Leading International Marathi News Daily

रविवार, ७ जून २००९

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण
पद्मसिंह पाटील सीबीआयच्या ताब्यात

मुंबई, ६ जून / प्रतिनिधी

काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय गुप्तचर विभागाने अखेर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री व आताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आलेल्या पद्म्सिंह पाटील यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. या प्रकरणात त्यांना अटक होण्याची शक्यता असल्याचे सीबीआयमधील सूत्रांनी सांगितले. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा तपास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआय करीत आहेत.

‘अफझलखानाचा कोथळा पुस्तकातून हटवला तेव्हा शेपटय़ा का घातल्या?’
उद्धव यांचा दादोजी कोंडदेव विरोधकांना सवाल

मुंबई, ६ जून / प्रतिनिधी

छत्रपती शिवरायांचे गुरू दादोजी कोंडदेव यांचा उल्लेख चौथीच्या पुस्तकातून वगळण्याच्या कृतीवर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी टीकेची झोड उठवली आहे. काही जातीयवादी संघटनांच्या दबावाखाली झुकून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने जातीयवादी संघटनांपुढे शरणागती पत्करली आहे, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे खरे गुरू नाहीत,

एक्स्प्रेस इन्व्हेस्टिगेशन
.. तरीही पोलिसांची सशस्त्र पथके आदेशाची वाट पाहत होती
धवल कुलकर्णी, सागनिक चौधरी आणि वाय.पी. राजेश
मुंबई, ६ जून

ताज महल हॉटेलमध्ये अतिरेकी शिरल्यानंतर हॉटेलच्या प्रवेशद्वारावर दहशतवादविरोधी पथकाच्या एके ४७ अॅसॉल्ट रायफलसह सज्ज असलेल्या क्विक रिस्पॉन्स टीममधील १२० पोलिसांसह तीन स्ट्राईकिंग मोबाईल्सवरील १८ सशस्त्र पोलीस, प्रत्येकी पाच पोलीस असलेल्या तीन अॅसॉल्ट मोबाईल तसेच प्रत्येकी चार पोलिसांसह सहा पोलीस ठाण्याच्या मोबाईल हॉटेलच्या तळमजल्यावर आदेशाची वाट पाहत उभ्या होत्या. २.१० वा. मरीन कमांडोंचे आगमन झाल्यानंतर अतिरेक्यांविरुद्धची कारवाई सुरू झाली. परंतु ते तळमजल्याच्या वर जाऊ शकले नाहीत. दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता एनएसजीचे कमांडो आले. (उर्वरित वृत्त)

काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही - संगमा
नवी दिल्ली, ६ जून/पी.टी.आय.
काँग्रेसमध्ये जाण्याचा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा मुद्दाच उपस्थित होत नाही, असे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पी. ए. संगमा यांनी केले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची दहा वषार्ंच्या कालखंडानंतर काल भेट घेतली. त्यानंतर संगमा काँग्रेसमध्ये परत जाणार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार अशी चर्चा सुरू झाली होती. यासंबंधी प्रसिद्ध झालेल्या वृत्तांचा इन्कार करून ते म्हणाले की, मी काँग्रेसमध्ये परत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

मेघडंबरीवरील पुतळ्यावरून रायगडावर तणाव
महाड, ६ जून/वार्ताहर
किल्ले रायगडावरील मेघडंबरीमध्ये आज शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये स्थानापन्न करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कायमस्वरुपी बसविण्यात आला. तो या जागेवरून अन्यत्र हलविल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा किल्ले रायगडावर उपस्थित असलेल्या शिवप्रेमींनी दिला. ६ जून या इंग्रजी तारखेप्रमाणे आज किल्ले रायगडावर कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक समारंभ विधीवत पूजा अभिषेक करण्यात येऊन संपन्न झाला. याप्रसंगी आमदार माणिकराव जगताप, नगराध्यक्ष संदीप जाधव, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, इंद्रजीत सावंत, राम यादव आदी मान्यवरांसह हजारो शिवप्रेमी उपस्थित होते.

