Leading International Marathi News Daily
शनिवार, ६ जून २००९

वास्तुरंग
घर.. तुमची गरज की गुंतवणूक?

मुंबईतील चाळींची जागा फ्लॅट घेऊ लागले तर शहरापासून लांब जागा घेण्याकडेही काहींचा कल वाढू लागला. हे जरी खरे असले तरी ही घरे नेमकी कशासाठी आहेत, गरज म्हणून की गुंतवणूक म्हणून असाच प्रश्न अनेकांना पडतो. सरकारचे गृहनिर्माण धोरण, विकासकांच्या योजना, पुनर्बाधणीच्या कल्पना, खरेदीदारांची घाईगर्दी यातून नेमके काय स्पष्ट होते? घर ही

 

आज गरज आहे की गुंतवणूक? आज यापैकी नेमकी आवश्यकता कशाची? गरजेच्या पूर्ततेची की गुंतवणूक करण्याची याविषयी आपली बाजू - मतमतांतरे साधारण २०० शब्दांत आमच्याकडे पाठवा.
चर्चा .. दुर्धटना टाळण्यासाठी
यावर्षी झालेल्या बोरिवलीतील ‘लक्ष्मी-छाया’सारख्या दुर्घटनांनी अनेकांची आयुष्ये झाकोळून गेली. पण याचा मागोवा घेतला तर लक्षात येते की अशा इमारतींकडे अनेकांगांनी झालेले दुर्लक्ष कारणीभूत आहे. अशा घटना टाळण्यासाठी काय-काय करायला हवं ते तुम्हीच ठरवायला नको का? आपला दृष्टिकोन २०० शब्दांमध्ये आमच्याकडे पाठवा.
मेलबॉक्स
वास्तुरंगमध्ये छापून आलेल्या लेखांवर आपल्या प्रतिक्रिया, मतमतांतरे कूलस्केप कागदाच्या एकाच बाजूवर लिहून आमच्याकडे पाठवा. मर्यादा २०० शब्दांची. मुद्देसूद पत्रांना प्रसिद्धी देऊ.
लेख पाठवा
घरासंदर्भातील कोणत्याही विषयात आपण तज्ज्ञ असाल आणि आपला अभ्यास आमच्या वाचकांबरोबर शेअर करू इच्छित असाल तर आमच्याशी संपर्क साधा.
कोणताही मजकूर पाठविताना कागदाच्या एका बाजूला समास सोडून लिहावा. तसेच आपले पूर्ण नाव, पत्ता, दिनांक, दूरध्वनी क्रमांक याचीही नोंद न विसरता करावी. आपले पत्र इमेलवर पाठवितानाही आपल्या नाव व पत्त्याची, पूर्ण नावाची नोंद करावी.
पत्ता-दै. लोकसत्ता, वास्तुरंग विभाग, एक्स्प्रेस टॉवर्स, नरिमन पॉइंट, मुंंबई ४०००२१(इमेल- vasturang@expressindia.com)