Leading International Marathi News Daily

रविवार, ७ जून २००९

‘स्किझोफ्रेनिया’ग्रस्तांना मदतीची गरज
‘स्किझोफ्रेनिया’ हा मानसिक आजार आहे. संपूर्ण जगात ‘स्किझोफ्रेनिया’ झालेल्या व्यक्तींचे प्रमाण एक टक्का आहे. माणसाचे विचार, भावना, वर्तणूक, आकलन यावर या मानसिक आजारामुळे परिणाम होतो. काळी जादू, भूतकाळातील पाप, कर्म, करणी या कशाचाही ‘स्किझोफ्रेनिया’शी संबंध नाही. मलोरिया असो किंवा मानसिक आजार, देव त्यावर कोणत्याही प्रकारचे उपचार करू शकत नाही. ‘स्किझोफ्रेनिया’ झालेल्या बहुतांशी रुग्णांना आयुष्यभर औषधे घ्यावी लागातात. योग्य वेळी आणि नियमित उपचार केल्यास हा रुग्ण ८० टक्के बरा होऊ शकतो. संबंधित व्यक्तींच्या नातेवाईकांना या आजाराची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. रुग्ण बरा झाला तरीही अनेकदा हा आजार पुन्हा बळावू येऊ शकतो. त्या व्यक्तीचे नातेवाईक जागरुक असतील तर हे लगेच लक्षात येऊ शकते.

अनुभव डिझाइनचा..
नीरज पंडित

यूथ बाईक.. हायड्रोजन कार.. प्रवासात खेळता येतील असे खेळ.. महिलांसाठी खास तयार करण्यात आलेली आकर्षक प्रवासी बॅग.. वृद्धांसाठी तयार केलेली बस.. विविध विषय हाताळणारे लघुपट.. पुस्तके तसेच आधुनिक टिकिट वेंडिंग मशीन.. टॅक्सी आणि रिक्षा मीटर.. यांसारख्या अनेक नवनवीन कलात्मक गोष्टी आपल्याला आयआयटी मुंबईतील इंडस्ट्रिअल डिझाइन सेंटर अर्थात आयडीसीमध्ये पाहावयास मिळणार आहेत. आपल्या दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंपासून ते अगदी आरामदायी गाडय़ांपर्यंत सर्व वस्तुंच्या प्रतिकृतींचा त्यामध्ये समावेश आहे.

एकमेका आसरा देऊ अवघे करू भ्रमंती

‘गेट वे ऑफ इंडिया’, ‘सिद्धिविनायक मंदिर’ आणि ‘महालक्ष्मी रेसकोर्स’ ही ठिकाणे पाहिली म्हणजे मुंबई पाहिली असे होत नाही. ‘मुंबई दर्शन’ घडविणारे तुम्हाला इराण्याच्या हॉटेलमध्ये घेऊन जात नाहीत किंवा लोकलमधून फिरवत नाहीत. मुंबईचा आंतर्बाह्य अनुभव घ्यायचा असेल तर अस्सल मुंबईकराच्या घरी राहिले पाहिजे. त्याचप्रमाणे पुण्यात जाऊन ‘वैशाली’ला भेट नाही दिली, तर अस्सल पुणेरीपणा कळणार कसा? पण ‘वैशाली’वर जायचे असेल तर पुणेकराच्या घरी राहायला हवे.

उत्साहाचं कारंजं थांबलं
‘स्वाती गेली’, गुरुवारी सकाळी मुळ्येबाईंचा फोन आला आणि मन सुन्न झालं. स्वाती खंडकर पुन्हा आजारी असल्याचं मुळ्येबाईंकडून कळलं होतं. त्यांच्याच मध्यस्थीने आणि सोबतीने स्वातीला भेटायला जायचं, असं आमचं ठरलं होतं. पण स्वातीच्या अकस्मात जाण्यानं ते जमू शकलं नाही, याची फार चुटपूट लागली. गेले वर्षभर स्वाती खंडकरच्या आजारपणाच्या बातम्या कानावर येत होत्या. कुशल मुद्रितशोधक शकुंतला मुळ्ये हा आमच्यातला दुवा. कोणतंही काम चोखपणे आणि जबाबदारीने करण्याऱ्या मुळ्येबाई आम्हाला स्वातीच्या आजारपणाच्या काळात तिची खबरबात कळवत राहायच्या. स्वातीचा उत्साह, उमेद आणि जिगर यावर आमचा जरा जास्तच विश्वास होता.

