Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

अकलूज केंद्राचा निकाल ९५ टक्के
माळशिरस, ७ जून/वार्ताहर

 

पुणे विभागाच्या उच्च माध्यमिक परीक्षेत अकलूज केंद्राचा ९५ टक्के निकाल लागला असून, रोहित मारडकर हा विद्यार्थी ९१ टक्के गुण मिळवून केंद्रात प्रथम आला आहे. नितेश रिजवानी व विशाल मोरे यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविले आहेत. याच केंद्रातील सदाशिवराव माने विद्यालयाच्या पीक उत्पादन व्यवसाय अभ्यासक्रमातील शीलादेवी कदमने पैकीच्या पैकी गुण मिळवून विभागात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
अकलूज केंद्रामध्ये शिक्षण प्रसारक मंडळाच्या शंकरराव मोहिते महाविद्यालय, सदाशिवराव माने विद्यालय व शंकरनगरच्या महर्षी शंकरराव मोहिते प्रशालेतील १३८१ विद्याथी परीक्षेस बसले होते. त्यापैकी १३११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या सर्व शाखांचा निकाल ८९.४७ टक्के लागला असून, त्यामध्ये काश्मिरी शिंदे, सद्दाम पठाण व विशाल कदम यांचे अनुक्रमे क्रमांक आले आहेत, तर याच महाविद्यालयात कला शाखेत कांचन देवडे, मनोज गरगडे व अर्चना खटके, वाणिज्य शाखेत मोहम्मद शेख, स्वाती देवकर व सज्जन सुतार, विज्ञान विभागात काश्मिरी शिंदे, सद्दाम पठाण व विशाल कदम तर व्यवसाय अभ्यासक्रम शाखेत ख्वाज शेख, बाबू कडलासकर व नवनाथ कडलासकर यांनी अनुक्रमे क्रमांक मिळविले आहेत.
सदाशिवराव माने विद्यालयाचाही ९८.७१ टक्के निकाल आला आहे. त्यामधील विज्ञान शाखेत रोहित मारुडकर, नितेश रिजवानी व योगेश जेधे, वाणिज्य शाखेत परवीन बागवान, सुदर्शन राऊत व सोनाली वाघ, कला शाखेत शाहिदा शेख, आसमा मणियार व आसमा शेख व व्यवसाय अभ्यासक्रमात कल्याणी फडे व संदीप रजपूत, तृप्ती करमाळकर व सागर काळे, सुजित गरडीक व महेश माने असे विभागून अनुक्रमे क्रमांक मिळवले आहेत.महर्षी शंकरराव मोहिते प्रशालेचाही ९७ टक्के निकाल लागला असून, त्यांचे विज्ञान शाखेत विशाल मोरे, अक्षय भोंग व संदीप जाधव, कला शाखेत रणजित हजारे, सारिका गोरे व मनीषा यादव तर व्यवसाय अभ्यासक्रमात निसार पठाण, विकास ननवरे व विकास कुदळे असे अनुक्रमे क्रमांक मिळविले आहेत.शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील, सचिव अभिजित रणवरे, प्राचार्य डॉ. आबासाहेब देशमुख यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.