Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

नगरपरिषदेच्या जागेवर अतिक्रमण; शासनाकडे तक्रार
इचलकरंजी, ७ जुन / वार्ताहर

 

गट नं ४७ मधील जागेवर नगरपरिषदेचे सार्वजनिक उद्यान आणि पाण्याची टाकी यासाठी आरक्षण असलेल्या जागेवर मणेरे ट्रस्टने बेकायदेशीर अतिक्रमण करून इमारत बांधली आहे. या संदर्भात लेखी तक्रार लोकशाही दिनी करण्यात आली आहे. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते दिलीप माणगावकर यांनी दिली.
शहरातील गट नं ४७ मधील सार्वजनिक उद्यान आणि पाण्याची टाकी यासाठी आरक्षण असलेल्या जागेवर मणेरे ट्रस्टने अतिक्रमण करून इमारत बांधली आहे. त्याचा जूना क्रमांक २६ आणि २७ असून नवीन क्रमांक २१ आहे. या डी.ए.मणेरे ट्रस्ट मध्ये नगराध्यक्षांच्या कुटुंबीयांतील नगरसेवक नातेवाईक असल्याने आणि त्यांच्या दबावाखाली काम करणारे मुख्याधिकारी हे या अतिक्रमणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आपल्या कर्तृत्वात कसर करीत आहेत. तसेच हे अतिक्रमण हटविण्याऐवजीइमारतीच्या उद्घाटनासाठी नगराध्यक्षा किशोरी आवाडे या प्रमुख पाहुण्या म्हणून हजर राहिल्याने हे अतिक्रमण काढून टाकण्यासाठी नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अडचणी येत असल्याचा आरोपही दिलीप माणगावकर यांनी केला.