युवराजची फटकेबाजी
नॉटिंगहॅम, ६ जून / वृत्तसंस्था

युवराजसिंगने केवळ १८ चेंडूंत केलेल्या ४१ धावांच्या झंझावाती खेळीमुळे भारताने ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या आपल्या सलामीच्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध ५ बाद १८० धावांची मजल मारली. चार खणखणीत षटकार आणि तीन चौकारांसह युवराजने आपली ही झटपट खेळी सजविली आणि संथ झालेला भारताच्या खेळाला वेग दिला. भारताने आज रोहित शर्मा (३६) व गौतम गंभीर (५०) यांच्या ५९ धावांच्या सलामीच्या जोरावर मोठी धावसंख्या गाठण्याचे स्वप्न पाहिले पण ही जोडी फुटल्यावर भारताचा वेग मंदावला. १७व्या षटकापर्यंत भारताच्या खात्यात १४० धावाच जमा होत्या. मात्र युवराजच्या वादळी खेळामुळे भारताला १८० चा टप्पा गाठता आला. बांगलादेशतर्फे शाकीब अल हसनने उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन करताना ४ षटकांत केवळ २४ धावा देत १ बळी घेतला. भारताने आज नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गंभीर व शर्मा यांनी अपेक्षित धावगती कायम ठेवली पण बांगलादेशने गोलंदाजी व चपळ क्षेत्ररक्षणाद्वारे भारताच्या धावसंख्येला लगाम घालण्यात यश मिळविले. धोनी (२६) मैदानावर उतरल्यावर तर भारताची धावसंख्या खूपच संथावली.

मान्सून कारवापर्यंत पोहोचला
पुणे, ६ जून/खास प्रतिनिधी

नैर्ऋत्य मान्सून आज आणखी पुढे सरकला असून तो कर्नाटकमध्ये कारवापर्यंत पोहोचला आहे. अशा प्रकारे तो महाराष्ट्राच्या उंबरठय़ावर आला असला तरी त्याचे महाराष्ट्रात कधी आगमन होणार याबाबत मात्र अनिश्चितताच आहे. दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी आज वादळी पाऊस झाला.नैर्ऋत्य मान्सून पुढे सरकण्याच्या दृष्टीने गेले दोन दिवस अनुकूल हवामान होते. त्यानुसार तो कर्नाटकमध्ये कारवापर्यंत पोहोचला. तसेच बंगालच्या उपसागरातही त्याने पूर्णपणे व्यापला. कर्नाटकच्या पुढे तो महाराष्ट्रात प्रवेश करणे अपेक्षित आहे मात्र त्यासाठी तो किती वेळ घेणार हे नेमकेपणाने सांगता येत नाही, असे कदाचित एक-दोन दिवसातही तो पोहोचेल किंवा मध्येच रेंगाळला तर जास्त वेळसुद्धा घेईल, असे पुणे वेधशाळेच्या संचालक डॉ. मेधा खोले यांनी सांगितले. मान्सून महाराष्ट्रात पोहोचला नसला तरी कोकण, गोव्यासह अनेक ठिकाणी आज वादळी पाऊस पडला. रत्नागिरी येथे तर १०५ मि.मी. पावसाची नोंद झाली. याशिवाय पणजी (५० मि.मी.), कोल्हापूर (दोन), सातारा (तीन) तसेच सह्य़ाद्रीच्या घाटमाथ्यांवर काही ठिकाणी पाऊस पडला. येत्या दोन दिवसांत दक्षिण कोकण तसेच दक्षिण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेतर्फे व्यक्त करण्यात आली आहे. राज्याच्या इतर भागात या काळात पावसाचे प्रमाण कमी असेल असेही सांगण्यात आले.

 

प्रत्येक शुक्रवारी