६६.५०), पौर्णिमा मोकळ (६६.१७) अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय आले. वाणिज्य शाखेत स्वाती कोहाळे (६५.१७), जनार्दन सोनवणे (६५), रूपाली गंगवाल (६२.८३) यशाचे मानकरी ठरले. विज्ञान शाखेत भूषण सागर ७२ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम आला. कल्याणी सोमासे (७१.६७) व दत्तात्रय चोळके (७०.०३) द्वितीय व तृतीय आले.
भडगाव व जामनेरचे यश
जळगाव जिल्ह्य़ातील निकालात भडगाव आणि जामनेर तालुक्याने बाजी मारली असून जळगाव मात्र पिछाडीवर आहे. जिल्ह्य़ाचा निकाल ८४.४३ टक्के लागला असून यामध्ये विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक आहे. एकूण ३७ हजार ४३५ पैकी ३१ हजार ६०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. भडगावचा निकाल ९४.११ व जामनेरचा निकाल ९२.४३ टक्के लागला. अमळनेर ८१.४८, भुसावळ लव ७४.६२, बोदवड ८७.९१, चाळीसगाव ७८.२५, धरणगाव ९१.१३, एरंडोल ८९.४४, जळगाव तालुका ७८.१७, जळगाव महापालिका क्षेत्र ७३.३०, मुक्ताईनगर ८६.८२, पारोळा ८६.४७, पाचोरा ८३.४७, रावेर ८२.०९ आणि यावल ८४.३३ अशी निकालाची तालुकानिहाय टक्केवारी आहे.
चाळीसगावची रेश्मा लाड मागासवर्गीयांमध्ये प्रथम
चाळीसगांव एज्युकेशन सोसायटी संचलित के. आर. कोतकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतील रेश्मा लाड ९२.३३ टक्के गुण मिळवून नाशिक विभागात मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये प्रथम आली. प्रा. मोहन लाड यांची ती मुलगी आहे. यापुढे अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन प्रशासकीय सेवा करण्याची इच्छा तिने व्यक्त केली. यशाचे श्रेय तिने आई, वडील आणि प्राध्यपकांना दिले.
नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल ९७.०७ टक्के लागला. महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान अजिंक्य पवारने (९४.१७) मिळवला. श्वेता लोटणकर (९१.८३) दुसरी आली. किमान कौशल्य शाखेचा निकाल ९९ टक्के लागला. पारस बरेलीकर (७९.६७), स्वाती जाधव (७९.५०) प्रथम व द्वितीय आले. वाणिज्य शाखेचा निकाल ८७ टक्के लागला. विशाल वरूडे (८७), प्रेम पाटील (८३.३३) प्रथम व द्वितीय आले. कला शाखेचा ७९.६९ टक्के निकाल लागला असून शुभांगी सुरसे (७९.८०), स्वाती पाटील (७७.५०) हे प्रथम व द्वितीय आले.