Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

माजी विद्यार्थी प्रतिष्ठानने भरीव कार्य करावे - डॉ. खुरसाले
अंबाजोगाई, ७ जून/वार्ताहर

 

योगेश्वरी शिक्षण संस्था माजी विद्यार्थी प्रतिष्ठानने विद्यार्थी हिताचा प्रकल्प हाती घेऊन भरीव कार्य करावे, असे प्रतिपादन योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेशराव खुरसाले यांनी केले.
येथील (कै.) गणपतराव गोटे गुरुजी सभागृहात रविवारी, ३१ मे रोजी योगेश्वरी शिक्षण संस्था माजी विद्यार्थी प्रतिष्ठानच्या सदस्यांची सर्वसाधारण सभा झाली, त्याप्रसंगी ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ. द्वारकाप्रसाद लोहिया होते.
डॉ. खुरसाले म्हणाले, प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्रमासिक प्रसिद्ध करणे, वेबसाइट काढणे आणि गरीब विद्यार्थ्यांच्या वसतिगृहास मदत करणे असे उपक्रम स्तुत्य आहेत. प्रतिष्ठानने निश्चित प्रकल्प आखून ठोस उपक्रम राबवावेत, त्यांना आमचे सहकार्य राहील.
डॉ. लोहिया म्हणाले, सातत्याशिवाय संस्थेचा विकास होत नाही. अंबाजोगाई परिसरातील माजी विद्यार्थ्यांना मोठय़ा प्रमाणात सदस्य करण्याची गरज आहे.सुरुवातीला (कै.) एस. एस. कुलकर्णी व इतर निधन झालेल्या सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पाहुण्यांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ व बाबासाहेब परांजपे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
नवीन कार्यकारिणी
अध्यक्ष- डॉ. दामोदर थोरात, समन्वयक- डॉ. सुरेश खुरसाले, कार्याध्यक्ष- अमर हबीब, उपाध्यक्ष- बाळकृष्ण रामपूरकर (मुंबई), चंद्रशेखर बर्दापूरकर (औरंगाबाद), अर्जुनराव लटपटे (लातूर), रतिलाल कुंकुलोळ (पुणे), सचिव- उदय आसरडोहकर, सहसचिव- प्रा. संपदा कुलकर्णी गिरगावकर, संतराम कराड, कोषाध्यक्ष- संजय जड.