Leading International Marathi News Daily

रविवार, ७ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

वसंतराव नाईक महामंडळाचे १७२ कोटीचे कर्ज माफ - लक्ष्मण माने
सातारा, ६ जून/प्रतिनिधी

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती आर्थिक विकास महामंडळाचे १७२ कोटी ४५ लाख ७६ हजारांचे कर्ज राज्य शासनाने माफ केले असून, त्याचा राज्यातील ६१ हजार ४६४ लाभाथ्र्यीना फायदा झाला असल्याची माहिती या महामंडळाचे व भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे

 

अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
महाराष्ट्र राज्य सरकारने सन २००९-१० च्या अर्थसंकल्पात सर्व मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाचे कर्ज माफ केले व समाजाच्या तळातील उपेक्षित, वंचित घटकांना न्याय मिळवून दिला याबद्दल भटक्या विमुक्त जमाती संघटनेच्या वतीने मी शासनाचे, विशेषत मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, महाराष्ट्र राज्याचे वित्तमंत्री दिलीप वळसे पाटील, चंद्रकांत हंडोरे, स्वरुपसिंग नाईक व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी ही कर्जे माफ व्हावीत म्हणून विशेष प्रयत्न केले. याबद्दल संघटनेच्या वतीने मी सर्वाचे मनपूर्वक आभार मानतो. राज्यात सर्वप्रथम मागासवर्गीयांची कर्जे माफ व्हावीत यासाठी संघटनेचा अध्यक्ष या नात्याने पहिल्यांदा मी मागणी केली होती. त्यावेळचे अर्थमंत्री व आमचे मित्र जयंत पाटील यांनी त्याचवेळी संघटनेच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले होते. यासंबंधीचा पाठपुरावा आमचे नेते शरद पवार व खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या माध्यमातून संघटनेने केला होता. जवळपास ११०० कोटी रुपयांची कर्जे सर्व महामंडळाची माफ झाली. आदिवासींची खावटी कर्जे माफ झाली. महिला बचत गटांना मोठय़ा प्रमाणात अर्थसाहाय्य उपलब्ध करून दिले. याबद्दलही आम्ही शासनाचे ऋणी आहोत. सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टीने दुर्बल घटकांना शासनाने हा मोठा दिलासा दिला आहे. मी अध्यक्ष असलेल्या वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती आर्थिक विकास महामंडळ या महामंडळाच्या एकूण ६१ हजार ४६४ लाभाथ्र्यीना १५७ कोटी ६१ लाख १२ हजार व मुद्दल आणि १४ कोटी ८४ लाख ६४ हजार व्याज, असे एकूण १७२ कोटी ४५ लाख ७६ हजार एवढे कर्ज माफ झाले आहे. यामध्ये ७१ कोटी ६३ लाख ६१ हजार एवढे बँक कर्ज माफ झाले आहे. यामध्ये धनगर, वंजारी यांच्यासह मुळच्या ४२ भटक्या विमुक्त जमातीचा समावेश आहे. गेल्या एक वर्षांत १३ हजार लाभार्थ्यांना कर्जवाटप करुन वसंतराव नाईक महामंडळाने विक्रम केला आहे. आजपर्यंत विशिष्ट जातीचे याचा फायदा घेत होते, गेल्या चार वर्षांत मंडळाच्या कामाच्या दिशा बदलून मुस्लिम, छप्परबंदापासून मरिआईवाले, सापवाले, गारुडी यांच्यासह धनगर, वंजारी या सर्व समाजाला या महामंडळाकडून अर्थसाहाय्य झाले. एकटय़ा पुणे शहरात असे ४० गट उद्योगधंद्यात क्रियाशील झाले आहेत, तर सुजाता कमर्शिअल या महिला बचत गटाने राष्ट्रीय विक्रम केला असून, एक वर्षांत २ लाख परकर बिगबझार या मॉलला पुरविण्याचे कंत्राट मिळविले असल्याचे लक्ष्मण माने यांनी सांगितले.