Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

प्रादेशिक

आनंदमूर्ती व त्यांच्या पंथाचे कार्य समाजासाठी प्रेरणादायक - जोगळेकर
मुंबई, ७ जून / प्रतिनिधी

श्री श्री आनंदमूर्ती यांच्या शिष्यांना दहशतवादी म्हणून आणीबाणीच्या काळात तुरुंगात डांबण्यात आले होते. त्यावेळी येरवडा तुरुंगात त्यांचा जवळून परिचय झाला. तेव्हा आनंदमूर्ती यांच्या कार्याची आणि त्यांच्या पंथाची महती समजली. ते दहशतवादी नव्हते. आनंदमूर्ती व त्यांच्या पंथाचे कार्य समजासाठी प्रेरणादायक आहे, असे प्रतिपादन ‘लोकसत्ता’चे निवासी संपादक सुधीर जोगळेकर यांनी शनिवारी केले. श्री श्री आनंदमूर्ती यांच्या जंयती निमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

पारसमल जैन याने दिलेल्या जबाबात नेमके काय आहे?
निशांत सरवणकर, मुंबई, ७ जून

एचआयव्हीचे निदान झाल्याने पैशाची नितांत गरज होती. ठाण्यातील तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त कैलास डावखर यांचा सुमारे २५ वर्षे खबरी म्हणून काम करताना अबकारी निरीक्षक असलेल्या मोहन शुक्ल याच्याशी ओळख झाली होती. त्यामुळे पैशासाठी शुक्लकडे गेलो. तेव्हा शुक्लने मला सांगितले की, पद्म्सिंह पाटील यांचे नातेवाईक असलेल्या पवनराजे निंबाळकर यांच्याशी संबंध बिघडले आहेत.

‘डॉक्टरां’च्या अटकेने राष्ट्रवादी काँग्रेसने धरले अंथरुण!
मुंबई, ७ जून / प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व शरद पवार यांचे नातलग पद्मसिंह पाटील यांना सीबीआयने पवनराजे निंबाळकर खून प्रकरणात अटक केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला सणसणीत चपराक बसली आहे. लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर हा दहा वर्षाचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याची चर्चा सुरू असताना पद्मसिंह पाटील यांच्या खूनबाजीमुळे पक्षाचा विद्रुप, भेसूर चेहरा समोर आला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुका चार महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना सीबीआयने पद्मसिंह पाटील यांना गजाआड केल्याने निवडणुकीत त्याचा मोठा फटका पक्षाला बसण्याची भीती राष्ट्रवादीतील अनेक नेते खासगीत व्यक्त करीत आहेत.

पवारांना ‘दे धक्का’
मुंबई, ७ जून / खास प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला कमी जागा मिळूनही शरद पवार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात तिसऱ्या क्रमांकावर शपथ देण्यात आली होती आणि राष्ट्रवादीची खात्यांची मागणीही काँग्रेस हायकमांडकडून पूर्ण करण्यात आली होती.
या पाश्र्वभूमीवर पद्मसिंह पाटील यांना सीबीआयने केलेली अटक हा विधानसभा निवडणुकीवर लक्ष ठेवून काँग्रेसने राष्ट्रवादीला दिलेला ‘दे धक्का’ असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ आठ जागा मिळाल्या.

दहशतवादी निसटल्याचा महत्त्वाचा संदेश पोहोचलाच नाही..!
एक्स्प्रेस इन्व्हेस्टिगेशन, कविता अय्यर/स्वाती खेर

मुंबई, ७ जून

इस्पितळाच्या आवारात तेव्हा दोन प्रेते पडलेली त्यांना आढळली. दोन बंदुकधारी तरुण जिन्यावरून चालत गच्चीकडे गेल्याचे लिफ्टमनने त्यांना सांगितले. या बंदुकधाऱ्यांनी वर जाण्यापूर्वी सुरक्षारक्षक रावसाहेब फुंडे आणि इतर काही जणांना स्वच्छतागृहात कोंडून ठेवल्याची माहितीही लिफ्टमनने दिली. दाते आणि त्यांचे सहकारी सहाव्या मजल्यावर व नंतर गच्चीपर्यंत पोहोचले. अतिरेकी कोठे आहेत याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने त्यांनी धातूच्या काही पट्टय़ा गच्चीच्या दरवाजाच्या दिशेने फेकल्या. दाते आणि त्यांचा वायरलेस ऑपरेटर हे सर्वात पुढे होते, तर इतर पोलिसांनी बुलेटप्रुफ जॅकेट्स घातलेली नसल्यामुळे ते मागून चालत होते.

