Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘नृसिंह’चा निवडणूक कार्यक्रम जाहीर
परभणी, ७ जून/वार्ताहर

 

नृसिंह सहकारी साखर कारखाना लोहगाव (ता. जि. परभणी) च्या संचालक मंडळाचा निवडणूक कार्यक्रम परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एका अधिसूचनेद्वारे जाहीर केला आहे.
या साखर कारखान्याच्या ११ मतदारसंघांतून २२ संचालकांना निवडून द्यावयाचे आहे. परभणी, सिंगनापूर, दैठणा, पोखर्णी, पूर्णा, ताडकळस व सोनपेठ या पाच गटांतून प्रत्येकी तीन संचालकांना निवडणूक द्यावयाचे आहे. सामान्य व बिगर उत्पादक संस्था मतदारसंघ, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती मतदारसंघ, आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटक, इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग या मतदारसंघांत प्रत्येकी एक तर महिला सदस्यांसाठी दोन जागा असणार आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिनांक १५ जून असून सकाळी ११ ते ३ या वेळेत सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून उपविभागीय अधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. १६ जूनला छाननी होणार असून विधीमान्य नामनिर्देशन पत्रांची यादी १८ जूनला प्रसिद्ध केली जाईल. जर अपील दाखल केले असेल तर विधीमान्य नामनिर्देशन यादीची प्रसिद्धी २९ जूनला होईस. नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याचा दि. २२ जून हा असून जर अपील दाखल झाले असेल तर त्याच्यासाठी नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा दि. ४ जुलै आहे. निवडणूक लढविणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी ६ जुलैला प्रसद्धि करणअयात येईल. आवश्यकता भासल्यास २२ जुलैला सकाळी ८ ते ५ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडले.
२३ जुलैला सकाळी ८ पासून परभणी नगर परिषदेच्या सभागृहात मतमोजणी सुरू होईल. मतमोजणी संपल्यानंतर लगेचच निकाल जाहीर केला जाईल. जिल्हाधिकारी मोहन ठोंबरे यांनी एका अधिसूचनेद्वारे हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.