Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

बालवाडी प्रवेशासाठी दुप्पट अर्जाची विक्री
सांगली, ७ जून / प्रतिनिधी

 

बालवाडी प्रवेशासाठी सर्वच शाळेत विद्यार्थी संख्येपेक्षा दुप्पट-तिपटीने बुधवारी अर्जाची विक्री झाली आहे. त्यामुळे यंदा बालवाडी प्रवेशाचा प्रश्न गंभीर बनणार आहे. प्रामुख्याने मराठी माध्यमाच्या शाळेकडेच पालकांचा अधिक ओढा असल्याचेही स्पष्ट होत आहे.
बालवाडी प्रवेश प्रक्रिया दि. १ जूनपासून सुरू झाली आहे. अर्ज दाखल करण्याच्या आजच्या अखेरच्या दिवशी महापालिका क्षेत्रातील १५ शाळांमधील दोन हजार जागांसाठी तब्बल चार ते साडेचार हजार अर्जाची विक्री झाली आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत शनिवारपर्यंत असून मंगळवारी सोडत काढण्यात येणार आहे. अर्जाच्या विक्रीवरून पालकांचा मराठी माध्यमाकडेच अधिक कल असल्याचेही दिसून आले.
सांगली शिक्षण संस्थेच्या आठवले विनय मंदिरातील २०० जागांसाठी ७६३, बापट बाल शिक्षण मंदिरातील २५० जागांसाठी ८३१ व वसंत प्राथमिकमधील १५० जागांसाठी ३३५ अर्ज विक्री झाली आहे. याशिवाय मिरज शहरातील आदर्श शिक्षण मंदिर ४३९, नूतन बाल मंदिर ३२२, अभिनव बाल विद्यालय १५२ व भारतभूषण शिक्षणमंदिर २२६ अर्जाची विक्री झाली आहे.
इंग्रजी माध्यमाच्या इमॅन्युअल इंग्लिश स्कूलमधील १०० जागांसाठी २६०, कांतिलाल पुरोहितमधील ५० जागांसाठी ८७, आयडियलमधील ५० जागांसाठी १७६, तर केंब्रिज स्कूलमधील ५० जागांसाठी ४५ अर्ज विक्री झाली आहे.