Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

नवी आघाडी बनवून भोकरदनचे नगरसेवक सहलीला
भोकरदन, ७ जून /वार्ताहर

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच, काँग्रेसचे दोन व भाजपाचे दोन नगरसेवक अशी नवीन आघाडी तयार करून येथील नऊ नगरसेवक रविवारी (७ जून) सायंकाळी सहलीवर रवाना झाले.
पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुमत असून सतरा सदस्यांपैकी राष्ट्रवादीचे दहा, काँग्रेसचे पाच व भाजपाचे दोन असे पक्षीय बलाबल आहे. १२ जूनला निवडणूक होणारे अध्यक्षपद इतर मागास प्रवर्गासाठी राखीव आहे. राष्ट्रवादीतर्फे नगराध्यक्षपदासाठी शेषराव सपकाळ व शब्बीर कुरेशी असे दोघे इच्छुक आहेत. सपकाळ यांचा विजय निश्चित मानल्या जात होता. मात्र माजी नगराध्यक्ष श्रावण प्रसाद, भाजपा शहर अध्यक्ष सुरेश शर्मा, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अनिल देशपांडे, नगरसेवक शफीकसेठ पठाण, मुकेश चिने, जयेश प्रशाद यांनी राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेस - भाजपा अशी नवीन आघाडी तयार केली व राष्ट्रवादीचे शब्बीर कुरेशी, मुकेश चिने, शफीक काद्री, प्रभारी नगराध्यक्ष शेख रिझवान, सौ. अरुणा औटी, काँग्रेसचे शफीकशेठ पठाण व सौ. निमाबाई कचके तर भाजपाचे जयेश प्रशाद व आशाताई माळी असे नऊ जण आज सहलीवर रवाना केले असून राष्ट्रवादीचा एक व काँग्रेसचा एक सदस्य उद्यापर्यंत आमच्यात दाखल होणार असल्याचे शब्बीर कुरेशी यांनी या वेळी सांगितले.