Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

लोकसभेचा कौल विधानसभेतही कायम राहणार ?
एखाद्या निवडणुकीतील कौल पुढील सहा ते आठ महिन्यांनी होणाऱ्या निवडणुकांमध्ये सर्वसाधारपणे कायम राहतो, असे राजकीय विश्लेषकांचे नेहमीच निरीक्षण असते. यासाठी गेल्या पाच वर्षातील निवडणूक निकालांचा आधार दिला जातो. डिसेंबर २००३ मध्ये झालेल्या मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला चांगले यश मिळाले होते. त्यामुळे लोकसभा लवकर बरखास्त करण्याचे धाडस भाजपच्या नेतृत्वाने दाखविले. मे २००४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा अन्यत्र पराभव झाला असला तरी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडने भाजपला साथ दिली होती. तेव्हा विधानसभा निवडणुकीत दिल्लीत काँग्रेसने सत्ता कायम राखली होती. लोकसभा निवडणुकीत दिल्लीत काँग्रेसला चांगले यश मिळाले होते.

येवल्यात ‘छगन भुजबळ विरुद्ध ऑल’
येवला मतदारसंघ

जयप्रकाश पवार

लोकसभा निवडणुकीत पुतण्या समीरच्या उमेदवारीवरून रंगलेल्या जातीय राजकारणाचा पाझर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नाशिक ते येवला असा प्रवास करण्याची चिन्हे आहेत. ‘माळी विरुद्ध मराठा’ अर्थात ‘एम विरुद्ध एम’ हा जातीय प्रचार हीनपातळीपर्यंत नेवून समोरच्याला खिंडीत गाठण्याची जी खेळी निकराने नाशिकमध्ये लढली गेली तीच येवल्यात नव्या दमाने अन् नव्या जोमाने लढायची व्यूहरचना भुजबळ विरोधकांकरवी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तथापि, ‘मतदारसंघाचा विकास’ हे एकमेव अस्त्र सर्व तऱ्हेच्या जात्यंध खेळीवर अचूक व प्रभावी ठरू शकते याची स्वानुभवाने पुरेपूर जाण आलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अन् येवल्याचे आमदार छगन भुजबळ त्याच्याच आधारे विरोधकांवर मात करू शकतात.

उद्धव ठाकरे पाठदुखीमुळे मुंबईला, शिवसैनिकांची मात्र घोर निराशा
औरंगाबाद, ७ जून /खास प्रतिनिधी

शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना अचानक पाठदुखीचा त्रास झाल्यामुळे ते मुंबईला औरंगाबादचा दौरा अर्धवट टाकून रवाना झाले. त्यांच्या उपस्थितीविना विजयी मेळावा झाल्यामुळे शिवसैनिकांची घोर निराशा झाली. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे. हे पुन्हा एकवार सिद्ध झाले. खासदार चंद्रकांत खैरे यांनी या मतदारसंघात हॅटट्रिक करण्याचा विक्रम नोंदविला.

बाभळगाव टू चांदनी चौक
बाभळगावच्या गढीत निवांत बसलो होतो. तेवढय़ात श्रेष्ठींचे दूत आले. नुस्ते आले नव्हते, चॉपर घेऊन आले होते. ‘चला बॉसनी बोलवलंय, असं म्हणत त्यांनी मला चॉपरमध्ये बसवलं. मला वाटलं काही तरी र्अजट काम असेल. बसावे की नाही याचा विचार करत होतो. ‘तुम्ही व्हा पुढं, आलोच दोन कामं आटपून,’ असं सांगायचं मनात आलं होतं.

ऑनलाइनच्या रंगीत तालमीमध्ये सव्‍‌र्हरने केला घात
अनेक ठिकाणी अर्ज प्रक्रिया अपूर्णच !

मुंबई, ७ जून / प्रतिनिधी

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची सज्जता तपासण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने आज रंगीत तालीम आयोजित केली खरी पण या प्रक्रियेसाठी वापरण्यात आलेल्या सव्‍‌र्हरनेच अवसानघात केला. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी ऑनलाइन अर्ज सादर करणे शक्यच झाले नाही. या सरावामध्ये अवघे पाच हजार अर्ज सादर झाले. या पाश्र्वभूमीवर शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र संकेतस्थळासाठी एक लाख हिट्स मिळाल्याचा दावा केला.

शासनलेखी ‘पर्यावरण संवर्धन’ विषयच उपेक्षित
जयप्रकाश पवार, नाशिक, ७ जून

देश अन् राज्यभर पर्यावरण दिन साजरा झाला. या अनुषंगाने कुणी झाडे लावण्याचा तर कुणी झाडे न तोडण्याचा संकल्प केला. पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्याबाबत काही संस्था वा महनीय व्यक्तींनी आपापल्यापरीने सल्ले देखील दिले. शासनही मग याच दिनाचे औचित्य साधून सालाबादप्रमाणे पर्यावरण दिन साजरा करून एकदाचे मोकळे झाले.

