Leading International Marathi News Daily

रविवार, ७ जून २००९

जिल्हा काँग्रेस अध्यक्षांना आता दोन कार्याध्यक्षांची साथ!
राजीव कुळकर्णी

मुख्यमंत्री ठरविण्याची क्षमता असलेल्या ठाणे जिल्ह्यात काँग्रेसची परिस्थिती सुधारण्यासाठी जिल्हाध्यक्षांसमवेत दोन कार्याध्यक्ष नेमण्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी गांधी भवनात झालेल्या बैठकीत केली. मात्र हा ठाकरी इलाज म्हणजे ‘जखम मांडीला अन् मलम शेंडीला’ असा प्रकार असल्याची प्रतिक्रिया जिल्ह्यातील काँग्रेसजनांमध्ये उमटू लागली आहे. लोकसभा निवडणुकीतील पक्षाची कामगिरी व आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी या विषयावर व्यापक विचारविनिमय करण्यासाठी प्रदेश काँग्रेसतर्फे गांधी भवनात जिल्हावार बैठकांचा सिलसिला सुरू झाला आहे. ठाणे जिल्ह्यातील पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बुधवारी झाली. प्रांताध्यक्ष ठाकरे, हुसेन दलवाई, नितीन देशपांडे आदींच्या समक्ष कार्यकर्त्यांनी आपापली मते मांडली.

आलिशान रइस मॅगोज!
सदाशिव टेटविलकर

गोव्यात जाऊन चर्च न पाहता परत येणारा माणूस तसा विरळाच, येता-जाता एखादी पांढरीशुभ्र, वर निमुळत्या छपराची, त्यावर क्रॉस व प्रचंड मोठी घंटा असलेली उंच इमारत सहज आपले लक्ष वेधून घेते आणि मग त्या इमारतीच्या चढत जाणाऱ्या रुंद पायऱ्या, भव्य प्रवेशद्वार आणि त्यावरील रोमन शैलीतील कलाकुसर पाहून पावले आपोआप थबकतात. हा अनुभव बारदेशातील किल्ले पाहताना अनेकदा आला आहे. बारदेशात गावोगावी चर्च आहेत. मात्र गोमंतकातील पहिले चर्च पाहिले त्याचे नाव आहे चर्च ऑफ रइस मॅगोज्, पणजी शहराच्या समोर, मांडवी नदीच्या उत्तर किनाऱ्यावरील किल्ल्याच्या पायथ्याशी अतिशय भव्य असे हे चर्च उभे आहे. इ. स. १५५१ साली या चर्चची निर्मिती झाली.

आकाशातली वीज आणि विमान वाहतूक
डॉ. प्र. ज. जोगळेकर

एअर फ्रान्सचे रिओ डी जानिरोकडून पॅरिसला जाणारे विमान अ‍ॅटलांटिक समुद्रात सोमवार, १ जून २००९ ला कोसळले. या घटनेला काय कारण असावे, याविषयी बोलताना बहुधा विमानावर वीज पडली असावी, असे एअर फ्रान्सच्या डायरेक्टर ऑफ कम्युनिकेशन्सने सांगितले. हे वृत्त टीव्हीवर बघतानाच मला त्यांचे हे निदान चूक आहे असे वाटत होते. मंगळवारी मला सायन्टिफिक अमेरिकनच्या आलेल्या ई-मेलमध्ये माझ्या मताला दुजोरा मिळाला आहे.

लई नाही मागणे
शुभांगी पासेबंद
पोटापुरते देई विठोबापोटापुरते देई
आता लई नाही लई नाही मागणे ।।धृ।।
भाकर ताजी अथवा शिळी
देवा देई भुकेच्या वेळी
आता लई नाही लई नाही मागणे
मज कळण अथवा कोंडा
देवा देई भुकेच्या तोंडा
आता लई नाही लई नाही मागणे
वस्त्र नवं अथवा जुनं

प्रकाशन समारंभ पाहावा करून..
प्रशांत असलेकर

अर्धवट कापलेल्या ओंडक्यातली पाचर काढणाऱ्या आणि त्यात आपली शेपटी अडकवून घेणाऱ्या माकडाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का?
काही दिवसांपूर्वी माझीही अवस्था त्या उपद्व्यापी माकडासारखी झाली होती.
झालं असं की, माझं एक पुस्तक छापलं गेलं. त्याचा प्रकाशन समारंभ करावा व मदत करणाऱ्या संबंधित मित्रांचे सत्कार करावेत, असा विचार माझ्या मनात आला. बुडत्याचे पाय डोहाकडे वळतात तसा तो विचार अगदी प्रबळ झाला.