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी अद्ययावत शाळा!
सोपान बोंगाणे, ठाणे, ७ जून

आत्महत्या केलेल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या कुटुंबाला सरकारी पॅकेजमधून मिळालेल्या आर्थिक मदतीच्या वाटपावरून कुटुंबियांत नवे वाद सुरू झाले. त्यात भरडल्या जात असलेल्या मृत शेतकऱ्यांच्या निराधार मुलांच्या आयुष्याला आकार देण्यासाठी विदर्भातील खामगाव येथे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांची अद्ययावत व सुसज्ज निवासी शाळा नुकतीच सुरू झाली आहे.

पोलीस दबावाखाली असल्याचा सबळ पुरावा- संजय राऊत
मुंबई, ७ जून/प्रतिनिधी

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पद्मसिंह पाटील यांना अटक करणाऱ्या केंद्रीय गुप्तचर विभाग (सीबीआय)चे शिवसेनेने अभिनंदन केले आहे. याच प्रकरणात राज्यातील पोलिसांनी तपास करूनही त्यांना मुख्य आरोपीला अटक करणे शक्य झाले नव्हते. राज्यातील पोलीस सरकारच्या दबावाखाली काम करीत असल्याचा यापेक्षा वेगळा पुरावा कोणता असू शकतो, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली.राऊत म्हणाले की, सीबीआयने पवनराजे हत्या प्रकरणाचा कसून तपास केला व या प्रकरणातील मुख्य आरोपी पद्मसिंह पाटील यांना अटक केल्याने त्यांच्या कामकाजाबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. सीबीआयने निष्पक्ष चौकशी केल्यानेच सत्ताधारी पक्षाच्या एका खासदारावर कारवाई झाली. राज्य पोलिसांनी याच खून प्रकरणाचा यापूर्वी तपास केला होता. परंतु त्यांना मुख्य आरोपीपर्यंत पोहोचता आले नव्हते. राज्यातील पोलीस सरकारच्या दबावाखाली काम करतात याचा पुरावा सीबीआयने केलेल्या कारवाईमुळे हाती आला आहे.

निवारा अभियानचा ८ जुलै रोजी मोर्चा
मुंबई, ७ जून / प्रतिनिधी

मुंबईत स्वत:चा निवारा नसणाऱ्यांनी स्थापन केलेल्या गृहनिर्माण संस्थांना घरांसाठी राज्य सरकारने जागा दिली पाहिजे, या मागणीसाठी निवारा अभियानच्या वतीने आझाद मैदानावर ४ ते ८ जुलै या काळात ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. राज्य सरकारने मागणी मान्य न केल्यास ८ जुलै रोजी मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

शीतल मफतलाल कस्टमच्या ताब्यात
मुंबई, ७ जून / प्रतिनिधी

विदेशातून लाखो रुपयांचे दागिने व हिरे अवैध मार्गाने आणल्याप्रकरणी कस्टम अधिकाऱ्यांनी आज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘मफतलाल लक्झरी’च्या अध्यक्षा शीतल मफतलाल यांनाताब्यात घेतल्याचे ‘पीटीआय’च्या वृत्तात म्हटले आहे. विमानतळावर शीतल मफतलाल यांच्या सामानाची झडती घेतली असता, हे दागिने व हिरे आढळून आले. या मौल्यवान वस्तूंची माहिती त्यांनी उघड केली नव्हती. त्यांच्याकडे आढळलेल्या दागिने व हिऱ्यांची किंमत अंदाजे ५१ लाख ते एक कोटी रुपयांच्या घरात असल्याचा अंदाज आहे. शीतल मफतलाल दागिने आणि हिरे अवैध मार्गाने आणत असल्याची खबर कस्टम अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्याआधारे त्यांची झडती घेतली असता, त्यामध्ये या मौल्यवान वस्तू आढळून आल्याचे सूत्रांनी सांगितले.