विदर्भात भाजपची घसरगुंडी तर मुंबई-ठाण्यावरील शिवसेनेची सद्दी संपुष्टात
अडवाणी-ठाकरे भेटीत रणनीती अपेक्षित

मुंबई, ७ जून/प्रतिनिधी

विदर्भातील जेमतेम १३ विधानसभा मतदारसंघांत भाजपला मताधिक्क्य प्रश्नप्त झाले आहे. लोकसभा निवडणुकीत विदर्भात भाजपची घसरगुंडी झाली आहे तर मुंबई-ठाणे येथील ७२ विधानसभा मतदारसंघांपैकी ३५ विधानसभा मतदारसंघांत सत्ताधारी काँग्रेस आघाडीला मताधिक्क्य प्रश्नप्त झाले आहे. भाजप व शिवसेनेच्या दृष्टीने कणा मोडणाऱ्या याच निकालांवर चर्चा करण्याकरिता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भाजपचे केंद्रीय नेते लालकृष्ण अडवाणी पुढील आठवडय़ात भेट घेणार आहेत.

‘मराठा आरक्षणामुळे राष्ट्रवादीचा पराभव ही लोणकढी थाप’
मुंबई, ७ जून/प्रतिनिधी

मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ामुळे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला, हा आरोप सर्वस्वी खोटा आहे. लोकसभेची निवडणूक राष्ट्रीय प्रश्नांवर लढली गेली. त्यामुळे हा दावा ही लोणकढी थाप आहे, असे उद्गार मराठा संघटनांच्या समन्वय समितीचे नेते विनायक मेटे यांनी काढले.

प्रमिला संघवी यांचे निधन
मुंबई, ७ जून / प्रतिनिधी

ज्येष्ठ सेवादल कार्यकर्त्यां आणि शिक्षणतज्ज्ञ प्रमिला संघवी यांचे आज वृद्धापकाळाने वयाच्या ८० व्या वर्षी शिवाजी पार्क परिसरातील निवासस्थानी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास निधन झाले. समाजवादी विचारांचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रभुभाई संघवी यांच्या त्या पत्नी होत. आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांच्या पार्थिवाला शिवाजी पार्क स्मशानभुमीत कोणतेही धार्मिक विधी न करता अग्नी देण्यात आला.

पवारांची सशर्त माफी मागण्यास तयार -डॉ. शालिनीताई पाटील
सातारा, ७ जून/प्रतिनिधी

शरद पवार यांची आपण काही अटींवर माफी मागण्यास तयार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने झाले गेले विसरून जावे. मनात अढी न धरता निलंबनाची कारवाई मागे घ्यावी, अशी विनंती लेखी पत्राद्वारे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील यांना केली असल्याचे आमदार डॉ. शालिनीताई पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. राष्ट्रवादीतून आपण निलंबित असलो तरी तांत्रिकदृष्टय़ा राष्ट्रवादीतच असल्याने विधीमंडळ अधिवेशन काळात पक्षाची पत्रे व आदेश अजूनही येत असून, राष्ट्रवादीच्या खुर्चीतच बसावे लागत आहे. शरद पवार यांच्यावर आपण केलेली टीका वस्तुस्थितीस धरूनच होती, याचा पुनरुच्चार करून त्यांनी सांगितले की, आपल्यावरही राष्ट्रवादीने टीका केली. ही कटुता विसरण्याची आपली तयारी आहे. देशातील जनतेला किडका गहू पुन्हा देणार नाही व शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्याचे काम कृषीमंत्री या नात्याने करण्याची ग्वाही शरद पवार यांनी दिल्यास त्यांची आपण माफी जरूर मागू. पक्षावर व त्यांच्यावर टीका करणाऱ्या इतर व्यक्तींचे निलंबन मागे घेतले, मग आपल्यालाच वेगळा न्याय का असा सवाल करून शालिनीताईंनी राष्ट्रवादीने निलंबन मागे घ्यावे, असे आवाहन केले आहे.

आघाडीच्या कारकीर्दीत कायद्याचे राज्यच नाही -मुंडे
औरंगाबाद, ७ जून /खास प्रतिनिधी

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या राजवटीत कायद्याचे राज्य शिल्लक राहिलेले नाही, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार गोपीनाथ मुंडे यांनी केली. आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती सत्तेवर येण्यासाठी कटीबद्ध आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शिवसेनेच्या वतीने येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर विजयी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात गोपीनाथ मुंडे यांनी मार्गदर्शन केले. भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला मुंबईला रवाना व्हायचे होते म्हणून गोपीनाथ मुंडे यांनी अवघी सात मिनिटे भाषण केले. या वेळी संयोजकांच्या वतीने औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे, जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांचा खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रथमच लोकसभेवर निवडून गेलेले गोपीनाथ मुंडे यांनाही या वेळी सन्मानीत करण्यात आले. या वेळी औरंगाबादच्या मतदारांचे आभार मानताना खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यासपीठावर लोटांगण घातले.