Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदासाठी परतूरमध्ये शुक्रवारी निवडणूक
परतूर, ७ जून /वार्ताहर

 

नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्याने नवे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडण्यासाठी नगरपालिकेच्या सभागृहात एका विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी श्रीमती रिता मैत्रेवार सभेच्या अध्यक्षस्थानी असतील. शुक्रवारी (१२ जून) सकाळी १०.०० वाजता ही विशेष सभा होणार आहे.
परतूर नगरपालिकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा कार्यकाळ संपत आल्याने नवे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडणुकीसाठी १२ जूनला पालिकेच्या सभागृहात सकाळी दहा वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. अगोदर नगराध्यक्षपदासाठी व त्यानंतर उपनगराध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. दरम्यान निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले असून मोर्चेबांधणीने वेग घेतला आहे.
आठवडय़ाची प्रतीक्षा..
पालिकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा कार्यकाळ १९ जूनला संपणार आहे. मात्र ही निवडणूक आठवडाभर अगोदर म्हणजेच १२ जूनला होणार असल्याने निवडून येणाऱ्या नव्या अध्यक्ष व उपाध्यक्षांना आपापल्या पदांचा कार्यभार स्वीकारण्यास आठवडाभराची प्रतीक्षा करावी लागणार आहे.