स्टार ट्रेक
भावनेला पर्याय नाही

स्टॅन्ले कुब्रिक दिग्दर्शित १९६८ च्या ‘२००१ : अ स्पेस ओडिसी’ ने अवकाशप्रवासाचे माणसाचे स्वप्न पडद्यावर साकारले. एव्हाना ती केवळ कल्पना, केवळ फँटसी राहिलेली नाही. अवकाश भरारी तर माणूस घेतोच आहे, नवनव्या ग्रहांच्या ‘भूमी’वर पाय ठेवतो आहे. दरम्यानच्या काळात ‘स्टार वॉर्स’, ‘स्टार ट्रेक’ असे ठळक टप्पे कल्पनाशील सिनेमा माध्यमही घेते आहे. जे. जे. अब्राम्स दिग्दर्शित ‘स्टार ट्रेक’चं म्हणूनच तसं अप्रूप राहिलेलं नाही. अर्थात त्याचा असा एक कॅप्टिव्ह’ प्रेक्षक आहे. अवकाशयानांच्या भराऱ्या, पाहता पाहता ‘एनर्जाइज’ होणारी पात्रं, पृथ्वीच्या कक्षेबाहेर राहून अवकाशात मुक्त संचार करणारी पात्रं, अगदी वातावरणाच्या कोणत्याही बदलाला दाद न देणारी पात्रं पाहताना प्रेक्षक गुंगून जातो खराच.

कलाकारांची लंडनवारी प्रेक्षकांना पडली भारी
एखाद्या पेपरला जाताना विद्यार्थ्यांने फारसा अभ्यास केलेला नाही. पण पॅड, पट्टी आणि इतर साहित्य सोबत घेऊन तो परीक्षेला बसतो. पेपर कोरा सोडायचा नाही असा त्याने पण केल्यामुळे प्रत्येक प्रश्नाचे जमेल तसे उत्तर लिहून तो उत्तरपत्रिका भरून काढतो. अशी उत्तरपत्रिका वाचताना परीक्षकाला किती त्रास होईल, हे त्याच्या गावीही नसते. ‘लग्नाची वरात लंडनच्या घरात’मध्ये दिग्दर्शकाने अडीच तास केवळ ‘भरून’ काढले आहेत. प्रेक्षकांना हा चित्रपट पाहून काय वाटेल, याची तमा त्याने बिल्कूल बाळगलेली नाही.

एक प्रदीर्घ कंटाळलेपण..
अ‍ॅब्सर्ड नाटकं आपल्याकडे फारशी रुजली नाहीत. याचं एक साधं-सरळ कारण म्हणजे- आपल्याला कुठल्याही कलाकृतीत एक गोष्ट लागते.. काहीतरी एक नीट, संगतवार सांगणं असावं लागतं. यापैकी काहीच नसेल तर किमानपक्षी निखळ करमणूक तरी त्यात हवीच हवी. मात्र, यातलं काहीच अ‍ॅब्सर्ड नाटकात अपेक्षिता येत नाही. रंगमंचावर नेमकं काय घडतंय, कशासाठी घडतंय, त्यामागचा हेतू काय, त्यातून काय म्हणायचंय, याचा व्यवस्थित थांगपत्ता सर्वसामान्य प्रेक्षकाला लागत नसेल तर तो अशा कलाकृतीपासून दूर राहणंच पसंत करतो.

टेबल टेनिस हाच श्वास.. नि:श्वास..
मंगला सराफ.. तिने आज वयाची पन्नाशी गाठली आहे. ज्या वयात मधुमेह, रक्तदाब, सांधेदुखी यासारखे विकार जडतात, त्या वयातली तिची चपळाई व शारीरिक क्षमता दाद देण्याजोगी आहे. दररोज नियमित दीड-दोन तास व्यायाम, खेळाचा सराव अखंडपणे सुरू आहे. टेबल टेनिस आणि नोकरी अशी तिची तारेवरची कसरत रोजचीच. तिचं पदलालित्य, वेग आणि एकूणच कामगिरी पाहिली की नभामध्ये कडकडणाऱ्या विद्युल्लतेची आठवण होते. गेल्या वर्षी ब्राझील येथे झालेल्या जागतिक मास्टर्स टेबल टेनिस स्पर्धेत पहिल्या आठ खेळाडूंमध्ये (उपान्त्य फेरीपर्यंत) स्थान पटकाविणारी मंगला सराफ ही एकमेव भारतीय खेळाडू होती.