Leading International Marathi News Daily

रविवार, ७ जून २००९

कॉँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाचा मुद्दा उपस्थित करून बंडाचा झेंडा फडकविल्याबद्दल शरद पवार, पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली. वस्तुत: हा मुद्दा सोनिया गांधी राजकारणात उतरल्या तेव्हा म्हणजे १९९८ मध्ये कोणीच उपस्थित केला नव्हता. पवारांनी तर १९९८ मध्ये निवडणुकीच्या प्रचारात सोनिया गांधी याच पंतप्रधानपदाच्या उमेदवार असल्याचे सांगितले होते. त्यांचे ते उद्गार तेव्हा सर्वत्र प्रसिद्धही झाले होते. सोनियांच्या विदेशीपणाचा मुद्दा तेव्हा भाजपपेक्षा विश्व हिंदू परिषदेने हिरिरीने मांडला होता. पवारांनी मात्र या संदर्भात एक पत्रच काँग्रेसच्या कार्यकारिणीला सादर केल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले होते. सोनियांच्या विदेशीपणाच्या मुद्दा पवारांनी उपस्थित केल्यानंतर काँग्रेस कार्यकारिणीने त्याला आक्षेप घेतला. त्यावेळी पवारांचा अंदाज असा होता की, कार्यकारिणीतील अर्धे सदस्य फुटून त्यांच्या बरोबर येतील. परंतु तसे काही घडले नाही. परिणामी पवार, संगमा व तारिक अन्वर हे त्रिकूट बाजूला पडले.

कोणत्याही आंदोलनाचे यश हे त्या आंदोलनाला लाभलेल्या बौद्धिक नेतृत्वाच्या क्षमतेवर ठरते. बौद्धिक नेतृत्वाशिवाय चालणारे भावनिक आंदोलन दिशाहीन ठरू शकते. ८० च्या दशकात मुंबईतील गिरणी कामगारांचे डॉ. दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन हे याचे बोलके उदाहरण. गिरणी कामगारांच्या प्रश्नांना न्याय मिळावा या उद्देशाने सुरू केलेले आंदोलन शेवटी या उद्योगाच्या अंताला कारणीभूत ठरले. याउलट सहकाराचे रचनात्मक आंदोलन चालविणाऱ्या यशवंतराव चव्हाण, विठ्ठलराव विखे पाटील, वसंतदादा पाटील, रत्नाप्पा कुंभार, तात्यासाहेब कोरे, राजारामबापू पाटील आदींनी त्या त्या परिसराचा कायापालट केला. या सर्व मंडळींनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातल्यानंतर आज त्यांचे ध्येय साध्य झालेले दिसत आहे.

मुंबईतील अमराठी मतदारांनी काँग्रेसी उमेदवारांना मतदान केले आणि अमराठी उमेदवारांना निवडून दिले.त्याच वेळी मराठी मतदारांच्या मतांचे विभाजन होऊन मुंबईच्या मातीशी, मराठी भाषेशी, महाराष्ट्राच्या संस्कृतीशी ज्यांचा दुरान्वयानेही संबंध नाही अशा अमराठी खासदारांच्या हाती मुंबई सोपवली गेली. हे का घडले, हे कसे घडले, याचा जेव्हा मी अंतर्मुख होऊन विचार करतो तेव्हा मराठी मतांचे विभाजन हेच एक प्रमुख कारण मला दिसते. गेली १५ वर्षे मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकविण्यास मदत करणारे मराठी मतदार मनसेच्या भुलथापांना बळी पडले आणि मराठी माणसाच्या एकीचे बळ कमी झाले. असा अविचार मराठी माणसांकडून का व्हावा?

लालूप्रसाद यादव यांनी तोंडातल्या पानाच्या तोबऱ्याची रसाळ चूळ जवळच्या प्लास्टिकच्या पिशवीत भरत हेलिकॉप्टरमधून खाली बघत मला विचारलं, ऊऽऽऽ चौडा पट्टी काऽऽऽ है? ..ईऽऽऽ चौडा पट्टी है, हमारे यहाँ का एक्स्प्रेस-वे! अब हम लोग दो ढाई घंटो में बम्बई से पूना जा लेते है, पहले पाच-छ घंटे आराम से लगते थे. कभी कभी तो लडकी ससुराल पहुँचने के बाद हम शादी में जा पहुँचते थे.. लेकिन आपने बिहार में गोल्डन क्वाड्रीलॅटरल का काम रोक के रखा है ना.. मी माझ्या मनातली मळमळ बाहेर काढली. लालू मग बराच काळ गुळणी घेऊन बसले. कुणास ठाऊक? अंतर्मुखही झाले असतील कदाचित. मी स्वत:वरच चरफडलो. फक्कडपैकी मनोरंजन चाललं होतं. अन् मलाही काय अवदसा आठवली! अभिजात लोक कलाकारांच्या अस्सल कलेचा फक्त आस्वाद घेत राहायचं असतं, हे भान मी हरवलो होतो. चूक माझी होती.