Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

इचलकरंजी पालिकेमध्ये पोटनिवडणूक प्रक्रिया सुरू
इचलकरंजी, ७ जून / वार्ताहर

 

शहरातील प्रभाग क्रमांक १९ मधील पोटनिवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यातील विविध नगरपालिकांतील १९ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून त्यामध्ये इचलकरंजी व कागल पालिकांचा समावेश आहे.
या प्रभागातून राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवार रश्मी हजारे विजयी झाल्या होत्या. त्यांच्या जातीच्या दाखल्यास विरोधी उमेदवार सुनीता लाटणे यांनी आव्हान दिले होते. जातपडताळणी समितीने हजारे यांचा भामटा रजपूत जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरवले. त्यामुळे या प्रभागात पोटनिवडणूक होत आहे. यापूर्वी प्रभाग क्रमांक ५ मधून काँग्रेसचे नगरसेवक इम्रान दस्तगीर हावेरी यांना जातीचा दाखला अवैध ठरल्यामुळे अपात्र ठरवले होते. तेथे झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचा पराभव करून शहर विकास आघाडीचे सावकार गोसावी विजयी झाले होते. अशाप्रकारे काँग्रेसचे दोन नगरसेवक जातीच्या दाखल्यामुळे गळाले.
प्रभाग क्रमांक १९ च्या निवडणुकीसाठी १५ मे २००९ रोजीची मतदार यादी ग्राह्य़ मानली जाणार आहे. याबाबत आक्षेप असल्यास निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी विजयसिंह देशमुख यांच्याकडे १५ ते १८ जूनपर्यंत हरकती द्यायच्या आहेत. २० जूनलला अंतिम यादी तयार होऊन ती २२ जूनला प्रसिद्ध झाल्यावर प्रत्यक्षात निवडणुकीचा कार्यक्रम होणार आहे.